संशयरत्नमाला - श्लोक ४१ ते ४४

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


की आजकाल ज्याचा
तेणे अधिकार घेतला रागे ।
तरि हे अश्रव्देय
प्रभ्वंतर ऐकिले नसे मागे ॥४१॥
की भेटी बहुदिसां भय
भेटाया दीनबंधुला वाटे ।
तरि भेटावे विधिनें
गेले जातात साधु ज्या वाटे ॥४२॥
की स्त्रीपूर्व शिखंडी
त्याते समरांत भीष्म पाहेना
मीही पहिला पापी
ऐसे करितां सुकीर्ति राहेना ॥४३॥
की धर्मसंकटी बळ
न चले रोषे म्हणो नको पार्थ ।
ब्राह्मणकार्य कसे करि
वदतो प्रीत्यर्थ हे न कोपार्थ ॥४४॥

कलहादधुना प्रशास्ति चेद्
भवदन्यो भुवनानि कश्चन ।
कथमश्रुतपूर्वमीदृशं
जगदीशान्तरमस्तु संमतम् ॥४१॥
गमनं सुचिरादिति प्रभो
सहसा दर्शनकातरोऽसि वा ।
विधीनैव ततोऽस्तु दर्शनं
परिपाटी न विलड्घयेद बुध: ॥४२॥
न ददर्श पितामह: पुरा
वनितापूर्वाशिखण्डिनं रणे ।
खलपूर्वमिमं जनं परं
यदि न द्रक्ष्यसि लप्स्यसेअऽयश: ॥४३॥
अवशो ननु धर्मरक्षया
तव कार्ये शिथिलादरोऽभवम् ।
व्दिजकार्यपर: प्रिय: सखा
तव युक्तो गुरुरत्र कर्मणि ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP