मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८२ वा| श्लोक २७ ते ३० अध्याय ८२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय ८२ वा - श्लोक २७ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २७ ते ३० Translation - भाषांतर अथ ते रामकृष्णाभ्यां सम्यक्वाप्तसमर्हणाः । प्रशशंसुर्मुदा युक्ता वृष्णीन्कृष्णपरिग्रहान् ॥२७॥आपुलिया दर्शनोद्देशें । नृपति आले संतोषें । रामकृष्णीं परमोल्लासें । राजोपचारीं पूजियले ॥८६॥रामकृष्णांच्या हस्तें करून । पूजा संप्राप्त जे नृपगण । ते प्रशंसिती वृष्णीलागून । धन्य म्हणून भूलोकीं ॥८७॥कृष्णें प्रतिपाळिले जे वृष्णि । ज्यांचा प्रेमा सदैव कृष्णीं । जे न तपती त्रितापोष्णीं । मान्य वितृष्णीं गीयमान ॥८८॥तया वृष्णींचा धन्य महिमा । जैसा गमला नृपसत्तमा । तदनुसार सुकृतगरिमा । वदती प्रेमपुरस्सर ॥८९॥अहो भोजपते यूयं जन्मभाजो नृणामिह । यत्पश्ययासकृत्कृष्णं दुर्दर्शमपि योगिनाम् ॥२८॥जन्मवंत जे जे नर । तयां मध्यें सफळतर । तुमचेंचि जन्म धन्य रुचिर । म्हणती नृपवर भोजेन्द्र ॥१९०॥अहो या आश्चर्यें करून । कैसें म्हणती जन्म धन्य । निरंतर ज्यांतें कृष्णदर्शन । योगियांलागून दुर्लभ जें ॥९१॥ज्याच्या योगें एकही वेळ । आम्ही देखूनि श्रीगोपाळ । धन्य मानूं जन्म सफळ । तो सर्वकाळ यांपासीं ॥९२॥अनावर मनाचिया कल्पना । तेणें जीवां पूर्ण चैतन्या । वियोग जाला म्हणोनि नाना । योनिभ्रमणा करितसे ॥९३॥तया मनातें कल्पनारहित । करूनि जीवां पूर्णत्व देत । वियोग भंगूनि योगयुक्त । निजात्मरत जे योगी ॥९४॥ऐशा योगियांही दुर्दर्श । कोटि जन्म तपाचे सोस । करितां एकवार त्यांस । दर्शनास अनवसर ॥१९५॥तो हा सदैव यादवांपासीं । क्रीडे नटोनि मनुष्यवेशीं । ज्याची पूर्णता ब्रह्माण्डासी । दुःखनिराशी सुखदानी ॥९६॥यादवांमाजि यादवपणीं । घेऊनि मानवी अवगणी । सदैव वर्ते चक्रपाणी । परि या कोण्ही न जाणती ॥९७॥यदिश्रुतिः श्रुतिनुतेदमलं पुनाति पादावनेजनपयश्च वचश्च शास्त्रम् ।भूः कालभर्जितभगापि यदघ्रिपद्मस्पर्शोत्थशक्तिरभिवर्षति नोऽखिलार्थान् ॥२९॥ज्याची त्रिजगीं अमळ कीर्ति । शश्वत स्वमुखें श्रुति स्तविती । पादावनेजन भागीरथी । पावनकर्त्ती त्रिजगातें ॥९८॥निगमरूप ज्याची गिरा । स्वशासनीं चराचरा । शिक्षित करी प्राणिनिकरां । शास्त्रनिर्धारा । नियमूनियां ॥९९॥तस्मात शास्त्ररूप ज्याची वाणी । तो हा प्रत्यक्ष पंकजपाणी । प्रकट नांदे यादवसदनीं । ऐश्वर्यश्रेणीसमवेत ॥२००॥हें असो आम्हां प्रत्यय एक । बाणला असे निज निष्टंक । जो जाणती समस्त लोक । तोही सम्यक अवधारा ॥१॥कृतयुगीं प्रकटविभवें । पूर्णैश्वर्यें भूमी मिरवे । त्रेतीं त्रिपाद धर्मा नामें । क्षीणदैवें चतुर्यांशें ॥२॥द्वापरीं द्विपाद धर्म जाहला । तैं अर्ध ऐश्वय्रा मुकली इळा । प्रस्तु उदेजतां कळिकाळा । धर्म जाला एकाङ्घ्री ॥३॥यास्ता भूमी कळिकाळवेगा । प्रदीप्त होतां भर्जितभगा । जाली सर्वत्र दुर्भगा । ऐश्वर्यौघा अंतरली ॥४॥वेदाध्ययनें नव्हती साङ्ग । सन्मार्गाचा जाला भंग । दुराचारी अवघें जग । नव्हती याग विध्युक्त ॥२०५॥तेणें होती खंडवृष्टी । निर्जळ सहजी सहज सृष्टी । फळ दळ पुष्प न पदे दृष्टी । जनपद कष्टी क्षुत्क्षात्म ॥६॥ऐसी कळीकाळप्रवाहीं । भर्जितभाग्य असतां मही । कृष्णपादस्पर्शें पाहीं । दुभे सर्वही ऐश्वर्यें ॥७॥कृपापादस्पर्शें शक्ति । लाहोनि पृथ्वी ऐश्वर्यवती । आम्हां नृपांतें सर्व संपत्ती । वर्षे त्रिजगती सुभगत्वें ॥८॥कृतयुगीं पूर्णपणें । पृथ्वी दुभे ऐश्वर्यगुणें । तैसी स्पर्शतां श्रीकृष्णचरणें । आम्हां कारणें कळिकाळीं ॥९॥एवं आम्हां भूपाळवर्गां । कृष्ण आनंददायक त्रिजगा । परंतु यादवांचिया विभागा । आला अवघा तें परिसा ॥२१०॥तद्दर्शनस्पर्शनानुपथप्रजल्पशय्यासनाशनसयौनसपिंडबंधः । येषां गृहे निरयवर्त्मनि वर्ततां वः स्वर्गापवर्गविरमः स्वयंमास विष्णुः ॥३०॥आम्हां अथवा इतरांप्रति । दुर्लभ दर्शनाची प्राप्ति । तो श्रीविष्णु तुह्मांप्रति । सुलभ सर्वार्थीं सर्वस्वें ॥११॥तरुणां वृद्धां बाळां अबळां । नित्य सुलभ दर्शनसोहळा । यथाधिकारें स्पर्श सकळां । उचित वेळा जाणोनी ॥१२॥मार्गीं चालतां अनुगमनें । प्रजल्प म्हणिजे संभाषणें । शयनीं एकत्र पहुडणें । लेंकुरपणें स्निग्धत्वें ॥१३॥एकासनीं सभास्थानीं । एक पंक्ती सहभोजनीं । यौन म्हणिजे विवाहलग्नीं । शरीरसंबंधप्रसंगें ॥१४॥गोत्रसंबंध सपिण्डयोग । अथवा सप्रेम मैत्रप्रसंग । विलास नर्मोक्तियादि चांग । हा अवघा संयोग ज्या तुमसीं ॥२१५॥येणें करूनि विशेष काय । कोणता लाभ या माजी आहे । तरी तो ऐका म्हणती राये । भोजवर्यादि वृष्णींतें ॥१६॥जया तुमचे गृहीं विष्णु । स्वयें अवतरला भ्राजिष्णु । तुम्हां करोनि भववितृष्णु । स्वसुखसंपन्न भवनिलयीं ॥१७॥केवळ संसार मोहप्रचुर । तेथ गृह तें कारागार । टाकावया निरयपूर । मार्ग दुस्तर भवभ्रम हा ॥१८॥ऐसिया निरयमार्गाच्या ठायें । तुम्हां सुलभ शेषशायी । स्वर्ग मोक्ष दोहीं विषयीं । तृष्णा कांहीं न उरों दे ॥१९॥इहामुष्मिक नश्वर क्षणिक । बंधाविण मोक्षही फोक । कृष्ण कैवल्यसच्चित्सुख । सुलभ सम्यक ज्या तुमतें ॥२२०॥मोक्षाहूनि विशेषतर । कृष्ण सच्चित्सुखसागर । तत्सहवासें तुम्ही सधर । म्हणती नृपवर भोजपते ॥२१॥यालागीं जन्मा भजतयांमाजी । सफळ जन्म तुमचेंचि सहजीं । जे सहवासें गरुडध्वजीं । रंगूनि दुजी गती नेणां ॥२२॥कृष्ण केवळ कैवल्यधाम । आप्तभावें तुम्हां तत्प्रेम । यास्तव न बाधी भवसंभ्रम । भाग्य निःसीम हें तुमचें ॥२३॥ऐसा नृपांहीं कृष्णमहिमा । प्रशंसिला भोजसत्तमा । यावरी नंदागमनगरिमा । श्रीशुकनामा नृपा कथी ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP