हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी ।
हेची माझी सर्व जोडी । न लगे मुक्ती धन संपदा । संत संग देई सदा ।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिल रूप तुझे, प्रेमे आलींगीन आनंदे पुजीन भावे ओवाळीन म्हणे नामा ॥
मागणे ते एक तुजप्रती आहे । देशी तरी पाहे पांडुरंगा , या संताशी निरवी हेची मज देई । आणिक तुज काही न मागो देवा । तुका म्हणे आता उदारत् होई मज ठेवी पायी संताचीया । पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम । गोपाल कृष्णमहाराज की जय । जय जय रघुवीर समर्थ ॥ नमो सत्चितानंद नारायणा । मनो वासना देत असे यातना । अविद्याभ्रमे जिव घे जन्मना । सुखा मागुनी दु:खभासे मना । जरा जन्म मृत्यु पुन्हा जन्मना । जिवा कर्म योगे जनीजन्मना । न सोडीच देहास यमयातना । सख्या श्रीहरी दे तुझी भक्ती ना । वर्णु किती मी गुरुचा महिमा । हरी रे माझ्या रूप नामा । पायी पडता आपुला म्हणविले । केले सर्व कामा । अयोग्याची मी तुझीया पाया । पदरी घेऊनी दिधला प्रेमा । दत्त अवधूता स्वामी समर्था गर्जीतो मी दत्तानामा ।