संशयरत्नमाला - श्लोक ९ ते १२

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


किंवा तुज एकाकी
पाहूनि खळदैत्य आडवे आले ।
फ़ुटतां सागर सिकता
सेतूचे काय त्यापुढे चाले ॥९॥
किंवा तुज गुंतविले
भजकी परि ते दयार्द्र या रंकी ।
उध्दरित्यासि न सज्जन
गुंतविती गाय कष्टतां पंकी ॥१०॥
किंवा चुकते कांही
स्तवनी तेणेचि मागुता बससी ।
तरि हे मन्मूर्खत्व
प्रभु तूं दोषज्ञही तसा नससी ॥११॥
हरिहर म्हणतो यावे
कोणे यद्यास्य पथकरहि तो घे ।
जपतो अन्योन्याच्या
कार्या जपतां जसे तुम्ही दोघे ॥१२॥


कितवौर्दितिजै रणोत्सुकै:
प्रतिरुध्दोऽस्यसहाय एवं वा ।
अतिवेलमपांपति कथं
सिकतासेतुरहो निरोत्स्यति ॥९॥
भजकैर्ह्रतमानसोऽसि चेन
मयि ते दीनजने द्यापरा: ।
किमु पड्‍कगतां निषिध्यते
व्यथितां गां सुजन: समुध्दरन् ॥१०॥
किमपि स्खलितं स्तवेऽथवा
चलितोऽपि स्थितवांस्ततो भवान् ।
मतिजाड्यमिदं मम प्रभो
न च दृष्टिस्तव दोषदर्शिनी ॥११॥
हरिमेष हरं च संस्तृते
प्रयतेतोध्दरणेऽस्य क: पुन: ।
इति चदुभयो: परस्परं
कुरुथ: कार्यमहं स्तवं तथा ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP