मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८२ वा| श्लोक २१ ते २६ अध्याय ८२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय ८२ वा - श्लोक २१ ते २६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २६ Translation - भाषांतर N/Aकंसप्रतापिताः सर्वे वयं याता दिशोदश । एतर्ह्येव पुनः स्थानं दैवेना सादिताः स्वसः ॥२१॥वसुदेव म्हणे अवो बहिणी । दुष्ट कंस पापखाणी । तेणें त्रासिल्या यादवश्रेणी । तैं नेदी चरणी ठाव आम्हां ॥५७॥दाही दिशा कुटुम्बें सहित । आम्ही लागलों विषयीभूत । देशोदेशीं दोन अनाथ । याचकवत परिभ्रमलों ॥५८॥असो यादवांची हे कथा । काळक्षोभ आमुचे माथां । निगडबंधाद दुर्घट व्यथा । त्या त्वां तत्वता नायकिल्या ॥५९॥दैवानुसार रामकृष्ण । नंदव्रजीं वांचले जाण । नष्टचक्रें गोरक्षण । केलें संफूर्ण चिरकाळ ॥१६०॥नारदमुखें कंसा कळतां । तेणें प्रेरूनि गान्दिनीसुता । करावया त्यांचिया धाता । मथुरे तत्वता आणविले ॥६१॥प्रस्तुत आमुचें दैव उदित । यास्तव कंसचि पावला मृत्य । दिगंतींहूनि आम्ही समस्त । पुन्हा मथुरेंत पावलों ॥६२॥सफळदैवें स्वस्थानमासी । होऊनि वर्ततों जनपदेंसीं । ऐसिया आम्हांवरी तूं रुससी । कां न स्मरसी तो समय ॥६३॥तुम्हीं रुसावें आम्हांचिवरी । परंतु आमुची हे अवसरी । जाणे एक ईश्वरगौरी । अपर संसारी नर न जाणती ॥६४॥ऐसा पृथेसी संवाद । केला वसुदेवे एवंविध । आणि पातला भूपाळवृंद । तोही विशाद भूजियेला ॥१६५॥ श्रीभगवान उवाच - वस्देवोग्रसेनाद्यैर्यदुभिस्तेऽर्चिता नृपाः । आसन्नच्युतसंदर्शपरमानंदनिर्वृताः ॥२२॥मत्स्योशीनरप्रमुख राजे । प्रसंगें दर्शना पातले जे जे । वसुदेवोग्रसेनादिकीं सहजें । बरवे वोजे तें पूजिले ॥६६॥अच्युत देखोनि यदवां माजी । तया नृपांची चित्तें सहजीं । विगुन्तलीं गरुडध्वजीं । म्हणती आजि धन्य जालों ॥६७॥समीप बैसोनि अच्युता निकटीं । दर्शन स्पर्शन अंगध्रृष्टी । सुखसंवादीं वदती गोष्टी । आनंद पोटीं न समाये ॥६८॥निर्विषय जो परमानंद । देखोनि बळराम मुकुन्द । पावता जाला भूपाळवृंद । तो तुज विशद निरूपिला ॥६९॥यावरी कौरव सह परिवारीं । यादवांचिया बिढागारीं । पातके समस्त ते अवधारीं । कुरुधरित्रीप्राणेशा ॥१७०॥भीष्मो द्रोणोंऽबिकापुत्रो गान्धारी ससुता तथा । सदाराः पाण्डवाः कुन्ती सञ्जयो विदुरः कृपः ॥२३॥कुतिभोजो विराटश्च भीष्मको नग्नजिन्महान् । पुरुजिद् द्रुपदः शल्यो धृष्टकेतुः सकाशिराट् ॥२४॥दमघोषो विशालाक्षो मैथिलो मद्वकैकयाः । युधामन्यु सुशर्पा च ससुता बाह्लिकादय ॥२५॥राजानो वै च राजेन्द्र युधिष्ठिरमनुव्रताः । श्रीनिकेतं वपुः शौरे सस्त्रीक वीक्ष्य विस्मिता ॥२६॥ भीष्म द्रोण कृपाचार्य । धृतराष्ट्र तो अंबिकातनय । सह गान्धारी पुत्रनिश्चय । दुर्योधनादि शतंसंख्य ॥७१॥स्त्रियांसहित पाण्डव अवघे । पातले तेही ऐक ओघें । द्रौपदे धर्मराजासंगें । द्वितीय पत्नी पौरवी ॥७२॥पौरवीपुत्र जो देवक । तोही पातला सम्यक । भीमपत्नी कालीनामक । सर्वगतनामा तत्पुत्र ॥७३॥सुभद्रा उलूपी दोघी जणी । अर्जुना सहित या अर्जुनपत्नी । अभिमन्यु इरावत पुत्र दोन्ही । पाकशासनि जयन्तवत ॥७४॥विजया सहदेवाची वधू । तत्पुत्र सुहोत्र प्रतापसिन्धु । नृपोडुगणामाजी इन्दु । शौर्यें अगाध समराङ्गणीं ॥१७५॥नकुळपत्नी करेणुमती । निरमित्रनामा तत्संगति । पांचां द्रौपदेयांची पंक्ती । प्रतिविन्ध्यादिप्रमुखांची ॥७६॥कुन्ती संजयविदुरादिक । विरात कुन्तिभोज भीष्मक । पुरुजित नग्नजित द्रुपदप्रमुख । शल्य मद्रक धृष्टकेतु ॥७७॥विराट दमघोष विशालाक्ष । मैथिल कैकेय सुशर्मा दक्ष । युधामन्यु आणि बाह्लिक । सोमदत्त भूरिश्रवा ॥७८॥नामनिर्देशें हे निगदिले । यां वेगळे भूपाळ भले । धर्मराजातें अनुसरले । अर्थें प्राणें सर्वस्वें ॥७९॥पूर्वीं राजसूययज्ञकाळीं । दिग्विजयार्थ भूमंडळीं । भीमार्जुनीं सहदेवनकुळीं । प्रतापशाळी वश केले ॥१८०॥तैंहूनि ते धर्मानुचर । होऊनि सेविती युधिष्ठिर । भीष्मप्रमुख हे नृपांचे निकर । पाहती सादर श्रीकृष्ण ॥८१॥सामान्य मानवां समान । वृक्षस्थळीं श्रीनिकेतन । भीमकी सहित हे कृष्णतनु । होती लक्षूनि विस्मित पैं ॥८२॥श्रीवत्सचिह्न इतरां देहीं । कोण्ही देखिलें ऐकिलें नाहीं । यालागीं प्रत्यक्ष शेषशायी । हा यदुगेहीं अवतरला ॥८३॥स्वरूपता मुक्ति दे सप्रेमळा । श्रीवत्स मिरवी हरि एकला । आम्हीं तो प्रत्यक्ष आपुले डोळां । भाग्यें देखिला नृप म्हणती ॥८४॥ऐसे विस्मित नृपांचे गण । त्यांचे हृद्गत अवलोकून । पूजिते जाले रामकृष्ण । तें तूं श्रवण करीं राया ॥१८५॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP