मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीनाथलीलामृत| अध्याय २४ वा श्रीनाथलीलामृत प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २४ वा नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे. Tags : adinathagorakshanathaआदिनाथगोरक्षनाथ अध्याय २४ वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ जो आदिनाथ निरामय । पूर्णब्रह्म जो अद्वय । जया ध्याती देवत्रय । शिव विष्णु विरंचि ॥१॥जया स्तविती श्रुतिस्मृति । त्याही पार जेथें न पवती । सहस्त्रशीर्षाच्या शिणल्या मति । तेथें मी किती मतिमंद ॥२॥गतकथाध्यायींचा इतिहास । गोरक्षमारुतिसंवाद सुरस । ब्रह्मानिरुपण परमरहस्य । निवेदिलें पैं श्रोतयां ॥३॥हनुमंताची आज्ञा वंदून । तेथून निघे मत्स्येंद्रनंदन । मल्लाळदेशातें लक्षून । स्त्रीराज्यांत पातले ॥४॥पूर्वकथेचें अनुसंधान । अगस्तिदिशें मत्स्येंद्रगमन । अकस्मात स्वलीलेंकरुन । येते झाले सद्गुरु ॥५॥पुष्पवाटिके उपवनीं । राहाते झाले मोक्षदानी । तेथें आरामरक्षक कामिनी । शस्त्रपाणि असती ॥६॥तयां पुसती मत्स्येंद्रनाथ । येथें कोण नृप राज्य करीत । येरी वदती करावें श्रुत । साद्यंत वृत्त सांगतों ॥७॥पार्वतीवरदें या देशी । पद्मिणी निपजती लावणराशी । तयां देखून स्मर मानसीं । सलज्ज होऊनि विस्मित ॥८॥ज्या चातुर्यविशारद शारदा । विद्युल्लतेसम चपळ प्रमदा । नवयौवन नवोढ्गा मुग्धा । सुरतसुरसा योग्य पैं ॥९॥शंकरनिगूढ निवासस्थळ । हें अंतःपुर निवास राउळ । येथें भवानी जाश्वनीळ । क्रीडा करिती अक्षयी ॥१०॥येथें आधिपत्य नृप परिमळ । जिचा वपुसुगंध परिमळ । निर्जर होऊनि अळिकुळ । सुर सुरत इच्छिती ॥११॥शिवशापें अद्यापिवर । तशांत मारुतीचा भुभुःकार । पुरुषगर्भ किंवा नर । कदा न राहे पैं येथें ॥१२॥जेवीं नक्षत्रीं नक्षत्रनाथ । तेवीं परिमळ सर्व स्त्रियांत । सुवाससुगंध योजनपर्यंत । वातयोगेंकरुनी ॥१३॥तप्तसुवर्णवर्ण शरीर । नासिक देखोनि लज्जित कीर । उड्डाण करिती एकसर । वृक्षावरी सलज्ज ॥१४॥अधरपुटें अरुणरंगी । वरी बिंबफळ सांडणत्यागी । चंडनेत्र देखून कुरंगी । लंघिताती दशदिशां ॥१५॥चपळाक्ष देखोनि मीन । उदकीं राहिलें लपोन । सरळ पोटरिया विराजमान । गज सलज्ज धुळी घाली ॥१६॥अलक सलंब निरखूनि वेणी । बिळीं वारुळीं लपती फणी । सिंह कटि निरखोन झणी । परी तोही लंघी कानन ॥१७॥जे शृंगारसरोवरमराळिका । मृदुमवाळ लावण्यलतिका । जिचे पाहून वदनशशांका । शशांक शंका भावी मनीं ॥१८॥गमन देखून निरंतर । मराळ करिती दिगंतर । मुख न दाविती अद्यापिवर । परम सलज्ज कलियुगीं ॥१९॥जिकडे पडे दंतपंक्ति । पाषाण पद्मराग स्वयें होती । पदमुद्रा जेथें उमटती । पद्मे प्रगटती ते स्थळी ॥२०॥पंचम सुस्वर गायन । ऐकोनि कोकिळा धरिती मौन । चक्रवाकापरी पीन स्तन । वियोगपणें सदुःखी ॥२१॥रंभास्तंभवत् पोटरिया जाण । रंभोरु गौर नितंब सघन । कटिवेष्टित रत्नभूषण । अनर्ध्यप्रभा स्फुटकलीई ॥२२॥वंशोद्भव मुक्तें उत्पन्न । दुजी गिरिमौळापासून । मत्तमातंगमस्त्रकांतून । शुक्तिकेची पैं चौथीं ॥२३॥सर्पमस्तकीचें मणि । जैसे उदेले प्रभाततरणि । वैरागरीचे सतेज मणि । एकावळी सपंक्त ॥२४॥गरुडपाचू इंद्रनीळ । आरक्त माणिकें सुढाळ । सुतेजकंकणें करयुगुळ । अत्यद्भुत डवरले ॥२५॥मुक्तोघोष तळपती श्रवणीं । कृत्तिकापुंज शुभ्रवर्णीं । कर्णसुमनें चंद्रकिरणीं । विकासलीं सुरम्य ॥२६॥ऐसी सर्वस्त्रियांत स्वामिणी । परमरुप सौदामिनी । जीतें देखूनि नागिणी । तिष्ठती पाताळभुवनीं अद्यापि ॥२७॥जिची प्रियसखी चंद्रकळा । जिचें सौंदर्य पाहोन डोळां । क्षयरोग चंद्रासि लागला । हीनकळा क्षयवृध्दि ॥२८॥सुलक्षण सर्वकाळीं जाण । चातुर्यविशारद अति प्रवीण । ते य्कुवराज्यास परमनिपुण । न्यायअन्याय जाणती ॥२९॥ यापरी सुकेशीचें उत्तर । परिसोनि संतोषले श्रीमत्स्येंद्र । अति होऊन हर्षनिर्भर । लाभचिन्ह सुचविती ॥३०॥नमन करोनि करी गमन । वारंवार निरखी आनन । मनी म्हणी हें एकांत कानन । मनोज मनी स्फुते पैं ॥३१॥तंव शीघ्र निघोन सुकेशी । पातली त्वरें राजसभेसी । सभे बैसली लावण्यराशी । सिंहासनीं परिमळा ॥३२॥कामिनीवृंद आसमंत । छ्त्रचामरें विराजित । नृत्यांगनेचें होत नृत्य । शस्त्रास्त्रीं स्त्रिया तिष्ठती ॥३३॥जेवीं पट्टासनीं मृडानी । सिध्दि तिष्ठती बध्दपाणि । तेवीं दिसे परिमळा राणी । सभागर्भी शोभली ॥३४॥निकट बैसली चंद्रकळा । जेवीं सरस्वतीचे ते अबळा । चतुर्दश विद्या चौसष्टी कळा । विसावल्या पैं तेथें ॥३५॥इकडे परिमळेतें सुचिन्ह । वामनेत्रबाहुस्फुरण । कंचुकीचें बिरडें जाण । मुक्त होय क्षणक्षणीं ॥३६॥सुकेशी मुखीं लावूनि वस्त्र । सांगती झाली गुह्यमंत्र । आपुले उपवनी आकर्णनेत्र । पुरुष देदीप्य देखिला ॥३७॥निर्जरकिन्नरपंक्ती । अमरप्रतिमा न ये व्यक्ती । धांडोळितां सर्व जगतीं । दुजी मूर्ति दिसेना ॥३८॥इंद्र चंद्र भास्कर । ब्रह्मा विष्णु कीं शंकर । मदन कुरवंडी करावा त्वर्य । परि ऐसा नर न देखूं ॥३९॥मग परिमळा तीतें वदत । मज पूर्वी नारदें केलें श्रुत । तुझिये सदनी अकस्मात । मत्स्येंद्र्नाथ प्रगटती ॥४०॥त्या वचनईं धरोनि विश्वास । मार्ग लक्षी रात्रंदिवस । सर्वदा सदा निजध्यास । चातकास ज्यापरी ॥४१॥भुभुःकाराचे भयेंकरुन । दुजा पुरुष येईल कोण । त्यांत देवऋषीचें वचन स्मरोन । मार्ग लक्षी तयाचा ॥४२॥जेवीं सुदेवाचे आगमनीं । परम हर्ष पावे रुक्मिणी । कीं हंसनळनिरुपणीं । आनंद होय दमयंती ॥४३॥तिचे गळां घालोन मिठी । वारंवार थापटी पृष्ठी । म्हणे आतां चला उठाउठीं । पाहीन दृष्टी तयातें ॥४४॥सवें घेऊन सेनासंपत्ति । जाती जाहली वनाप्रति । सवें प्रियसख्या परमप्रीति । येती जाहली पैं तेथें ॥४५॥वीरवेषें शूरचिन्ही । खड्ग्वोडणीधृतधारिणी । परशतोमरपट्टिशपाणी । अश्विनी पद्मिणी आरुढल्या ॥४६॥गजस्कंधीं बैसल्या अंगना । अंकुशें आकर्षिती मत्तवारणा । सुशोभ्य सुलोचना । वीरगुंठी बांधिल्या ॥४७॥गजस्कंधीं गजगामिनी । ध्वज डवरले सुवर्णवर्णी । चामरें शोभली उभयश्रवणीं । रत्नकोंद्णी पाखर ॥४८॥दंती जडलीं अनर्ध्यरत्नें लघुकिंकिणी हेमभूषणें । घंटास्वशब्देंकरुन । मत्तमातंग डुल्लती ॥४९॥रम्य रमणीक आराम । वृक्ष देती गगनीं क्षेम । तडाग तुडंबिला मनोरम । तटी सेना ठेविली ॥५०॥त्यागोनियां सहपरिवार । सुकेशीचा धरोनि कर । मत्स्येद्रदर्शना पादचार । येती झाली शुभांगी ॥५१॥देखोनियां सिंधुमार्ग । मंदाकिनीचा जाय वोघ । तैसी एकटी निःसंग । गमन करी तन्वंगी ॥५२॥वनश्री पाहोनि निवांत । वृक्ष निबिड सघन बहुत । तळीं बैसले मत्स्येंद्रनाथ । अकस्मात देखिले ॥५३॥जेवीं पायाळुयातें अंजन । भेटतां प्रत्यक्ष जोडे धन । तेवी हर्षनिर्भर मन । होतें झाले तियेचें ॥५४॥नाथा करुन नमन । उभी राहिली कर जोडून । पुसती झाली वर्तमान । प्रार्थुनियां वदतसे ॥५५॥कोठोनि येणें कोठूनि गमन । नामगोत्र करवावें श्रवण । कोण देश कोण वर्ण । सकृप होऊनि सांगिजें ॥५६॥यावरी मत्स्येंद्र वदती शब्द । ब्रह्मापासूनि दृश्य बुद्बुद । अनामिया नाम अशब्द । प्रणव प्रसिध्द गोत्र पैं ॥५७॥देश आमुचा निरंजन । वर्णातीत वर्णविहीन । किमर्थ आम्हां करिसी प्रश्न । कारण कांही कळेना ॥५८॥तरी वचन ऐका नेमस्त । अनामिया नाम कूटस्थ । आभासी आकाश किमर्थ । कासया म्हणती सर्वज्ञा ॥५९॥अनंगही अंगहीन । तरी नाम धरी तोही मदन । रुपहीन असतां पवन । मना धारणा करी कीं ॥६०॥जयानें धरिला विग्रह । तयासीच वदती देह । तेथे नाम निःसंदेह । त्रिवाचेसी जाणिजे ॥६१॥मी चरणसेवा इच्छीतसें । करावा नाममंत्र उपदेश । तेणें हहपरत्रास । सुख भोगीन अक्षयी ॥६२॥अन्योन्य ऐक्य झालें मन । उभयपक्षीं समान । परि बाह्यात्कार संपादून । मत्स्येंद्र वद्ती तियेतें ॥६३॥कैचें नाम कैचें रुप । अवघें संचलें चिद्रुप । नामरुपाचा साक्षेप । व्यर्थ जाण पैं तुझा ॥६४॥स्वरुप सौंदर्य देखून । परिमळा झाली तल्लीन । चित्ती दृढनिश्चयेंकरुन । गळां माळ घातली ॥६५॥पाद स्पर्शोनियां मौळ । जेवीं दमयंतीनें वरीला नळ । त्यागून निर्जर भूपाळ । निश्चय नैषधीं पैं जिचा ॥६६॥नृपऋषीतें सांडून । जानकी वरी रघुनंदन । की याज्ञसेनी अर्जुन । नेम नेमिला विधीनें ॥६७॥कीं हिमनगकन्या पार्वती । ती माळ घाली पशुपती । कीं रमा वरी विष्णूप्रति । परमप्रीतीकरोन ॥६८॥जेवी पय आणि जीवन । एक हंसचि निवडूं जाण । तेवी नरनिर्जर त्यागून । एक मत्स्येंद्र अनुसरलीं ॥६९॥समारंभें भ्रमे नगरीं । मत्स्येंद्र आणिले ते अवसरीं । गुढियातोरणें घरोघरीं । शृंगारिली पुरी ते ॥७०॥मंगळ वाद्यें मंगळ तुरीं । प्रतिशब्द न माये अंबरीं । उभ्या ठेल्या नगरनारी । सुदीप करीं घेवोनी ॥७१॥केशरकस्तुरीचे सडे । रंगमाळा चहुंकडे । स्त्रियांचें वृंद मागें पुढें । वाडेंकोडें चालती ॥७२॥मत्स्येंद्र आरुढले सिंहासनीं । पुढें होतीं मंगळ गाणी । वारांगनानृत्य ते क्षणीं । परमानंद वोढवे ॥७३॥षोडशोपचारी पूजनें । अर्पियेलीं रत्नभूषणें । कायावाचातनमनधनें । अर्पण करी नाथातें ॥७४॥केशर मृगनाभ स्त्रक् चंदन । आपुले हस्तीं करी लेपन । हेमतडित्प्राय तगटवसन । परिधान करी स्वहस्तें ॥७५॥राज्य समग्र समर्पिलें । स्वयें दास्यात्व अवलंबिलें । क्रीडाविलास सुखसोहळें । अष्टभोग भोगीत ॥७६॥शक्रापरी दिव्यभोग । रतिसुखादि अंगसंग । जेवीं रतीसवें अनंग । परमअनुराग अन्योन्य ॥७७॥ न टळे कदा भविष्यभोग । विषय किंवा वैराग्य । जे जे काळी जो प्रसंग । भोगिल्यावीण चुकेना ॥७८॥ मत्स्येंद्राऐसा परमयोगी । पाहा कैसा विषय भोगी । मोहिनिये एकांतप्रसंगी । श्रीशंकर मोहिला ॥७९॥मत्स्येंद्र भोगिती राज्यभोग । परि ते लीलाब्धीचे तरंग । न कळे वर्म कोण मार्ग । अगाध कृति जयाची ॥८०॥जें जें होणार भविष्यगतीं । तें तें कदा न चुके कल्पांती । ईश्वरसूत्र विचित्रगति । कदा अन्यथा नव्हेचि ॥८१॥कौसल्यादशरथ विघडलीं । ब्रह्मसूत्रें गांठी पडली । यशहानिमृत्यु जे जे काळी । ते ते काळीं जाणिजे ॥८२॥मत्स्येंद्राऐसा विरक्त । परि परिमळेसि झाला सक्त । पाहतां दिसे अनुचित । त्याचें सामर्थ्य अगाध ॥८३॥कृष्णें केलें परद्वार । तयासी काय म्हणावें जार । पराशराचा व्याभिचार । कैसा म्हणावा सांग पां ॥८४॥जो महाराज बादरायण । अंबालिकें भोगदान । पंडु धृतराष्ट्र उत्पन्न । परमश्रेष्ठ विदुरादि ॥८५॥द्रौपदीचे पंच भ्रतार । तरी तो काय अनाचार । ईश्वरईच्छें विचार । सदाचार तोचि की ॥८६॥न देवचरितं चरेत् । तरी धन्य त्याचें सामर्थ्य । तया दोष ठेविजे पतित । तरी अधःपात होय त्या ॥८७॥आतां असो हा विस्तार । परिमळा भोगी नाथमत्स्येंद्र । सुरतानंदाचा समुद्र । उचंबळला अगाध ॥८८॥परिमळा प्रार्थी कर जोडून । म्हणे मी शरण अनन्य । विनंती विनवी करा मान्य । भाष्यदान मज द्यावें ॥८९॥माझा वियोग नसावा सहसा । हा मज द्यावा दृढ भरंवसा । आजि जोडलें सुकृतयशा । ते फळाशा प्राप्त पैं ॥९०॥यावरी मत्स्येंद्र वदती वचन । माझें इच्छी ऐसेंचि मन । येथें गोरक्ष करितां गमन । तो मज नेईल निश्चयें ॥९१॥तयाचा मज संशय । गोरक्षाचें महद्भय । यापुढें न चले उपाय । शिवविष्णुविरंचीचा ॥९२॥परिमळ म्हणे प्राणनाथा । याची तरी कायसी चिंता । मल्लाळ देशीं माझी सत्ता । शिक्षा कृतांता लावीन मी ॥९३॥मग चारयोजनपर्यंत । रक्षक ठेविले असती दूत । कोणी पुरुष येतां येथ । शिक्षा त्यासी लावीन ॥९४॥पशुपक्षीं किंवा नर । पुरुषवाचक कोणी इतर । आलिया येथें हाचि निर्धार । शिरच्छेद करीन मी ॥९५॥या प्रतिज्ञेचें कारण । येथें गोरक्ष येईल म्हणोन । मत्स्येंद्रा नेईल जाणून । करी रक्षण या हेतू ॥९६॥देशावर फिरत फिरत । वारंगना पातल्या तेथ । तंव गोरक्षही अकस्मात । तेचि स्थळीं पातले ॥९७॥तुडुंब तोयसरोव्र । तटीं निबिड तरुवर । छाये बैसले नारीनर । विश्रांति घेती यास्तव ॥९८॥त्या वृक्षच्छाये कळापात्रें । रुदन करिती दीर्घस्वरें । कळवळोनि अंतर । गोरक्ष पातले जवळिके ॥९९॥त्यापुढें उभे ठाकून । पुसते झाले वर्तमान । कां रे करीतसां रुदन । मज निवेदन करावें ॥१००॥येरू म्हणती परिहारावीण । उभयपक्षी लाजिरवाणें । काय व्यर्थ दुःख सांगून । परिहार सर्वथा नव्हेचि ॥१॥गोरक्ष वदती तदुपरी । तुम्हां दुःखातें मी निवारी । विश्वास ठेवून अंतरीं । निर्ध्दारेसीं सांगिजे ॥२॥तंव ते वदती तये वेळां । आमुचा मृदंगी मृत्यु पावला । तेणें बहुत नाश जाहला । उदरनिर्वाह मग कैचा ॥३॥आम्हां गुणिजनां सुसंगीत । असतां तेणेचि लाभ प्राप्त । व्यंग असतां कोण पुसत । लाभ कैचा मग आम्हां ॥४॥याचक तृणाहूनि क्षुल्लक । त्यांतव्यंग तरी सर्व विलग । मग कैसेनि द्रव्यप्रसंग । आम्हां अनाथां कारणें ॥५॥पूर्वपातकाचा संचय । यास्तव भिक्षुकाचा प्राप्त देह । प्राक्तनें जाहला अपाय । यासी उपाय असेना ॥६॥ऐसा समय आम्हां प्राप्त । मृदंगी न मिळे अरण्यांत । परिमळेचा धरुन आर्त । तोही स्वार्थ दिसेना ॥७॥उदरभरणाची धरोनि आशा । आम्ही पातलों या विदेशा । आतां आमुची नैराशा । दुर्दशा प्राप्त जाहली ॥८॥गोरक्ष म्हणे परिसा रहस्य । तेथें कुळदैवत माझें उपास्य । त्याचेम दर्शनाचा उद्देश । जाणें अवश्य मज तेथें ॥९॥तरी तुम्हांसवें मी येईन । मज न्यावें सांभाळून । प्रसंगे मृदंगशी वाजवीन । पडेन उपयोगी तुमच्या ॥११०॥गुरुकार्याकारणें । नीचाचेंही दास्यत्व करणें । सद्गुरुसेवेचें महिमान जाणें । स्वयें गोरक्षनाथ ॥११॥मी करीन तुमचे सेवन । पोटापुरतें द्यावें अन्न । वस्त्रें जीं असतीं जीर्ण । द्यावी कौपिनीपुरतीं ॥१२॥तंव ते वदती पुरुषवेष । तेथें कैसा होईल प्रवेश । संतोषसंयम मानस । कैसें होईल नेणवें ॥१३॥गोरक्ष म्हणे मी विदेही । मज सर्वथा देहचि नाही । नरनपुंसकस्त्रीव्यक्तीही । व्यक्तित्रयावेगळा ॥१४॥श्रीगोरक्षमहिमान । काय जाणती अज्ञानजन । कीं मूर्खाहस्तीं अनर्ध्यरत्न । काय परिक्षा तयासी ॥१५॥कीं प्लवंगमा सुमनशय्या । कीं क्लीबातें लावण्यभार्या । कीं शवाचे हातीं वायां । रत्नमणी दिधला ॥१६॥तेवीं वारांगना नाथा नेणती । असो गोरक्ष तयांसवें असती । सत्वर पातले नगराप्रति । परिमळेचे तेधवां ॥१७॥नगरद्वारी येती सम्यक । तों द्वारप्रदेशी द्वाररक्षक । तयां पुसती राजसेवक । कोठोनि आलां सांगिजे ॥१८॥तंव ते वदती आम्हीं गुणिजन । स्वयें करितों नृत्यगायन । आम्हां व्हावें राजदर्शन । इच्छा धरोनि पातलों ॥१९॥सवेंचि गेले सभेसी दूत । मत्स्येंद्ररायासी केलें श्रुत । तया परिमळा आज्ञापित । शीघ्र आणावें तयांसी ॥१२०॥भद्रासनीं नाथमत्स्येंद्र । जेवीं सुरगणीं वेष्टिला इंद्र । की तारामंडळीं पूर्णचंद्र । सभे नरेंद्र तेवीं तो ॥२१॥लेखक परिचारक कामिनी । कनकदंडी वेत्रपाणि । एवं सर्वही नितंबिनी । सेवक सहचर सर्व त्या ॥२२॥सिंहलद्वीप लावण्यखाणी । तेथें निजपती दिव्य पद्मिणी । सुस्वरुप सर्व नितंबिनी । पाहोनि नागिनी लज्जित ॥२३॥त्यांत लावण्यसीग परिमळा । दुजी तैसीच शीतळा । जिचें सौंदर्य देखोन डोळां । चंद्रासि लागे क्षयरोग ॥२४॥जेवीं प्रदोषकाळीं कर्पूरगौर । नृत्य करिती शीशंकर । मृदंग घेतसे इंदिरावर । टाळ वाजवी विधाता ॥२५॥वीणा घेऊन सरस्वती । सुस्वर गायन करी प्रीती । ताल धरी श्रीगणपति । निर्जर तिष्ठती सेवेंत ॥२६॥मुळींचाच आहे अभ्यास । गोरक्ष अवतार ह्र्षीकेश । तोषवीतसे व्योमकेश । तो मत्स्येंद्र शिव जाणोनी ॥२७॥गायनाचा रंग वोढवला । तंव मृदंगांतूनि शब्द निघाला । चलो मत्स्येंद्रा गोरक्ष आला । दर्शनाला तुमच्या ॥२८॥वारंवार निघे ध्वनि । नाथ ऐकती आपुले श्रवणी । दशदिशां विलोकिती नयनी । दृष्टी न पडे पाहतां ॥