असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एक पायानी लंगडा ॥धृ॥
गवळ्या घरी जातो दही दूध खातो, करी दह्या दुधाचा रबडा ॥१॥
शिंकेची तोडितो मडकेची फोडीतो करी नवनिताचा सडा ॥२॥
वाळवंटी जातो किर्तन करितो, घेतो साधुसंतासी झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई, देव एकनाथाचा बछडा ॥४॥