मराठीत लोकगीतांचा विभाग समृद्ध आहे. पुरुषवर्गाने मोटेवर, शेतमळ्यातून कामे करता करता अनेक गीते गायली. लहान मुलांसाठी म्हटली जाणारी शिशुगीते, बालगीते, स्त्रीयांच्या ओठावर खेळणार्या म्हणी व वाक्प्रचार, खेळातले व लग्नप्रसंगी घ्यावयाचे उखाणे, कहाण्या, जुनी चालत आलेली गाणी, ओव्या, जात्यावरची गाणी ही तर लोकगीतेच होत. या गीतातून कृषीजीवनाचे व कामकरी समाजाचे शब्दचित्र नजरेसमोर उभे राहते.