आज गुरु पौर्णिमा, आम्हाला ॥धृ॥
श्रीगुरुराये मार्ग दाविला । कोण तू कुठून जन्मा आला ।
विचार याचा शिकवी मनाला । लक्ष चौर्यांशी चुकवी यातना ।
आज गुरु पौर्णिमा ॥१॥
करुनी साधना । धरु उपासना ध्याना मधली सुषुप्ती जाणा ।
लीन होतसे जिथे मीपणा शुद्ध भाव तो देव होय ना ॥२॥
कर्म उपासन ज्ञान भक्तीने । त्या देवाच्या सांन्निध्य राहणे ।
जनी जनार्दन नित्यची पाहणे । जीवन साफल्य ना ॥३॥