(पाटावर किंवा पात्रात थोडे तांदूळ पसरून त्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. तीवर अक्षता वाहून नमस्कार करावा व ध्यान करावे.) -
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणापतिपूजने विनियोगः ।
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॥
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥१॥
ॐ भूर्भुवः स्वः । श्रीमहागणपतये नमः । असिमन् पूगीफले महागणपतिं सांगं सपारिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।
(आवाहन व आसन म्हणून दोन दूर्वा ठेवाव्यात व त्यावर सुपारी ठेवावी.) -
श्रीमहागणपतये नमः । आवाहयामि ।
श्रीमहागणपतये नमः । आसनार्थे दूर्वांकुरान् समर्पयामि ।
(फूलाने पळीत पाणी घेऊन शिंपडावे.)
श्रीमहागणपतये नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि
(पळीभर पाण्यात गंधाक्षता व फूल घेऊन सुपारीवर वाहावे.)
श्रीमहागणपतये नमः । अर्घ्यं समर्पयामि ।
(पळीत पाणी घेऊन फुलाने शिंपडावे.)
श्रीमहागणपतये नमः । आचमनीयं समर्पयामि ।
(पळीत पाणी घेऊन पुन्हा फुलाने शिंपडावे.)
श्रीमहागणपतये नमः । स्नानं समर्पयामि ।
(पळीभर पाणी घालावे.)
श्रीमहागणपतये नमः । वस्त्रं समर्पयामि ।
(कापसाची वस्त्रे वाहावीत.) -
श्रीमहागणपतये नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि ।
(किंवा)
यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।
( जानवे किंवा तदर्थ अक्षता वाहाव्यात. )
श्रीमहागणपतये नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
(चंदनाचे कुंकुममिश्रित गंध फुलाने वाहावे.) -
श्रीमहागणपतये नमः । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
(अक्षता वाहाव्या.)
श्रीऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रांकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
(श्रीगणेशांगभूत ऋद्धिसिद्धींची पूजा - हळदकुंकू सुपारीवर वाहावे.)
श्रीमहागणपतये नमः । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ।
(फूले वाहावीत. ही सुपारीच्या मानाने स्वल्प असावीत.) -
श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।
(उदबत्ती लावून ती उजव्या हाताने देवाला ओवाळावी. डाव्या हातात घंटा घेऊन त्यावेळी घंटानाद करावा.) -
श्रीमहागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।
(नीरांजन लावून उदबत्तीप्रमाणेच ओवाळावे. त्यावेळी घंटानाद करावा.) -
श्रीमहागणपतये नमः । (नैवेद्याचे नाव घ्यावे) नैवेद्यं समर्पयामि ।
(सुपारीसमोर पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर दूध किंवा जो नैवेद्य असेल तो ठेवावा. त्याभोवती पाणी परिसिंचन करावे व नैवेद्यावर दूर्वेने किंवा फुलाने पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा इत्यादि स्वाहाकार दोनदा म्हणावेत. प्रत्येक वेळी देवाला घास भरवीत आहोत अशी क्रिया उजव्या हाताने करावी.) -
ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि । पुनर्नैवेद्यं समर्पयामि ।
(फुलाने पाणी शिंपडावे.)
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
(एकेक पळी पाणी फुलाने शिंपडत वरीलप्रमाणे क्रमाने म्हणावे.)
करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।
(गंध फुलाने वाहावे.) -
श्रीमहागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि ।
दक्षिणां समर्पयामि ।
(विड्याची दोन पाने त्यावर सुपारी व दक्षिणा ठेवून त्यावर पळीभर पाणी सोडावे.)
श्रीमहागणपतये नमः । फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि ।
( दूर्वांकुर व पुष्प वाहून नमस्कार करावा व कार्यसिद्धीसाठी प्रार्थना करावी.) -
श्रीमहाणपतये नमः । दूर्वाकुरान् मंत्रपुष्पं च समर्पयामि । नमस्करोमि ।
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि ।
विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक ॥
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
श्रीमहागणपतये नमः । निर्विघ्नं कुरु ।
अनेन कृतषोडशोपचारपूजनेन श्रीमहागणपतिः प्रीयताम् ।