श्री दत्ताची भूपाळी - उठिं उठिं बा दत्तात्रेया ...
श्री दत्ताची भूपाळी
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.
उठिं उठिं बा दत्तात्रेया । भानु करुं पाहं उदया । करणें दीनांवरती दया । चरण दावीं वेगेसीं ॥ध्रु०॥
मंदवायुही सुटला । पक्षी करिताती किल्बिला । दीपवर्ण शुभ्र जाला ॥ पूर्व दिशा उजळली ॥१॥
करूनि कृष्णेचें सुस्नान । घेऊनि पूजेचें सामान । सकळां लागलें तव ध्यान । कपाट केव्हां उघडेल ॥२॥
आले देवादिक दर्शना । त्यांच्या पुरवाव्या कामना । संतोषोनि आपुल्या मना ।
तीर्थप्रसाद अर्पावा ॥३॥
गुरू त्रैमूर्ति साचार । करिती पतितांचा उद्धार । म्हणुनि धरिसी हा अवतार । संकटी भक्तां रक्षिसी ॥४॥
रामदास लागे पायीं । मागे इच्छा हेंचि देई । तूंचि माझी बाप माई । प्रतिपाळावें भक्तांसी ॥५॥
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008
TOP