२९॥मर्मज्ञ जाणती वर्म । येरा वाउगाचि व्यर्थ भ्रम । गुरुपुत्र सर्वज्ञ निःसीम । तयावीण कळेना ॥१३०॥जयासी नादानुसंधानी मन । तयासीच होय उन्मन । टकमकां पाहती इतर जन । गुरुपुत्र खूण जाणती ॥३१॥कळवळोनि कृपासमुद्र । अभय वदती नाथ मत्स्येंद्र । आतां प्रगटोन करी भद्र । भेटे सत्वर मद्वत्सा ॥३२॥तुझियें वियोगाची रजनी । आतां न साहे अर्धक्षणीं । प्रगट होई प्रकाश तरणि । उदयअभ्युदय करी कां ॥३३॥जेवीं जळदबुंथी सांडूनी । चिद्धननभीं प्रगटे वासरमणि । यापरी परिसोनि वरदवाणी । गोरक्षनाथ प्रगटले ॥३४॥अकस्मात तेज फांकलें । कीं उष्ण चांदणें एकवटलें । दशदिशां कोंदाटलें । भरुनि उरलें सबाह्य ॥३५॥तेज न साहे म्हणोन । सर्व स्त्रियांनीं झाकिले नयन । स्वरुप सौंदर्य सगुण । मत्स्येंद्रचरण धरीतसे ॥३६॥कीं सीताशुध्दी करोन मारुति । येऊन नमस्कारी रघुपती । कीं संजीवनी साध्य कचाप्रति । बृहस्पतीतें वंदिलें ॥३७॥कीं द्वादश वर्ष तीर्थाटण । करोनि पातला अर्जुन । युधिष्ठिरा करी नमन । पदी मूर्ध्नि ठेवित ॥३८॥जेवी एकुलता नंदन । विदेशी गेला बहुत दिन । तो मातेसि भेटला क्षेमकल्याण । अन्योन्य हर्ष ज्यापरी ॥३९॥कीं धेनुवत्स बिघडलें । तें तत्काळ तीतें भेटलें । की हरणीचें पाडस दुरावलें । येऊन मिळालें पैं जैसें ॥१४०॥असो गोरक्षे वंदिलें चरणारविंद । ब्रह्मानंद जय जय शब्द । सुमनें वोपिती विबुधवृंद । तो ब्रह्मानंद न वर्णवे ॥४१॥अनुहतवाद्याचें सुस्वर । वाजूं लागले एकसर । भेटों पातला मत्स्येंद्र कुमर । जो कां अवतार विष्णुचा ॥४२॥हर्ष वोसंडोनि पोटी । चरणी घाली सदृढ मिठी । सद्गुरु म्हणती उठाउठी । वदन दृष्टी पाहू दे ॥४३॥ह्र्दयी धरिलें दृढ कवळोन । कुरवाळिलें गोरक्ष आनन । जीवशिवासी आलिंगन । जेवी षडानन महेशा ॥४४॥जीवशिवा पडली गांठी । मग केवीं तयां पडेल तुटी । तेवीं सारांशाच्या गोष्टी । जेवीं संगम सरितेचा ॥४५॥हस्ती धरोन अंतः पुरांत । नेते झाले गुरु समर्थ । रत्नचौरंगीं गोरक्षनाथ । बैसविले आवडीं ॥४६॥सुगंधतैलें मंगल स्नान । करविलें पीतांबरपरिधान । दिधलीं जडितरत्न भूषणें । सुरस पक्वान्ने वाढिलीं ॥४७॥लघुचीरें घेऊन करीं । उभ्या तिष्ठती लावण्यनारी । जो पदार्थ जे अवसरीं । सिध्दिपरि पुरविती ॥४८॥गोरक्षाचें पाहोनि आनन । म्हणती धन्य प्रसवली जननी रत्न । चित्ती स्त्रिया करिती नमन । दुजा मदन दिसतो ॥४९॥कुमारदशा रुपसंपन्न । पाहूनि स्त्री अतितल्लीन । कोन कोठील काय म्हणोन । कैसा एकटा पातला ॥१५०॥एकाएकीम अहा अकस्मात । आला न कळे ईश्वरई चरित । मार्गी रक्षक असती बहुत । तरी केवीं येथें प्रगटला ॥५१॥अगाध ईश्वराची सत्ता । नेणों कैसा कोठें होता । भेटों आला मत्स्येंद्रनाथा । हे आश्चर्य दिसतें ॥५२॥यावरी वदती तदोत्तरा । बहुरत्ना हे वसुंधरा । कोन कैसा ये विचारा । अनुमान सहसा नव्हेचि ॥५३॥जेवीं गोकुळीं अक्रूर आला । संशय झाला गोपिकांला । तैसाचि प्रकार हाही झाला । गोरक्ष आला म्हणोनी ॥५४॥जयाचे भय होते मनीं । तोचि देखिला आजि नयनीं । ईश्वरमायेची अगाध करणी । ब्रह्मादिकां कळेना ॥