मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६९ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ६९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६९ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर पृष्टश्वाविदुषेवासौ कदाऽऽयातो भवानिति । क्रियते किं नु पूर्णानामपूर्णैरस्मदादिभिः ॥२१॥नारददागमन विदित नाहीं । तया अविदुषापरी पाहीं । त्रिकाळज्ञ शेषशायी । पुसे काई तें ऐका ॥९७॥भवान् म्हणिजे अगा मुनि । केव्हां आलासि द्वारकभुवनीं । काय करावें आम्हीं अपूर्णीं । तुम्हासारिख्या पूर्णांचें ॥९८॥आम्हांसारिखे अपूर्ण जन । तिन्हीं पूर्णांचें दास्याचरण । कैसें काय करावें कोण । योग्यता गौण गमे आमुची ॥९९॥आम्ही कुटुंबी कुटुंबासक्त । स्वामी निष्काम निजात्मरत । आम्ही स्वामीचा पूरवूं हेत । हें अघटित असो पैं ॥२००॥तथापि आमुच्या कल्याणकाजा । आज्ञा करावी जी मुनिराजा । इत्यादिवचनीं प्रार्थि द्विजा । कुरुभूभुजा तें ऐक ॥१॥अथापि ब्रूहि नो ब्रह्मञ्जन्मैतच्छोभनं कुरु । स तु विस्मित उत्थाय तूष्णीमन्यदगाद्गृहम् ॥२२॥आम्ही कुटुंबी भवनिमग्न । तथापि ब्राह्मणा बोले वचन । मम जन्म हें करीं क्षोभन । दास्याचरणें आपुलिया ॥२॥ऐसें ऐकूनि नारदमुनि । विस्मित होत्सा निजमनीं । सवेग उठिला मौनेंकरूनी । अन्य सदनीं प्रवेशला ॥३॥तत्राप्यचष्ट गोविंदं लालयंत सुताञ्शिशून् । ततोऽन्यस्मिन्गृहेऽपश्यन्मज्जनाय कृतोद्यमम् ॥२३॥हरिरमणीचें रमणीय भुवन । मुनि पाहे जंव प्रवेशून । तेथ गोविंद सुतलालन । करी घेऊनि उत्संगीं ॥४॥सस्निग्धप्रेमें चुम्बी वदन । हनु कपोल उदर स्तन । शिशूतें हांसवी स्पर्शून । कमलारमण परमात्मा ॥२०५॥एका बोलवी कलभाषणीं । एका उठवी धरूनि पाणि । एका हांसवी अमृतेक्षणीं । एका धरूनि चालवित ॥६॥ऐसा स्वसुतां शिशूंतें । लालवितां कमलाकान्तें । नारदें देखूनि कौतुकातें । विस्मितचित्तें मग परते ॥७॥या जी मुनि कां परतलां । ऐसें भगवान बोलता झाला । नारद न देऊनि प्रतिवचनाला । रिघता झाला अन्य गृहीं ॥८॥हरीतें त्याचें अभीष्ट विदित । म्हणोनि आग्रह त्या न करित । स्वस्थमानसें शिशु लालित । जेथिंचा तेथ स्थिर राहे ॥९॥नारद अन्य सदनीं पाहे । तेथ कौतुक देखता होये । सहस्रदासींचिया समूहें । हरि भजताहे हरिणाक्षी ॥२१०॥मांडूनि स्फटिकाची चवाई । वरी बैसवूनि शेषशायी । सुगंध स्नेह चर्चिती पाहीं । कुवलयवदना कुरळातें ॥११॥दिव्य सुगंधद्रव्यकर्दम । वनिता लावण्यरसललाम । करीं मर्दूनि मेघश्याम । अतिसप्रेम उटिती ॥१२॥भगवंताची तनु निर्मळ । उटूनि करूं पाहती अमळ । अमळीं सहसा न निघे मळ । चकित मेळ अबलांचा ॥१३॥भरूनि कनकाचीं गंगाळें । उष्णोदक घालिती ढाळें । अभ्यंगोद्योग हा मुनीचे डोळे । चकित झाले देखूनी ॥१४॥पुढें न घालितां पाउला । सवेग मागुती परतला । अन्यसदनीं प्रवेशला । तें कुरुपाळा अवधारीं ॥२१५॥जुह्वंतं च वितानाग्नीन्यजंतं पंचभिर्मखैः । भोजयंतं द्विजान्क्वापि भुंजानमवशेषितम् ॥२४॥कोणे एके सदनीं मुनि । प्रत्यूषकाळीं प्रवेशूनी । काय करी चक्रपाणि । तें निजनयनीं अवलोकी ॥१६॥याज्ञवल्क्यशाखासूत्र । अनुदित होमाचा अवसर । आहवनीयादि कृतविहार । यजी सादर गृहपति ॥१७॥इतुकें देखूनि तया स्थानीं । मागुता पाउलीं परते मुनि । रिघोनि अन्य एके सदनीं । कौतुक नयनीं पाहतसे ॥१८॥तेथ पंचमहायज्ञा अवसर । कक्षेमाजी धरूनि वज्र । महानसाग्नि मणिकोदपात्र । करी श्रीधर संमेलन ॥१९॥आवसथीं महानसाग्नि । एक्या श्वासें मेळवूनी । उद्धृतचरु संस्कारूनी । पंचमहायज्ञी प्रवर्ते ॥२२०॥देवयज्ञ भूतयज्ञ । पितृयज्ञ मनुष्ययज्ञ । ब्रह्मपठनें ब्रह्मयज्ञ । पंचमहायज्ञ मुनि देखे ॥२१॥तेथूनि नकळत मुरडे मुनि । सवेग प्रवेशे अन्य सदनीं । तेथ विप्रांच्या अर्चनीं । चक्रपाणी रत देखे ॥२२॥वेदयज्ञ तपोवतार । पावक भास्कर जे कां अपर । नानाशाखी धरामर । पूजी श्रीधर सद्भावें ॥२३॥पादावनेजनें करूनी । अत्रगंधाद्युपचारश्रेणी । सप्रेमभागें समर्पूनी । परिवेषूनी दिव्यान्नें ॥२४॥शलाटवादिव्यंजनें नाना । नागररामठमरीचिचूर्णा । अनेक संधिता पृथग्लवणा । कुशिंबिरिका बहुविधा ॥२२५॥द्वादश पायसान्नांच्या परी । चरु चित्रान्नें विविधाकारीं । घृतपाचितादि पंचप्रकारीं । बहुविधभक्ष्यें परिवेषिलीं ॥२६॥लेह्यपेयचोष्यखाद्यें । भक्ष्यभोज्यादि षड्विधें । अन्नें अर्पूनि परमानंदें । विप्रवृंदें संतर्पी ॥२७॥वितुषमुद्गदाळीचीं सूपें । हरिद्रालवण्यरामठकल्पें । सद्य गोघृतें अनल्पें । द्विजां साक्षेपें हरि अर्पी ॥२८॥विप्रां जेववितां भगवान । अमृताहूनि गौल्य भाषण । करी क्षणक्षणा प्रार्थन । इतुकें देखूनि मुनिपरते ॥२९॥सवेंचि कोणे एके ठायीं । रिघोनि मुनि पाहे नवायी । तंव तेथेंही शेषशायी । करी कायी तें ऐका ॥२३०॥जेवूनि उठिल्या द्विजांच्या श्रेणी । त्या वर्षती आशीर्वचनीं । भूरी ताम्बूल त्यां अर्पुनी । मग भोजनीं स्वयें बैसे ॥३१॥पाकशाळेमाजी अन्न । विपयज्ञावशिष्ट पूर्ण । पंक्तिकारांसह आपण । करी भोजन यज्ञभोक्ता ॥३२॥दुरूनि इतुकें लक्षी मुनि । मग प्रवेशे आणिके सदनीं । तेथ कौतुक देखे नयनीं । कुरुकुळतरणी तें ऐक ॥३३॥क्वापि संध्यामुपासीनं जपंतं ब्रह्मवाग्यतम् । एकत्र चासिचर्माभ्यां चरंतमसिवर्त्मसु ॥२५॥कोणे एके अन्य सदनीं । हरि तत्पर संध्यावदनीं । उपांशु जपे वेदजननी । वाङ्नियमूनि मौनस्थ ॥३४॥इतुकें देखूनि नारद । अन्य सदनीं पाहे विशद । खड्गखेटकधर गोविंद । देखून मुग्धवत् राहे ॥२३५॥छत्तीस दंडावती विद्या । सान्दीपनिप्रबोधलब्धा । तत्परिशीलनें गोविंदा । उत्साह आद्या जगदीशा ॥३६॥खेटक धरूनि वाममुष्टीं । दक्षिणकरीं कृपाणयष्टि । तदभ्यासाची कसवटी । दावी सृष्टी खङ्गधरां ॥३७॥सरक चवंक बैसका ठाण । तिर्यक वक्र परिवर्तन । वामसव्यप्रहारप्रवीण । अग्रप्रेरण सड्गाग्रें ॥३८॥भ्रमणचापल्य मंडळें । अधोर्ध्वप्रहार करकौशल्यें । परप्रहारें खेटकें विफळें । कीजती सकळें अभ्यस्तें ॥३९॥इत्यादि असिचर्मेंकरून । खड्गविद्यामार्गीं प्रवीण । विचरतां ऐशातें देखोन । मुनि तेथून परतला ॥२४०॥मग प्रवेशे अन्य सदनीं । तेथ प्रशस्त देखे अवनि । हरिकृत कौतुक पाहे नयनीं । कुरुकुळतरणि तें ऐकें ॥४१॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP