संशयरत्नमाला - श्लोक ४५ ते ४८

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


की भीसी मज एका
उध्दरितां लागतील फ़ार झटे ॥
तरि कोणाहि न कळतां
न्यावा झांकोनि दास पीतपटे ॥४५॥
की लक्षभोजनापरि
केला संकल्प संपला देवा ।
तरि दाते क्षुव्दिकला
मग न म्हणति काय या बसा जेवा ॥४६॥
की मीच एक उरलो
पापी हे बीज ठेविले जतन ।
वतन स्वकीय मज कां
करिते त्वन्नाम मंगलायतन ॥४७॥
की कार्यबहुत्वे तुज
फ़ावेना यावया जगत्पाला ।
तरि रुप घ्या दुजे ती
विद्या कंठी वसे जशी माला ॥४८॥


अथवोध्दरणान्ममैव चे-
ज्जनसम्मर्दभयं विशड्कसे ।
नय पीतपटावृतं ततो
निजदांस भगवन्नलक्षितम् ॥४५॥
सदृशो व्दिजलक्षभोजनै:
समयश्चेत्तव भक्तरक्षणे ।
ननु सक्रियते क्षुधातुर:
सदयै: साञ्जलिभिश्च लज्जितै: ॥४६॥
यदि बीजमहं नु केवलं
भगवन पापतरो: सुरक्षित: ।
तव मन्डलमन्डलं कथं
वदने नृत्यति नाम मामके ॥४७॥
बहुकार्यसमाकुलोऽस्यत-
स्त्रिजगत्पाल न चाऽगमक्षम: ।
इतरन्ननु रुपमाश्रये -
स्तव कण्ठे स्त्रगिवास्ति सा कला ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP