संशयरत्नमाला - श्लोक २९ ते ३२

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


की अक्षक्रिडेने
हरिले मन सर्व कार्य जी चुकवी ।
तरी बध्दमूल एकचि
भजदवनव्यसन वर्णिती सुकवी ॥२९॥
की वैकुंठी पुष्कळ
भक्त तिळ स्थळ नसे, नसावेंची ।
बसवा पुरे पुरे का
म्हणता धनवन्त कण कसा वेंची ॥३०॥
की बहु काळ विसरला
फ़ारचि संकोचला सखा लाजे ।
येत असेल हळू हळू
म्हणुनिच एकहि न पादुका वाजे ॥३१॥
की श्रीभुजबंधांतुनि
व्हावे मी मुक्त तूंही तेव्हांची ।
स्त्रीजित नसोनि होते
स्त्रीची समजाविशीच केव्हांची ॥३२॥

समजायत वाऽक्षदेवनै-
स्तव कार्यान्तरविस्मृतिर्विभो ।
व्यसनं सहजं सतां मतं
परमेकं तव भक्तरक्षणम् ॥२९॥
स्वजनैरथवाऽतिसड्‍कुले
न च वैकुण्ठपुरे तिलस्थलम् ।
रचयाशु पुराणि मा क्लम-
श्र्चिनुते धान्यकणं न किं धनी ॥३०॥
अथवाऽन्य इवाद्य भो: सखे
चिरलुप्तस्मरणो विलज्जसे ।
चलितोऽसि शनै: शनैस्तत:
श्रवणं नैति च ते पदध्वनि: ॥३१॥
कमलाभुजबन्धनाभ्दवे-
न्मम मुक्ति: प्रथमं ततस्तव ।
अवशोऽपि कथं नु योषितोऽ-
नुनये‍ऽस्या: सुचिरं विलम्बसे ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP