मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर एकदा भातुलेयं वै प्राह राजन्वृकोदरः । न शवतोऽहं जरासंधं निर्जेतुं युधि माधव ॥४१॥कोणे एके समयीं भीम । मातुळपुत्र जो मेघश्याम । तयाप्रति समरकाम । साधनीं अक्षम हें प्रकटी ॥६४॥राया ऐकें कौरवपाळा । म्हणे वृकोदर भो गोपाळा । समर्थ नव्हें मी मागधा खळा । समरीं तया आणावया ॥२६५॥मायानियंता तूं माधव । यावरी न कळे तुझी माव । माझी निःशेष भंगली हांव । समरपातवविजयाची ॥६६॥मागध योद्धा प्रतापी सदट । ऐसा मजसीं कोण्ही सुभट । समरीं न संघटेचि धीट । मजहूनि वरिष्ठ बळिष्ठ हा ॥६७॥ऐसीं वृकोदराचीं वचनें । श्रवणीं ऐकूनि जनार्दनें । मायालाघवी रहस्यसूचनें । करिता झाला तें ऐका ॥६८॥शत्रोर्जन्ममृती विद्वान्जीवितं च जराकृतम् । पार्थमाप्याययन्स्वेन तेजसाऽचिंतयद्धरिः ॥४२॥शत्रु म्हणिजे जरासंध । तयाचें जन्ममृत्यु विशद । स्वयें जाणता श्रीगोविन्द । जीवनकंद सहेतुक ॥६९॥जें बृहद्रथाच्या उभय नारी । दोनी शकलें दोघीं उदरीं । जन्मतां टाकिलीं बाहेरी । विपरीत परी मानूनी ॥२७०॥तेथ जरानामका राक्षसी । नगरीं भ्रमतां माजि निशीं । तिणें योजितां उभयाङ्गांसी । बैसली अनायासीं दृढ संधी ॥७१॥यास्तव जरासंध हें नांव । प्रसिद्ध मिरवी मागधराव । याच्या मरणाचा उपाव । तोही स्वमेव येचि रीती ॥७२॥इतुकें विवरूनि जनार्दनें । भीम पाहिला अमृतनयनें । बळप्रतापौजोगुणें । आपुलेपणें प्रौढविला ॥७३॥आपुल्या तेजें सुतेजस्वी । भीम करूनियां ओजस्वी । मागध वधूनियां यशस्वी । व्हावया दावी गूढ युक्ती ॥७४॥संचिंत्यारिवधोपायं भीमस्यामोघदर्शनः । दर्शयामास विटपं पाट्ययन्निव संज्ञया ॥४३॥दुर्घटशत्रुवधोपाय । बरव्या प्रकारें चिंतिता होय । चिंन्तूनि भीमासि दाविली सोय । कैसी काय तें ऐका ॥२७५॥सफळ दर्शन ज्या कृष्णाचें । झालिया साफल्य बहुजन्मांचें । तो भक्तांच्या छंदें नाचे । हें हरियश वाचे श्रुति गाती ॥७६॥अरिवधोपाय बरवे रीती । हृदयीं चिन्तूनियां श्रीपति । संज्ञेकरूनि भीमाप्रति । सांगे निगुती कैवाडें ॥७७॥दावूनि वृक्षशाखेचे फांटे । चरणीं रगडूनि उधडिजे नेटें । तैसा मागध उधडितां निवटें । संकेत कूटें दाखविले ॥७८॥सूचना जाणोनि भीम बळी । हृदयीं बोधला प्रतापशाली । तदनुसार क्रिया केली । तेही परिसिली पाहिजे ॥७९॥तद्विज्ञाय महासत्त्वो भीमः प्रहंरतां वरः । गृहीत्वा पादयोः शत्रुं पातयामास भूतले ॥४४॥महाबळिष्ठ भीमसेन । कृष्णसंकेत जाणून । समरीं करिती जे प्रहरण । त्यांसि मंडन वीरवर ॥२८०॥मागधा मस्तकें थडकूनि हृदयीं । चरण वोढूनि पाडिला मही । एक चरण रगडूनि पायीं । दुजा द्विबाहीं आकळिला ॥८१॥एकं पादं पदाक्रम्य दोर्भ्यामन्यं प्रगृह्य सः । गुदतः पाटयामास शाखामिव महागजः ॥४५॥दोहीं पायीं एक चरण । भूतळीं रगडिला बळेंकरून । दुसरा दोर्दंडीं कवळून । ऊर्ध्व झोंकूनि उधडिला ॥८२॥झोंक मारितां भीम बळी । सांधा उखळला गुदस्थळीं । आधारचक्राच्या चतुर्द्दळीं । भिन्नता झाली वर्णाची ॥८३॥जैसी चंडद्रुमाची शाखा । बळें कुञ्जर उधडितां देखा । शकलें होती तोचि लेखा । मागथाचा पैं केला ॥८४॥आधार स्वाधिष्ठान मणिपुर । अनाहत विशुद्ध आज्ञाचक्र । त्रिकूट श्रीहट गोल्हाट पर । सहस्रारपर्यंत ॥२८५॥औटपीठ पुण्यगिरी । भ्रमरगुंफेचिये शिरीं । ब्रह्मरंध्रींची खापरी । उधडूनि करी द्वय शकलें ॥८६॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP