मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - एकदा तु सभामध्य आस्थितो मुनिभिर्युतः । ब्राह्मणैः क्षत्रियैर्वैश्यैर्भ्रातृभिश्च युधिष्ठिरः ॥१॥कोणे एके दिवसीं धर्म । सभ्येंसहित पुरुषोत्तम । संपादूनि आहनिक नेम । सभासदन प्रवेशलें ॥७॥धर्मराजा सभास्थानीं । विराजमान मुख्यासनीं । धौम्यप्रमुख भोंवते मुनी । नृप वेष्टुनी बैसले ॥८॥दक्षिणभागीं ब्राह्मणपङ्की । चतुर्वेदी देदीप्यव्यक्ती । पावक किंवा ते गभस्ती । भ्राजिष्ठ ज्योतिर्मय गमती ॥९॥वामभागीं पुरुषोत्तम । यशोधनक्षेत्रीं उत्तमोत्तम । वृष्णिभोजान्धकसत्तम । धृतविक्रम धीमंत ॥१०॥अग्रभागीं अमात्यपंक्ती । पौरप्रजाजन शोभती । मुख्य मुख्य वैश्ययाती । मंत्रिवर्ग पृष्ठभागीं ॥११॥ईषदंतरें पार्श्वीं पृष्ठीं । चौघे बंधु धर्मानिकटीं । श्वेत चामरें धरूनि मुष्टीं । मंद माद्रेय वीजिती ॥१२॥सन्नद्ध बद्ध तयां पाठीं । गदा गाण्डीव कवळूनि मुष्टीं । भीमार्जुन प्रतापजेठी । सभास्थानीं विराजती ॥१३॥आणिक ही प्रगल्भ धिषणामंत । धर्मसदनीं बैसणाईत । राया ऐकें ते समस्त । शुक सांगत संक्षेपें ॥१४॥आचार्यैः कुलवृद्धैश्च ज्ञातिसंबंधिबांधवैः । श्रृण्वतामेव चैतेषामाभाष्येदमुवाच ह ॥२॥अनेकव्यवहारशिक्षागुरु । धनुर्विद्यादिदीक्षागुरु । छत्तीस दंडी राजगुरु । मल्लप्रवर द्वंद्वांगी ॥१५॥व्याकरणप्रमुखषडंगवक्ते । वेदांतादिशास्त्रवेत्ते । आयुर्वेदादिपरिज्ञाते । प्रश्नप्रदर्शक दैवज्ञ ॥१६॥इत्यादि वक्तृप्रवराचार्य । क्षत्रिय कुलीन वृद्ध जे आर्य । गोत्रजबंधु सुहृद्वर्य । धैर्यमेरु धुरंधर ॥१७॥ऐसें बसले असतां सदसीं । ऐकतां तयां समस्तांसे । धर्म विवरूनि निजमानसीं । कार्यसिद्धीसी अनुमानी ॥१८॥समस्तां सभ्यां ऐका म्हणे । काय बोले त्यांकारणें । प्रसन्न असतां एकें कृष्णें । असाध्य साधन घडेल ॥१९॥प्रसन्नपणें जें करील कृष्णे । तें कृत्य करूं न शके आन । ऐसें मानसीं निर्धारून । श्रीभगवान आमंत्री ॥२०॥सभ्यांसी म्हणे युधिष्ठिर । आमुचे मनींचा हा निर्धार । कृष्णावांचूनि कोण्ही अपर । कार्य दुस्तर न साधी ॥२१॥जी जी म्हणोनि सभासदीं । राजा पूजिला यथोचित शब्दीं । मग तो युधिष्ठिर विशाळबुद्धी । बोले संसदीं तें ऐका ॥२२॥युधिष्ठिर उवाच - ऋतुराजेन गोविंद राजसूयेन पावनीः । यक्ष्ये विभूतीर्भवतस्तत्संपादय नः प्रभो ॥३॥भो भो स्वामी श्रीगोविंदा । ऐकें आमुचिया मनोरथवादा । राजसूयमखेंद्रें सुरवृंदा । यजूनि मोदा पावेन ॥२३॥म्हणसी सुरवृंद ते कोण । ज्या तव विभूति पुण्य पावन । त्या मी यजीन मखेंद्रें करून । सांग संपादन करीं तें तूं ॥२४॥सार्वभौम जो चक्रवर्ती । हे मनोरथ त्या शोभती । ऐसें म्हणसी जरी श्रीपती । तरी ऐकें विनंती यदर्थीं ॥२५॥त्वत्पादुके अविरतं परि ये चरंति ध्ययंत्यभद्रनशने शुचयो गृणंति ।विंदंति ते कमलनाभ भवापवर्गमाशासते यदि त आशिष ईश नान्ये ॥४॥हो कीं कोण्ही सामान्य नर । परंतु तुझा पादुकाधर । कालत्रयीं निज शरीर । परिचर्यापर सप्रेमें ॥२६॥ध्यान मूर्ति हृदयकमळीं । प्रमोदोत्कर्षें सर्वदा कवळी । तव पदमहिमा सर्वकाळीं । नामावळीसह वर्णी ॥२७॥तव पदप्रेमा म्हणसी कैसा । तरी जो नाशक दरिद्रदोषा । स्मरणमात्रें अभद्र क्लेशां । भंगी निशा रवि जेंवि ॥२८॥जाह्नवीचें जन्मस्थान । अविरत करितां चिन्तन । प्रेमा प्रकटे अघ भंगून । करिती गनन सत्वस्थ ॥२९॥तयांसि म्हणसी काय लाभ । तरी जे तव पादुकावल्लभ । ते भवाचा उपडूनि कोंभ । पावती सुलभ अपवर्ग ॥३०॥जरी ते ऐश्वर्यमनोरथ करिती । ते ते अमोघ आशिष लाहती । तैसे अन्यत्र चक्रवर्ती । लाहों न शकती बहु क्लेशें ॥३१॥ऐसें निर्द्धारें मी जाणें । म्हणोनि प्रार्थीं प्रभूकारणें । स्वभक्तपक्षपाताचें लेणें । आंगीं मिरवणें तें वदतों ॥३२॥तद्देवदेव भवतश्चरणारविन्दसेवानुभावमिह पश्यतु लोक एषः । ये त्वां भजंति न भजंत्युत वोभयेषां निष्ठां प्रदर्शय विभो कुरुसृंजयानाम् ॥५॥भो भो स्वामी देवाधिदेवा । जे कां तुझिया पादाब्जसेवा । तियेचा अनुभव येथ सर्वां । प्रकट करावा ये काळीं ॥३३॥जो हा येथ मर्त्य लोक । त्यामाजि भाविक अभाविक । तब पदभजनाचें कौतुक । पाहोत सम्यक सर्वत्र ॥३४॥तव पादाब्जा जे जे भजती । अथवा द्वेष्टे जे न भजती । त्या उभयतांतें निष्ठा पुरती । दावीं श्रीपती प्रकटूनी ॥३५॥चैद्य मागध कुरु सृंजय । शाल्व सोमक हैहय । गौड मद्रक शिबि कैकय । नृपसमुच्चय हा पाहो ॥३६॥तव पदभवजननिष्ठाबळ । यांसि दाखवीं एक वेळ । भगवद्भक्तिअनादरशीळ । लावीं काजळ तद्वदना ॥३७॥भगवत्पदभक्तीचा महिमा । देखोनि भक्तां उथळे प्रेमा । भक्तचकोरां पूर्ण पूर्णिमा । अभक्तां अमा अभाग्यें ॥३८॥ऐसी उभयां भजननिष्ठा । प्रकटूनि दावीं भो वैकुंठा । जरी तूं म्हणसी अभेदपीठा । वैषम्यचेष्टा या कैंच्या ॥३९॥तरी ऐकें गा जनार्दना । वैषम्यभेदाची भावना । तुज नातळे जेंवि गगना । तुहिनादिकें न शिवती ॥४०॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP