श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सुखें निद्रा करा ॥ सुखें निद्रा करा ॥ पुरले मनोरथ जातों आपुल्या आगारा ॥धृ०॥
पावला प्रसाद आतां सुखें निजावें ॥ देवा सुखें पहुडावें ॥ आपुल्याला श्रम होती बहु स्वभावें ॥ श्रीपाद० ॥१॥
तुम्हां जागविलें स्वामी आपुलिया काजा ॥ स्वामी आपुलिया काजा ॥ शुभाशुभ कर्म दोष हरावया माझा ॥ श्रीपाद० ॥२॥
तुका म्हणे उच्छिष्टाचें दिधलें भोजन ॥ दिधलें० ॥
आम्हीं नाहीं निवडिलें मुळीं भिन्न आणि भिन्न ॥ श्रीपाद० ॥३॥