त्या धन्य गोपिकांना । प्रभु लाभ जाहला ना ॥धृ॥
शिशु पाळण्यात रडते । त्यजुनी तयास जाते ।
आवरोनी प्रेम पान्हा । प्रभु लाभ जाहला ना ॥१॥
गेली यमुना जीवना । मधु नाद येई काना ।
विसरे ती देहभान । प्रभू लाभ जाहला ना ॥२॥
अष्टांग योग साधू । म्हणुनी कितीक साधु ।
बसले धरुनी आसना । प्रभू लाभ नाही त्यांना ॥३॥
किती भाग्य गोपिकांचे । अद्वैत ब्रह्म सारे साकार जाहले ना ।
प्रभुलाभ जाहला ना ॥४॥