५५॥असो परिमळेचे उदरीं कुमर । परमलावण्य सकुमार । मत्स्येंद्रवीर्य अतिसुंदर । दुजा रतिवर प्रगटला ॥५६॥मेनीनाथ नामाभिधान । अतिडोळस कमनीय सगुण । बाळलेणीं रत्नभूषणें । एकुलतें लडिवाळ ॥५७॥जेवीं शिवगौरीपुढें गजवदन । कौतुकें करी बाळभाषण । तेवीं मेनी मत्स्येंद्रनंदन । चुंबन देत जननीतें ॥५८॥यावरी मत्स्येंद्र योजिती मनीं । गोरक्षातें एक कामिनी । देऊन लावूं विषयव्यसनीं । येणेंचि सुख उभयांसी ॥५९॥म्हणे गोरक्षा अवधारी । या नरदेहीं सुख निर्धारी । दिव्यान्न आणि दिव्य नारी । निरंतरीं सुख भोगी ॥१६०॥सुवर्णसदनीं सुवर्णरमणी । सुवर्णवसनीं सुवर्णभूषणीं । सुवर्णमंचकी सुवर्णासनी । सुगंधसुमनीं परिमळ ॥६१॥रत्नालयीं रत्नडोल्हारीं । रत्नचांदवें रत्नझालरी । रत्नदीप सुरत्ननारी । सुरतानंदें क्रीडे कां ॥६२॥सुरतानंदादि नवरस । शृंगारविलास परमसुरस । ललनाललामी लावण्यरुप । हास्यगीतविलास पैं ॥६३॥कमनीयकामिनी-आलिंगन । चुंबनमैथुनीं निमग्न । महत्पुण्यसुखसंपन्न । तो प्राप्त दिन आज पैं ॥६४॥शीतोष्ण आणि पर्जन्य । ऋतुपरत्वें सुख भोगणें । जन्मांतरीचें अप्राप्त पुण्य । तें आजि उदेलें पैं ॥६५॥काय करिसी योगवैराग्य । भस्मभोपळा अतिदौर्भाग्य । भिक्षा भववें परम अयोग्य । अश्लाघ्य जाण भोगणें ॥६६॥तंव भस्त्मगोमयसंभूत । मत्स्येंद्रातें करी प्रणिपात । उभय जोडून हस्त । प्रार्थीतसे विनयें पैं ॥६७॥मज आज्ञापिलें जें गोरक्ष । आणि नाम ठेविलें गोरक्ष । आतां विषयाचा धरोनि पक्ष । तरी स्त्रीसुखातें बोधित ॥६८॥हें काय समर्थायोग्य होय । निर्विकारासी सांगतां विषय । येणें पावती महद्भय । इंद्रचंद्रासारिखें ॥६९॥पाहा स्त्रीरुपें ही व्याघ्रिणी । द्रव्य वेचूनि तीतें पर्णी । सालंकारी वस्त्राभरणी । म्हणे कामिनी प्रिया हे ॥१७०॥धन धान्य कनक वसन । पिष्ट करी विनादशन । एवं सर्वस्व करी भक्षण । शोषण करी शरीराचें ॥७१॥हे महाव्याघ्रिणी दुर्धर । सर्व भक्षून करी टोकर । रक्तमांस शोषी करी पंजर । भयंकर परम हे ॥७२॥नारीपरिस बरी नागिणी । स्पर्श करितां दंशे दशनीं । तत्काळ जाय मृत्युभुवनीं । प्रत्यक्ष नयनीं पाहती ॥७३॥कामिनी पाहून सुंदर । हरिद्राकुंकुम कज्जलनेत्र । कांचनरत्नादि अळंकार । नेत्रकटाक्षें मोहित ॥७४॥हस्तिणी पद्मिणी चित्रिणी । नवरसयुक्त चतुर भामिनी । इहीं व्यापिलें त्रिभुवनीं । निर्जर नर असुर पैं ॥७५॥जिच्र नेत्रकटाक्षेंकरुन । पतन पावती तपोधन । शिव विष्णु चतुरानन । नाडिले जाण श्रेष्ठही ॥७६॥हें प्रपंचाची झाली बिडी । गळां बांधोन घेती सगडी । रात्रंदिवस धगधग धडाडी । केली वेडी बापुडीं ॥७७॥चिंतादूती कालवी पोटीं । तेणें परमार्था पडली तुटी । सदा वसे हव्यास पोटी । हाव धरी प्रपंचाची ॥७८॥चिंता चिंता हे समान । चिता भस्म करी न लगतां क्षण । चिंता जाळी रात्रंदिन । तळमळ वाटे सर्वदा ॥७९॥आत्मसुखापुढें विषय तुच्छ । इतर सुखें करिती गच्छ । कीं स्वात्माब्धीचा मच्छ । थिल्लरोदकीं न जाय ॥१८०॥जें जें होणार भविष्यगतीं । तें तें कदा न चुके कल्पांतीं । ईश्वर सूत्र विचित्रगति । कदा अन्यथा नव्हेचि ॥८१॥जया कुबेर सुप्रसन्न । तोचि होय धनसंपन्न । तो न मागेचि कोरान्न । सर्वांसि मान होय तो ॥८२॥कामक्रोध षडविकार । पदी अक्षयीं तोडर । तेथें विषयांचा उपचार । हा अविचार स्वधर्मी ॥८३॥जें परात्पर निरंजनभुवन । शिणले निगम करितां स्तवन । तें कूटस्थ स्थान मज दिल्हें ॥८४॥चहूं पुरुषार्थाचा चोफाळा । चारी वाणी त्या सांखळया । मुक्तमंडपयुक्त जाळया । परम शोभल्या चिन्नभीं ॥८५॥मग जीवशिव हे दोन्ही । सदा निरंतर भोगी उन्मनी । सोऽहंहंस अखंडध्वनि । अद्वय होवोनि राहिले ॥८६॥तेथें ऐक्याचे सेजेवरी । सवें उन्मनी संगनारी । उभ्या अवस्थात्रय कामारी । तुर्यासुखीं निमग्न ॥८७॥चहूं देहांचीं कपाटें । धारणें लाविली नेटें । अनंत सूर्याची पाहाट फुटे । चित्प्रकाश दाटला ॥८८॥चतुर्दळादि सहस्त्रदळ । त्याचा ब्रह्मांडभरी परिमळ । तेथें होवोनि अलिकुळ । अद्वयपणें वर्तत ॥८९॥पंचतत्त्वाचें प्रावरण । त्यांत उभययुग्में निमग्न । अनुपम्य उपमा अवाच्य रसनें । त्रिपुटी अस्त जे स्थळीं ॥१९०॥स्वात्मसाम्राज्य आलें हातां । मग ऐहिक्यसुखा मारू लाता । याहुनि कोण लाभ परता । सांग मजसी सद्गुरु ॥९१॥अनुहत तुरे लागली घाय । तेथें गजवाजी तुच्छ शेषप्राय । तें माहात्म्य वदूम काय । उपमा न साहे द्वैताची ॥९२॥स्वामी तुमचे कृपेंकरुन । हें त्रैलोक्य मानी ठेंगणें । शक्रादिक राज्यासन । मी देईन तव कृपें ॥९३॥कायसी सामान्य सुखाची कथा । मज झकवितां गुरुसमर्था । भोगरोगभवव्यवस्था । मज सर्वथा नको ही ॥९४॥ऋध्दि सिध्दि निधि । नको ह्या आधि व्याधि उपाधि । मत्स्येंद्रपदीं स्वानंदउदधि । सुखसमृध्दि अक्षयी ॥९५॥श्वेतरक्तपीतश्यामसुनीळ । अमौल्य रत्नभूषित तेजाळ । या ब्रह्मांडभुवनीं सोज्वळ । अनर्ध्य कीळ फाकली ॥९६॥अध ऊर्ध्व सार्ध साध्य । कल्पना साधनाधिक अगाध । तव कृपें पावलों परमपद । भेदाभेदरहित जें ॥९७॥सद्गुरुसत्स्वरुप सुखडोहीं । बुडी दिधली मत्स्येंद्रपायीं । जेथें रात्रदिवस कदा नाही । सोऽहं पाहे ब्रह्मास्मि ॥९८॥तेथें नसे भेदाभास । ठाव कैचा मीतूंपणास । अवघाच झाला खग्रास । स्वप्रकाश कोंदला ॥९९॥हा मत्स्येंद्र गोरक्षसंवाद । श्रवनपठणें होय सद्बोध । कैवल्यज्ञान त्या अगाध । प्राप्त होय अवलीळें ॥२००॥येथें आर्ताचे आर्त पुरती । सकामाचे काम पुरती । निष्कामातें कैवल्यप्राप्ति । गोरक्षउक्ति हे असे ॥१॥हा अध्याय परमपावन । गुरुपुत्र लाभती अपरोक्षज्ञान । याचें न वर्णवे महिमान । अनुभवें खूण जाणती ॥२॥श्रवणमनन करितां अध्याय । आयुरारोग्य प्राप्त ऐश्वर्य । राजद्वारीं सदा विजय । अभ्युदय सदा पावती ॥३॥हा श्रवण करावा अध्या । याचा अनुभव पाहा सध्या । पुत्रपौत्र लाभती वंध्या । सौभाग्य साध्य स्त्रियांसी ॥४॥हा चोविसावा अध्याय सुंदर । हा चोविसावा अवतार । हाच प्रत्यक्ष रुक्मिणीवर । द्वारकाधीश श्रीकृष्ण ॥५॥श्रीमत् आदिनाथलीलाग्रंथ । हाचि भैरवगुरु समर्थ । तत्प्रसादें आदिनाथ । चोविसाव्यास वंदिलें ॥२०६॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP