मोहनारे माधवा मुकुंदारे केशवा, भेट सख्या देईनाऽजिवलग येईनारे जीवा भाव या पायी तुझीया अर्णूणी वदती मी हे मन हे माझे नोहे सगुणा, धन हे माझे नोहे जगाच्या तू जीवता, योगीयाच्या साधना भेट सख्या देईना ॥१॥
कटी पिंताबर रूप मनोहर, अधरी धरी मुरलीवाला, गोप गोपिका गुंफूनी भवती दाविसी गोकुळी लीला, उचंबळे भावना होत अती यातना ॥२॥
अफाट जगाची स्थिती पाहतां प्राण त्यज द्यावे वाटे, गरीबांचे हाल पाहतां हृदया येती काटे कोणी साथ देईना कोणी हाक देईना ॥३॥
लोभाने वाढले जग हे स्वार्थ तयाला झाला तुकड्या दास म्हणे ये सखया पाहतो अंत कशाला, निज धाम सोडना देवपण मोडना, भेट सख्या देईना ॥४