तुझ्या नामाची गोडी आहे नक्की, खडीसाखर लागते फिकी ॥धृ॥
नाम घेतले वाल्मिकाने ओम सोमला फुटले पान, वर वारूळ वाढले किती खडी साखर लागते फिकी ॥१॥
नाम घेतले दामाजीने, रसीद पटवूनी फेडिली बाकी ॥२॥
नाम घेतले प्रल्हादाने, आपल्या पित्याचा घेतला प्राण खांबातून प्रगटली मूर्ती खडीसाखर लागते फिकी ॥३॥
नामा म्हणे हे ग्रंथ गाठुडे नेऊन ठेविले सद्गुरु पुढे येवढी मिळाली स्वर्गेची सखी ॥४॥