मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६९ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६९ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - इत्याचरंतं सद्धर्मान्पावनान्गृहमेधिनाम् । तमेव सर्वगेहेषु संतमेकं ददर्श ह ॥४१॥शुक म्हणे गा परीक्षिति । पावना धर्मातें श्रीपति । इत्यादि आचरणीं त्याप्रति । मुन सत्पथीं अवलोकी ॥५१॥वेदविहित ते सद्धर्म । गृहस्थाचें नित्य कर्म । सर्वां गेहीं मेघश्याम । आचरे त्यातें मुनि देखे ॥५२॥एवं गृहस्थधर्मा पाहीं । एक असतां सर्वां गेहीं । आचरत्यातें देखूनि हृदयीं । मुनि नवायी हे मानी ॥५३॥मुनिनारदें हरि प्रार्थिला । जे मायामोहीं न भुलवीं मजला । ऐसें ऐकूनि अनुग्रह केला । पुत्र मा खिदः म्हणोनियां ॥५४॥अनुग्रह कैसा म्हणसी राया । कृपेनें कथिली निजात्ममाया । धर्मस्थापनाचिया कार्या । लोकशिक्षार्थें नरनाट्य ॥३५५॥तया कृपानुग्रहप्रकाशें । एक होत्साता अनेक वेशें । आपणा दाविलें हृषीकेशें । नारदा ऐसें उमजलें ॥५६॥कृष्णस्यानंतवीर्यस्य योगमायामहोदयम् । मुहुर्दृष्ट्वा ऋषिरभूद्विस्मितो जातकौतुकः ॥४२॥ऐसा अनंतवीर्य श्रीकृष्ण । त्याचें योगमायाचरण । महोदयरूप अनुलक्षून । वारंवार बहु सदनीं ॥५७॥ज्याचा योगमायामहोदय । जाणों न शके श्मशाननिलय । विधाता वज्री विदुषनिचय । तेथ काय अल्पमति ॥५८॥ऐसा असतां विधिनंदना । योगमाया कळली जाणा । हे कृष्णाची अनुग्रहकरुणा । यास्तव मना स्मय मानी ॥५९॥अद्भूतपूर्व हें कौतुक । मानूनि वारंवार सम्यक । विस्मित होय विरंचितोक । हा विवरीं विवेक कुरुवर्या ॥३६०॥इतुकें कथूनि पुढतें काय । शुक नृपातें कथिता होय । तें परिसावया श्रोतृनिचय । चातकन्यायें सादर हो ॥६१॥इत्यर्थकामधर्मेषु कृष्णेन श्रद्धितात्मना । सम्यक्सभाजितः प्रीतस्तमेवानुस्मरन्ययौ ॥४३॥ऐशा प्रकारें कामधर्मार्थ । साधावयाचें परम आर्त । दावी स्वदेहीं भगवंत । श्रद्धावंत होत्साता ॥६२॥तेणें नारद बरव्या परी । भजविला होत्साता स्वशरीरीं । मग सप्रेमप्रीतीकरूनि हरि । अनुस्मरूनि निघाला ॥६३॥स्मरत होत्साता त्या कृष्णातें । अनुलक्षितें विविधें चरितें । वारंवार आठवी चित्तें । गगनपथें जातां तो ॥६४॥त्यावरी नारदें देखिली लीला । एक्या श्लोकें तें कुरुपाळा । प्राञ्जळ प्रेमें शुक बोलिला । तो अर्थ परिसिला पाहिजे ॥३६५॥एवं मनुष्यपदवीमनुवर्तमानो नारायणोऽखिल भवाय गृहीतशक्तिः ।रेमेऽङ्गषोडशसहस्रवरांगनानां सव्रीडसौहृदनिरीक्षणहासजुष्टः ॥४४॥एवं म्हणिजे पूर्वोक्तपरी । मनुष्यनाट्यमार्गकुसरी । अनुलक्षूनि वर्ततशरीरीं । नारायण जो नररूपी ॥६६॥अखिलचराचरांच्या उत्पत्ती । कारणें जो अनेक मूर्ती । धरूनि प्रकटे अनेक शक्ति । अनेकां सदनीं विविधरूपें ॥६७॥अंग ऐसिया संबोधनें । शुकाचार्य नृपातें म्हणे । जो सोळा सहस्र अंगनेक्षणें । रमता झाला सुसेवित ॥६८॥नव्हती समान प्राकृता जना । ज्या कां केवळ वरांगना । सव्रीड सुहृद निरीक्षणा । हास्यविभ्रमें भुलविती ज्या ॥६९॥वरांगना म्हणाल कैशा । निगमोत्तमांगश्रुति सुवेशा । सगुणनिर्गुणभावीं सरिशा । ज्या परेशा अनुसरती ॥३७०॥प्रधानगुणसाम्या जिये म्हणती । पयोब्धिमथनीं सगुणोत्पत्ति । पावोनि रमा रमणीय मूर्ति । सेवी श्रीपति अभिन्नत्वें ॥७१॥तियेचिसरिशा पयोब्धिभवा । अप्सरा सुरांगना ज्या अभिनवा । त्या येथ वरललना केशवा । ललितलाघवा भजविती ॥७२॥सलज्जहास्यनिरीक्षणीं । सप्रेमसौहार्दविनयभाशणीं । सोळा सहस्रा वरांगनीं । अभीष्टक्रीडनीं क्रीडविला ॥७३॥ऐसा तिहीं सेविला हरि । सकळ भावाची उत्पतीवारी । मनुष्यपदवीच्या अनुकारीं । अनेकापरी जो एका ॥७४॥एवं ऐसीं मनुष्यनाट्यें । अभिनवकर्में श्रीवैकुंठें । केलीं तियें जो ऐके पढे । श्रेय घडे तें ऐका ॥३७५॥यानीह विश्वविलयोद्भववृत्तिहेतुः कर्माण्यनन्यविषयाणि हरिश्चकार ।यस्त्वङ्गगायति शृणोत्यनुमोदते वा भवितर्भवेद्भगवति ह्यपवर्गमार्गे ॥४५॥अंग ऐसिया आमंत्रणें । बादरायणि नृपातें म्हणे । अभिनव कर्में केलीं कृष्णें । जीं पढतां वदनें भवहंतीं ॥७६॥विश्वसृजनावनान्तभूतें । असाधारणें जियें कर्में येथें । केलीं न वचती आणिकांतें । कर्ता त्यांतें हरि झाला ॥७७॥नृपातें मुनि म्हणे भो अंग । तीं हरिकर्में जो गाय सांग । अथवा परिसे जो अव्यंग । किंवा अभंग अनुमोदी ॥७८॥श्रोत्यां वक्त्यांतें देखून । नमनें पूजनें सम्मानून । धन्य म्हणोनि अनुमोदन । करितो पावन हरि साम्यें ॥७९॥अव्यभिचारिणी भगवद्भक्ति । अपवर्गातें जे प्रसवती । मोक्षप्रद मार्गाची दाती । करी प्रसरती त्रिजगीं तो ॥३८०॥राया तुज हा संशय एक । सृजनावनान्तकर्में पृथक । विरंच्यादि यां प्रवर्तक । यदुनायक केंवि हेतु ॥८१॥तरी तें मायिक गुणत्रय । तिये मायेसी जो आश्रय । तो हा केवळ अज अव्यय । देवकीतनय हरि येथ ॥८२॥गुणत्रयाची सामर्थ्यशक्ति । तियेचें कारण जे प्रवृत्ति । निजांगें स्फुरद्रूप श्रीपति । दावी ते स्थिति तुज वदलों ॥८३॥विरंचीनें करावें सृजन । तेणें करितां वत्साहरण । वत्सें गोपाळ हरि होऊन । मोहित पूर्ण तो केला ॥८४॥पाहों पातला हरिगरिमेतें । तंव ते गोपाळ वत्सें समस्तें । हरिरूप देखूनि आपणयातें । नेणे स्मृतीतें सांडवला ॥३८५॥अवघे दरारिगदाब्जपाणी । तितुक्या पृथक ब्रह्माण्डश्रेणी । आपुल्या मूर्ति तितुकिया चरणीं । अनेका देखूनि निर्बुजला ॥८६॥कीं उदधीमाजी द्वारका सृजिली । नकळत मथुरा तेथ नेली । कीं रासरसार्थ रजनी केली । विधिष्माण्मासिक निजयोगें ॥८७॥गोपां निकटीं सुप्त गोपिका । रासरंगणी रत सकळिका । एकल्या किंवा पृथक्पृथका । सृजिल्या ऐसें विधि नेणे ॥८८॥मुचुकुन्दासी अनुग्रह केला । पूर्ववेश तैं प्रकटिला । तद्दृक्पातें यवन वधिला । हरवरदाला वंचूनी ॥८९॥कीर्तिश्रवणशुक्लावारी । आत्मप्रकृति जे सुन्दरी । हरिली वैदर्भी नोवरी । विधिहर थोरी हे गाती ॥३९०॥रुक्मिणीचे हरणसंधी । जरासंधादि राजे वरदी । जंकूनि कीर्ति कोणें कधीं । केली ऐसी सांग पां ॥९१॥रुक्मि विटंबूनि समरंगीं । रुक्मिणीमानसातें न भंगी । ऐसा अंतरवेत्ता जगीं । दुसरा कोण दावीं पां ॥९२॥आंगीं सामर्थ्य असतां पुरतें । प्रद्युम्नहरणीं सशोक वर्ते । रुक्मिणीमानस मोही पुरतें । वेत्तृत्व कोणातें हें सांग ॥९३॥भक्तकामकल्पद्रुम । जाम्बवताचा अहंताभ्रम । भंगूनि संतुष्ट आत्माराम । पूर्णकाम तत्सुता वरी ॥९४॥श्वशुरहंता शतधन्वान । त्यासी वधूनि श्रीभगवान । तत्संमतही अक्रूर जाण । स्वभक्त जाणून बुझाविला ॥३९५॥आत्मनिरता नृपात्मजा । त्यांच्या जाणूनि हृदयकंजा । पांचही वरिल्या जाणोनि पैजा । स्वभक्तकाजा कळतळुनी ॥९६॥ऐसा भक्तवत्सल हरि । असाधारणें कर्में करी । केलीं न वचती नरनिर्जरीं । भूचरीं खेचरीं असुरींही ॥९७॥भौमें अदितीचीं कुण्डलें । सहित मणिशृंगही हरिलें । वरूणच्छत्र हिरोनि नेलें । परि विक्रम न चले देवांचा ॥९८॥अमरीं येऊनि द्वारकापुरीं । ग्लानि दावूनि प्रार्थिला हरि । तैं भौमातें समरीं मारी । तें सुरवर स्वपुरीं यश गाती ॥९९॥भामाप्रीतीस्तव सुरतरु । हरितां क्षोभला पुरंदरु । कृतघ्न होऊनि करितां समरु । कृष्णें सत्वर त्या दमिलें ॥४००॥पार्यात आणूनि दिधला भामे । सोळा सहस्र कन्या भौमें । संग्रहिल्या त्या पुरुषोत्तमें । वरिल्या नियमें पृथक्त्वें ॥१॥एके घटींत अवघ्या जणी । वरिल्या पृथक पाणिग्रहणीं । ऐसी असाधारण करणी । केली कोणीं सांग पां ॥२॥तया पाणिग्रहणावसरीं । सर्वां मंडपीं सर्व सामग्री । सृज्ली पृथक्पृथगाकारीं । हे शक्ति पुरी हरिआंगीं ॥३॥सांदीपनीचा पुत्र यमें । नेला त्यातें पुरुषोत्तमें । आणिलें ऐसीं अवनकर्में । आणिक कोणा करवती षैं ॥४॥साक्षात् रुद्रही रक्षणपर । असतां छेदिले बाणकर । समरीं जिंकूनि श्रीशंकर । आणिलें वोहर निजनगरा ॥४०५॥ब्रह्मशापें अंधकूपीं । अधोमुखी सरठरूपी । ऐसिया नृगातें निष्पापी । करूनि स्थापी सुरसद्मीं ॥६॥काशीश्वरात्मज सुदक्षिण । तेणें तोषवूनि ईशान । अभिचारकृत्याहुताशन । द्वारकादहनीं क्षोभविला ॥७॥कृत्यानळाची बोहरी । सुदक्षिणेंसीं काशीपुरी । ऋत्विज आचार्य सहपरिवारीं । जाळी श्रीहरि क्षणमात्रें ॥८॥ऐसी प्रळयात्मकें कर्में । अनेक केलीं पुरुषोत्तमें । एवं गुणत्रयाचीं जन्में । संकल्पनियमें जो प्रकटी ॥९॥प्रस्तुत राया ये अध्यायीं । हरिलीलेची नवनवलायी । कथिली ते त्वां श्रवणालयीं । भरिली कीं ना सांग पां ॥४१०॥येथ षोडश सहस्रां सदनीं । नारदें देखिला चक्रपाणि । विविधा क्रीडा विविधाचरणीं । तुज व्याख्यानीं निवेदिल्या ॥११॥विश्वस्थितिलयसृजनात्मकें । गुणकर्में जीं पृथक्पृथकें । केलीं एकें यदुनायकें । अलौकिकें अघहंतीं ॥१२॥जो या कर्मांतें अनुमोदी । ऐके पढे आणिकां बोधी । तो भक्तीची परम सिद्धि । अपवर्ग साधी हरिभजनीं ॥१३॥इतुकी कथा बादरायणि । परीक्षितीचे घाली श्रवणीं । शौनकसत्रीं रौमहर्षणी । जें वाखाणी सप्रेमें ॥१४॥तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र मुनिगदित । दशमस्कंधीं कृष्णचरित । नारदेक्षिक हरिलीला ॥४१५॥शुकपरीक्षितिसंवादमिषें । जगदुद्धरणास्तव श्रीव्यासें । पारमहंसी संहिता तोषें । पीयूषवल्ली पल्लवली ॥१६॥ऊनसप्ततितम दशमांतील । अध्याय अमरतरूचें फूल । श्रोते होऊनि अळिउळ । हरियशः परिमळरस घेती ॥१७॥एकनाथी प्रतिष्ठानीं । पिंगलाब्दीं अवर्षणीं । प्रौष्ठपदीं सित हरिदिनीं । भाषाटिप्पणी दयार्णवी हे ॥४१८॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायांदयार्नवानुचरविरचितायां षोडशसहस्रहरिलीलावलोकनलालसा नारदनिर्यांपणं नामोनसप्ततितमोऽध्यायः ।शके ॥१६९२॥ विकृतिनामसंवत्सरे फाल्गुनशुक्ल एकादशी प्रभातेधारुरीअध्यायसमाप्त ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ टीका ओव्या ॥४१८॥ एवं संख्या ॥४६३॥ ( एकोणसत्तरावा अध्याय मिळून ओवी संख्या ३२१३५ ) एकोणसत्तरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP