मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|
पसायदान

पसायदान

॥ पसायदान ॥
Pasayadan is asked by Sant Dnyaneshwar while seeking the blessings from his Guru and eldest brother Sant Nivrittinath.

आता विश्‍वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूता परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥ २ ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्‍वस्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणीजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्‍वर निळांची मांदी याळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ ४ ॥
चला कल्पतरूंचे आरव । चेताना चिंतामणीचे गांव ।
बोलते जे अर्णव । पीयुषाचे  ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ॥
ते सर्वांहि सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिंही लोकीं ।
भजि जो आदि पुरुखीं । अखंडीत ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । व विशेषीं लोकीं इये ।
दृष्टादृष्टविजयें । होआवे जी ॥ ८ ॥
येथा म्हणे विश्‍वेधरावो । हा होईल दानपसवो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥ ९ ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP