संशयरत्नमाला - श्लोक ३३ ते ३६

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


की नामस्पर्शमणि
स्पर्शे परि करिल काय खापर मी ।
सदयहि घालील कसा
दुर्देवाला सुखी सखा परमीं ॥३३॥
की प्रथम मदपराधे
तारु ना म्हणुनि वाहिल्या आणा ।
प्रभुजी, पुरे प्रतिज्ञा
भारतरणवृत्त ते मनी आणा ॥३४॥
की याचकांसि देतां
सरले चारीहि मुक्तिधनराशी ।
भक्तिच मज द्या द्यावे
देवाला अमृत योग्य न नराशी ॥३५॥
की जरि म्हणाल असतां
जन्म शुचि स्वपदनीरजा मिळतो ।
तरि झकवितां मला अजि
चुकला नव्हताचि की अजामिळ तो ॥३६॥


अथ रक्षति नाम चेद् वृथा
सफ़ल: स्पर्शमणिर्न खर्परे ।
सदयोऽपि सुह्र्न्न सर्वथा
हतदैवं कुशलीकरिष्यति ॥३३॥
मम दुष्कृतिन्स्त्वयाऽथवा
शपथोऽनुध्दाराणे कृत: पुरा ।
अलमत्र परं प्रतिज्ञया
रणवृत्त स्मर भारतं क्षणम् ॥३४॥
प्रतिपादनतोऽर्थिषु क्षयं
किमगान्मुक्तिधनं चतुर्विधम् ।
प्रतिपादय भक्तिमेव मे
मनुजार्हा न सुधा, सुरोचिता ॥३५॥
अथ जन्मत एव य: सुचि-
र्गतिमिष्टां स जनोऽर्हतीति चेत ।
किमु वञ्चनयाऽत्र सत्पथा-
च्चलित: किं न कदाप्यजामिल: ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP