एकदा एक वानर व कोल्हा यांची अरण्यात गाठ पडली तेव्हा वानर कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्यापासून माझं रक्षण करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.'
तात्पर्य - काही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपयोग घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो की, त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण दुसर्याला कधीही देणार नाहीत.