मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर न त्वया भीरुणा योत्स्ये युधिविक्लवचेतसा । मथुरां स्वपुरीं त्यक्त्वा समुद्रं शरणं गतः ॥३१॥युद्ध करावें कोणासीं । जेणें श्लाघ्यता ये आपणासी । तुम्हां ऐसिया पामरांसीं । युद्ध आम्हांसि अयोग्य ॥२००॥कृष्णा कालीचें तूं लेंकरूं । तुझा वाळला नाहीं जारू । दिग्विजयी मी मागधवीरू । नव्हें श्लाघ्यतर तव युद्धीं ॥१॥गरुड शेषेंसी समराङ्गणीं । अश्लाघ्य मारणें त्यां उंडणीं । सिंह शशका मारितां रणीं । धन्य कोणी न म्हणे कीं ॥२॥युद्धीं व्याकुळ चित्तेंकरून । समरीं करिसी पलायन । मथुरा राजधानी टाकून । समुद्रा शरण गेलासी ॥३॥ऐसिया तुजसीं भांडतां मज । वीरमंडळीं पावेन लाज । मातुलहंता तूं निर्लज्ज । मुखाम्भोज दाखविसी ॥४॥एवं तुजसीं युद्ध न घडे । म्हणसी धनंजयासीं भिडें । तोही अतुल्य तुझेनि पाडे । तेंही निवाडें अवधारीं ॥२०५॥अयं तु वयसाऽतुल्योनातिसत्त्वो न मे समः । अर्जुनो न भवेद्योद्धा भीमस्तुल्यबलो मम ॥३२॥अर्जुन कनीयवयसायोगें । परम सूक्ष्म निर्बळ आंगें । समरीं न शोभे वीरविभागें । युद्ध वाउगें येणेंसी ॥६॥अर्जुन योद्धा नव्हे धीर । त्यासीं भिडतां हांसती वीर । भीमही केवळ कोमळ पोर । मजसीं समर या न घडे ॥७॥परंतु तुम्ही ब्राह्मणवेशें । दरिद्री आलेति भिक्षामिपें । याचिलें द्वंद्वयुद्ध आपैसें । तें म्यां कैसें न देइजे ॥८॥समस्त मनोरथ जो तुमचा । तदनुसार केली याञ्चा । तदर्पणीं म्यां गोविली वाचा । देईन साचा युद्ध तुम्हां ॥९॥यालागीं तुम्हां तिघां जणां । भीम कांहींसा आंगवणा । मजसीं तुल्य ऐसें म्हणा । समराङ्गणा माजिवडा ॥२१०॥ऐसे सम्मानूनि ब्राह्मण । कृष्णार्जुनभीमसेन । त्यांमाजि द्वंद्वयुद्धाचा क्षण । भीमालागून दिधला पैं ॥११॥इत्युक्त्वा भीमसेनाय प्रादाय महतीं गदाम् । द्वितीयां स्वयमादाय निर्जगाम पुराद्वहिः ॥३३॥इतुकें बोलूनि मागधें तेणें । विशाळ गदा भीमाकारणें । आणूनि दिधली संतुष्टमनें । दुसरी आपण घेतली ॥१२॥मग वंदूनि कुलदेवता । त्रेताग्निऋत्विजां द्विजां समस्तां । गौरवूनि सुहृदां आप्तां । झाला निघता समरातें ॥१३॥लागली वाजंतरांची घाई । चामरें ढळती दोहीं वाहीं । भीमार्जुनशेषशायी । ब्राह्मणवेशें विराजती ॥१४॥पुराबाहिर निघाला गजरें । रणमही ठाकिली आनंदभरें । द्वंद्वयुद्धाच्या दानाधिकारें । साधनें अपरें निषेधिलीं ॥२१५॥सेनासंभार पार्षद । प्रधान मंत्री अमात्यवृंद । यातें वारुनि जाहला सिद्ध । द्वंद्वयुद्धदानार्थ ॥१६॥ततः समे खले वीरौ संयुक्तावितरेतरौ । जघ्नतुर्वज्रकल्पाभ्यां गदाभ्यां रणदुर्मदौ ॥३४॥शस्त्रास्त्रविद्येचा आखाडा । शिष्यां राजगुरुसंग्रामचाडा । युद्धकौशल्यें शिक्षिती होडा । तो तो पवाडा ठाकियला ॥१७॥लांब रुंद विस्तीर्ण भूमे । मीढुषदेवता वेताळनामी । स्थापूनि संग्रामभिक्षाकामी । अभ्यासनियमीं जे ठायीं ॥१८॥चतुष्कोण चारी भुजा । अरत्निमात्र उच्छ्रित वोजा । पाषाणबद्ध वेदी सहजा । मेखळामंडित रंगमही ॥१९॥मॄदुळवाळुकामय विस्तीर्ण । यथेष्ट विखुरिलें गैरिकाचूर्ण । लहुडी भुशुण्डी गुरु पाषाण । बाहुबळगणनार्थ ॥२२०॥ऐसिये समेखळे भूमी । तिये समयीं संग्रामकामी । वीर पातले पराक्रमी । उद्भटकर्म मदोद्धत ॥२१॥गगनचुंबित रोविले ध्वज । पताका फडकती तेजःपुञ्ज । समरश्रियेची लावण्यवोज । दाविती मत्तगजपडिपाडें ॥२२॥वीरश्रीचूर्णरंगीं डवरले । ठाणठकारें सज्ज झाले । द्वंद्वयुद्धाप्रति वेठले । जेंवि मातले बळसिंधु ॥२३॥कास कसूनि मालगांठीं । वळिल्या केशांच्या वीरगुंठी । गदा पडताळूनियां मुष्टी । युद्धीं जगजेठी मिसळले ॥२४॥दंडीं मणगटीं सुबद्ध बिरुदें । गगन गाजविती सिंहनादेण । वीरश्रीद्योतक वाजती वाद्यें । स्मरती पदें स्वगुरूचीं ॥२२५॥गदा धरूनि स्वकक्षपुटीं । पृथ्वी स्पर्शोनि वंदिती मुकुटीं । मृत्तिका चर्चून्यां ललाटीं । गदा मुष्टी आकळूनी ॥२६॥परस्परें करिती प्रहार । वज्रप्रहारतुल्य कठोर । जेंवि मदोन्मत्त कुंजर । दुर्मदें धीर रणरंगणीं ॥२७॥मंदर भेदिती कठोरप्रहारें । तेंवि त्या गदा जैसीं वज्रें । कीं तीं सुनाभसुदर्शनचक्रें । युद्धीं हरिहरें परजिलीं ॥२८॥गदायुद्धीं अभ्यासशीळ । परीक्षा देती शिक्षाकुशळ । तैसे दुर्मद वीर प्रबळ । करिती तुंबळ द्वंद्वयुद्ध ॥२९॥मंडलानि विचित्राणि सव्यं दक्षिणमेव च । चरतोः शुशुभे युद्धं नरयोरिव रंगिणोः ॥३५॥गदायुद्धाची शिक्षाझडती । तैसी परस्परें परीक्षा देती । रंगीं शिक्षित नट ज्या रीती । तेंवि शोभती समरंगीं ॥२३०॥दक्षिण सव्य पदसंचारी । विवित्र मंडळांचिया परी । गदाप्रहार अभ्यासकुसरी । देती भंवरी परस्परें ॥३१॥जैसे रंगीं नरश्रेष्ठ । तैसेच मागध भीम सुभट । या दोघांचें युद्ध उद्भट । शोभा यथेष्ट पावले ॥३२॥हां हां म्हणोनि हाकिताती । घे घे म्हणोनि संघटती । ओष्ठ रगडूनि घाय हाणिती । साहें म्हणती परस्परें ॥३३॥मस्तकीं हाणिती कठोर घाय । लत्ताप्रहारें मोडिती पाय । जानुप्रहारें चूर्ण हृदय । करूं धांवती क्षोभोनी ॥३४॥श्रावणमासीं जेंवि अबळा । टिपरी घेऊनि खेळती खेळा । तैशा वाजती गदा चपळा । कुरुभूपाळा ते काळीं ॥२३५॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP