मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर न ब्रह्मणः स्वपदभेदमतिस्तव स्यात्सर्वात्मनः समदृशः स्वसुखानुभूतेः । संसेवतां सुरतरोरिव ते प्रसादः सेवाऽनुरूपमुदयो न विपर्ययोऽत्र ॥६॥स्वपरभेदमति तुज । नाहींच हा निश्चय मज । कीं तूं ब्रह्म निरुपाधि सहज । स्वपरभेदवर्जित पैं ॥४१॥स्वपर नाहीं मज कां म्हणसी । तरी ऐकावें इयेविषीं । तूं सर्वात्मा सर्व देशीं । परिच्छेदासी अस्पृष्ट ॥४२॥सर्वात्मका चिदेकरसा । तुजमाजि भेद भाविजे कैसा । जरी तूं म्हणसी दृष्याभासा । विरहित सहसा मी कोठें ॥४३॥तरी तूं सर्वात्मा समदृष्टि । तव संवेदनमात्रें सृष्टि । भूतभौतिकें तुष्टि पुष्टि । यथासंतुष्टि लाहती पैं ॥४४॥म्हणती विषयसेवनें सुख । भूतां भौतिकांलागीं अशेष । तरी तूं विषयीं विषयात्मक । करणभ्रामक होत्साता ॥४५॥तुझेनि पृथ्वी गंधवती । आंगीं वाहे धारण्यशक्ति । त्या गंधाची ग्रहणासक्ती । भौतिकीं भूतीं एकत्वें ॥४६॥तुझेनि जीवन रसाळ जगीं । भौतिकें भूतें रसनामार्गीं । एकात्मसुखाचे प्रसंगीं । चित्सुकरंगीं रंगलीं ॥४७॥तुझेनि तेजा द्योतनशक्ती । शोषणपचनकर्मा व्यक्ति । तुझेनि प्राणा पवना गती । भौतिकीं भूतीं अभेदें ॥४८॥पोकळ गगनीं उमटे ध्वनी । तेथ तव संवेदनेंकरूनी । अर्थावबोधें अंतःकरणीं । पडतां श्रवणीं एकत्वें ॥४९॥यालागीं अभेद स्वसुखानुभूती । तुझी सर्वत्र भौतिकीं भूतीं । ऐसी सर्वत्र प्रतीती । प्रवृत्तिनिवृत्तिमाजि असे ॥५०॥म्हणोनि या कारणास्तव । रागादिवर्गाचा अभाव । तुझ्या ठायीं वर्ते सर्व । दृश्यादिभाववर्जित तूं ॥५१॥तथापि स्वपर भासती जन । तेंही ऐकें विवेचन । निद्रित एकचि देखे स्वप्न । माजि नाना जनपद पैं ॥५२॥तेंवि चैतन्यसागराअंगीं । अविद्याकामकर्मात्मकौघीं । प्रतिबिंबतां जीव तरंगीं । अनेकलिम्गीं भेद गमे ॥५३॥तिये भेदभ्रमभावने । माजि स्वपरमतीचें होणें । तेथ स्वसंकल्पाचेनि गुणें । घडे भोगणें सुखदुःखा ॥५४॥तूं अभीष्टकामकल्पतरु । जे जे होती तुजसमोर । ते ते स्वसंकल्पानुसार । फळसंभार लाहती ॥५५॥कल्पतरूसी नाहीं विषम । परि कल्पितयाचे जैसे काम । तैसींच फळें विषम सम । लाहती निःसीम भेदभ्रमें ॥५६॥एकें कल्पूनि शिबिकायान । सवेग पावला आत्मभुवन । एकें आपणा कल्पूनि श्वान । गेला धांवूनि निजसदना ॥५७॥कल्पनेसारिखीं पावले फळें । सुरदुम विषमत्वा नातळे । तेंवि द्वेषिती अभक्त सळें । भक्त पदकमळें आश्रयिती ॥५८॥उभयां प्राप्ति यथोचित । नोहे विपर्यय निश्चित । ऐसा माझा निश्चय सत्य । तूं हृदयस्थ जाणसी ॥५९॥ऐसें ऐकूनि धर्मवचन । परमानंदें जनार्दन । म्हणे राया तव भाषण । परम धन्य श्रुतिसाम्य ॥६०॥अनुमोदूनि धर्मवचना । म्हणे मद्भक्त कैवल्यसदना । लाहती तें अभक्त जना । प्राप्त नोहे कल्पान्तीं ॥६१॥ऐसा अनुमोदनपूर्वक । बोलता झाला यदुनायक । तें तूं साकल्यें आइक । श्रवणपीयूष रसरसिका ॥६२॥श्रीभगवानुवाच - सम्यग्व्यवसितं राजन्भवता शत्रुकर्शन । कल्याणी येन ते कीर्तिर्लोकाननुभविष्यति ॥७॥शत्रुकर्शन या संबोधनें । भूचक्रजयाचें सामर्थ्य देणें । विजयश्रीचें आविर्भवणें । केलें वरदानें संबोधनीं ॥६३॥सम्यक म्हणिजे बरव्या परी । व्यवसाय धरिला जो अंतरीं । तो तुज कल्याणकीर्तिकारी । निज निर्धारीं जाण पां ॥६४॥जेणें तुझी उत्कर्षकीर्ती । सर्वत्र होईल कल्याणवती । भुवनत्रयामाजि व्याप्ती । विश्वलक्षिती यशोलक्ष्मी ॥६५॥ऋषीणाम पितृदेवानां सुहृदामपि नः प्रभो । सर्वेषामपि भूतानामीप्सितः ऋतुराडयम् ॥८॥सर्वां अभीष्ट हा ऋतुराव । यातें देव पितर ऋषि मानव । आम्हां सुहृदांसीं भूतें सर्व । सादर सदैव इच्छिती ॥६६॥माझा यज्ञ हा संपादीं । म्हणोनि मातें सभासदीं । प्रभुत्व देऊनि वदसी शब्दीं । कवणे विधि मज सांगें ॥६७॥म्यां श्रीकृष्णें अथवा कोण्हीं । काय संपादिजे येऊनी । तुझ्या आंगीं ऐश्वर्यश्रेणी । मखेंद्रसाधनीं स्वतःसिद्धा ॥६८॥मखेंद्राचें साधन काय । तेंही कथितों परिसता होय । सिद्ध करूनि साधनत्रय । मग मखराय आरंभीं ॥६९॥साधनत्रय म्हणसी कोण । यथानुक्रमें करीं श्रवण । आधीं तितुकीं संपादून । मग हा यज्ञ आरंभीं ॥७०॥विजित्य नृपतीन्सर्वान्कृत्वा च जगतीं वशे । संभृत्य सर्वसंभारानाहरस्व महाक्रतुम् ॥९॥राजसूययज्ञविधी । उचित ज्या संभारसमृद्धी । त्या न करितां यज्ञसिद्धी । केंवि हें बुद्धी माजि विवरीं ॥७१॥जगतीमंडळ वश जों नाहीं । तंव संभारसमृद्धि कैंच्या काई । सर्व नृपति जिंकितां मही । होय सर्वही वशवर्तीं ॥७२॥यालागिं राया युधिष्ठिरा । राजे जिंकूनि साधीं धरा । तदुत्थ संपादूनि संभारा । यजीं ऋतुवरा सुरेंद्रवत ॥७३॥जरी तूं म्हणसी येवि विषयीं । मी तुजलागीं प्रार्थितों पाहीं । तरी हें तुजला अवघड नाहीं । ऐक तेंही निरोपितों ॥७४॥एते ते भ्रातरो राजन्लोकपालांशसंभवाः । जितोऽस्म्यात्मवता तेऽहं दुर्जयो योऽकृतात्मभिः ॥१०॥राया तुझे हे अनुज चार्ही । लोकपालांश देहधारी । प्रतापें जिंकूनि दिशा चार्ही । दास्याधिकारी नृपां करिती ॥७५॥चतुर्दिक्षु देऊनि घरटी । राजे जिंकूनि भूतळवटीं । करविती परिचर्याराहाटी । आज्ञा मुकुटीं धरवूनी ॥७६॥ऐसे तुझे हे बंधु चार्ही । भूचक्रविजयाची सामग्री । म्हणसी अजिंक द्वारकापुरी । तरी अवधारीं ये विषयीं ॥७७॥आत्मविजयें तां मज पाहीं । प्रतापें जिंकिलें बैसले ठायीं । या लागीं राया तुझिये गेहीं । करीं सर्वही परिचर्या ॥७८॥अजितात्मका लोकत्रया । सर्वथा दुर्जय मी कुरुवर्या । आत्मविजयें मज ऐसिया । जिंकावया समर्थ तूं ॥७९॥आत्मशब्दें बोलिजे देह । पंचविध करणांचा समूह । ज्ञातृचेष्टा ज्ञानप्रवाह । क्रियादि करणां तन्मात्रीं ॥८०॥तें त्वां शरीर करणें प्राण । वृत्तिचतुष्टय अंतःकरण । वश्य करूनि जिंकिलों पूर्ण । जो दुर्जय गहन आकृतात्मकां ॥८१॥मज जिंकिलें जिये काळीं । तैं तूं जयवान भूमंडळीं । मत्पर मामक महाबळी । त्या आकळी कोण दुजा ॥८२॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP