मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह ३| नेता विशाखा संग्रह ३ भाव कणिका ध्यास निर्माल्य जीवन लहरी पावनखिंडीत सैगल कुतूहल अससि कुठे तू भक्तिभाव नेता बालकवि वनराणी देवाच्या दारी १ देवाच्या दारी २ देवाच्या दारी ३ टिळकांच्या पुतळ्याजवळ समिधाच सख्या या नेता ’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले. Tags : kavikavitakusumagrajpoemshirwadkarकविताकवीकुसुमाग्रजशिरवाडकरसाहित्य नेता Translation - भाषांतर वीरा, अमित तुझा महिमा पहाटपक्षाचा हो आरव ओसरु लागे काळोखार्णव उदे उमाठ्यावरती अभिनव पूर्वेला सुषमा ! अगाध किमया तुझिया हाती फूलविसि पाषाणातुनि ज्योती रजःकणांवर ये स्पर्शे ती रत्नांचीच कमा ! शान्ततेत तव भरे रणांगण दयेमधे निर्दय आत्मार्पण नम्रतेत निर्धार विलक्षण वैरातहि प्रेमा ! पायदळी पडलेल्या दलिता रुधिराने न्हालेल्या जगता दीप लाविला तुवा प्रेषिता, उजळायास तमा ! तव घर धरती, दौलत काम्बळ सुमनाचे मन वज्राचे बळ ध्येयसाधनाला तव केवळ क्षितिजाच्या सीमा ! येइल उदया सोन्याचा दिन तुटेल हे पोलादी बन्धन दिसतिल अगणित देव्हार्यातुन तुझ्याच रे प्रतिमा ! N/A References : कवी - कुसुमाग्रज ठिकाण - नाशिक सन - १९३२ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP