मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर यद्वांछया नृपशिखामणयोंऽगवैन्यजायंतनाहुषगयादय ऐकपत्यम् ।राज्यं विसृज्य विविशुर्वनमंबुजाक्ष सीदंति तेऽनुपदवीं त इहास्थिताः किम् ॥४१॥ज्या तुमचिया भजनासाठीं विरक्त भूप कोट्यानकोटी । भववैभवा देवोनि पाठी । लागले वाटीं भजनाचे ॥१६॥तया नृपांचे शिखामणि । श्रेष्ठ श्रेष्ठ वदती वाणी । ते परिसावे चक्रपाणि । जे पुराणीं विख्यात् ॥१७॥अंगनामा पृथूचा आजा । वैन्य पृथूचि गरुडध्वजा । जायंतनामें भरत सहजा । अंबरीषादि सर्वही ॥१८॥नाहुष नाम यदूचा जनक । गयभूपाळ पुण्यश्लोक । ऐसे तव मार्गा अनेक । आश्रयूनियां राहिले ॥१९॥ते दुःखाचें पात्र झाले । ऐसें कोणीं कैं ऐकिलें । तव पदपद्मामृतें धाले । ते समरसले सायुज्यीं ॥३२०॥आमुच्या मार्गा जे आश्रयिती । ते दुःखाचें पात्र होती । ऐसी गोष्टी जे अघडती । शोभे निश्चिती स्वामींतें ॥२१॥असो आणिकी ऐकें परी । आढ्यां अकिंचनां न घडे सरी । आपणा अनुरूप भूप विचारीं । कां हे वैखरी मंद नव्हे ॥२२॥काऽन्यं श्रयेत तव पादसरोजगंधमाघ्राय सन्मुखरितं जनताऽपवर्गम् ।लक्ष्म्यालयं त्वविगणय्य गुणालयस्य मर्त्यासदोरुभयमर्थविविक्तदृष्टिः ॥४२॥तं त्वाऽनुरूपमभजं जगतामधीशमात्मानमत्र च परत्र च कामपूरम् ।स्यान्मे तवांघ्रिररणं सृतिभिर्भ्रमंत्यां यो वै भजंतमुपयात्यनृतापवर्गः ॥४३॥तूं जो अनंतगुणपरिपूर्ण । अनंत अमोघ नामेंकरून । कालत्रयीं विराजमान । जगदुद्धरण यशोगानें ॥२३॥यश वर्णितां उरगपति । पार न पावोनि झाला सुपति । मौनावल्या श्रुति स्मृति । नव नव कीर्ति नाकळतां ॥२४॥ऐसिया तुझा पादाब्जगंध । तव पदभजकां मोक्षप्रद । लक्ष्मीचें जें स्थान विशद । सज्जनवृंद ज्या वर्णी ॥३२५॥त्यातें करूनि अवघ्राण । ऐसियातेंही अवगणून। कोणती वधू असज्ञान । मर्त्यालागून भजतसे ॥२६॥अर्थीं अविविक्त दृष्टि जिची । यास्तव मर्त्यां न जाणेचि । जेथ संपदा बहु भयाची । तया अन्याची प्रीत तिये ॥२७॥यास्तव मरणधर्मिका तेही । पडूनि बहळभवप्रवाहीं । सदैव निमग्न दुःखडोहीं । निश्वरनिरता म्हणोनियां ॥२८॥अगुणत्वदोष आपणाकडे । बोलिलां तेंही वचन कुडें । अचिंत्यानंतगुनपडिपाडें । येर बापुडें कोण तुके ॥२९॥अनुरूप वरीं म्हणोनि वदलां । तरी अनुरूप जाणोनि पूर्वींच वरिलां । त्रिजगदधीश जो दादुला । इहामुष्मिककामद जो ॥३३०॥तया तुम्हांहूनियां थोर । बहळभयाकुळ पामर । अनुरूप वरीं हें उत्तर । जाड्यतर कीं नाहीं ॥३१॥तवांघ्रिपद्माप्रति शरण । मजकारणें हें अनुरूप पूर्ण । असो ऐसें मम प्रार्थन । स्वामीलागोन नित्यत्वें ॥३२॥सृतिशब्दें संसृतीमाजी । देवतिर्यड्मर्त्यराजी । अक्षयसुखार्थ तव पदकंजीं । न भजोनि झाली भ्रमग्रस्त ॥३३॥ तया भमाचें कारण । वेदार्थफळवाद करूनि श्रवण । इहामुष्मिक अभिवांछून । करिती भ्रमण भवस्वर्गीं ॥३४॥पशुबंध सोमचयन पौण्ड्रक । वाजपेय गोमेध हयमेध मुख्य । ज्योतिष्टोमादि मख सम्यक । करूनि याज्ञिक भवीं भ्रमती ॥३३५॥इहामुष्मिक नश्वर फळ । यज्ञाचरणीं क्लेश बहळ । वेदार्थवादांचें देवोनि बळ । संसृतिव्याकुळ त्रिविधत्वें ॥३६॥देवतिर्यड्मानव भ्रमती । त्यांमाजी कोणी तव पदभक्ति । अनुसरतां तो अमृतावाप्ति । लाहे निश्चिती पदभजनें ॥३७॥भवाभास जो हा अनृत । करणगोचर विवर्तभूत । त्याचा अपवर्ग म्हणिजे अंत । इत्थंभूत पदभजनें ॥३८॥ज्या पदभजनास्तव भवनाश । भजकां आत्मत्वीं समरस । ते तव चरण भवभीतांस । शरणागतांस शरण्य ॥३९॥अनुरूप म्हणिजे भजनायोग्य । सर्व भयाचा जेथ भंग । जाणोनि म्यां वरिला श्रीरंग । जडतां ममाङ्ग न शिवे पैं ॥३४०॥आणिक प्रभूची विपरीत उक्ति । रोषें निरूपी भीमकी सती । लोकपाळांच्या नृपविभूति । त्या तुज वांछिती सप्रेम ॥४१॥बलाढ्य धनाढ्य गुणाढ्य भूप । रूपें स्मराचा करिती लोप । ज्यांचा अचाट वीर्यप्रताप । गुणगण अमूप जयांचे ॥४२॥ऐसे ही जे तुज वांछिती । उपेक्षूनियां तयांप्रति । आम्हां वरिलें हें निजमतीं । अयुक्त सर्वांर्थीं क्दलेती ॥४३॥याचें उत्तर देतिये समयीं । ईर्ष्या उदेली भीमकीहृदयीं । सशाफ अंगुलिभंगें पाहीं । वदती दोहीं श्लोकार्थीं ॥४४॥तस्याः स्युरच्युत नृपा भवतोपदिष्टाः स्त्रीणां गृहेषु खरगोश्वबिडालभृत्याः ।यत्कर्ममोलमरिकर्षण नोपयायाद् युष्मत्कथा मुडविरिंचसभासु गीताः ॥४४॥त्वक्श्मश्रुरोमनखकेशपिनद्धमंतर्मांसास्थिरक्तकृमिविट्कफवातपित्तम् ।जीवच्छवं भजति कांतमतिर्विमूढा या ते पदाब्जमकरंदमजिघ्रती स्त्री ॥४५॥जळो तें दुर्भगेचें वदन । म्हणे अंजलि भंगून । जे विषयान्ध मूर्ख अज्ञान । ते तीलागून वर होत ॥३४५॥ते कोण ऐसें म्हणाल स्वामी । जे उपदेशिले प्रेमसंरंभीं । जे निरंतर स्त्रियांचे सद्मीं । वर्तती कर्मीं तिर्यग्वत् ॥४६॥अच्युतैश्वर्यविराजमान । यालागीं अच्युत संबोधन । देऊनि निरूपी नृपांचे गुण । परमसज्ञान वैदर्भी ॥४७॥तुम्हीं उपदेशिले जे राय । तयांचें ऐश्वर्य सांगों काय । स्त्रियांचे सदनीं तिर्यक्प्राय । वर्तती सोय ते ऐका ॥४८॥केवळ रासभाचिये परी । प्रपंच ओझें वाहती शिरीं । किम्वा बलीवर्दाचे परी । गृहव्यापारीं कृषीवलवत् ॥४९॥वेसणीसहित विषाणीं दोरा । लावोनी जुंपिती नांगरा । पूर्व पश्चिम प्रपंचफेरा । करवितां प्रहारा करिताती ॥३५०॥किंवा श्वानाचिये परी । नित्य जागती स्त्रियेचिये द्वारीं । अपर देखोनियां गुरगुरी । स्त्रीशरीरीं लुलुवत ॥५१॥धिक्कारिल्या दुरी न वचे । निर्भर्त्सिल्या मनीं न कांचे । लुलूकरूनि बोले वाचे । जेंवि श्वानाचे कुयीं शब्द ॥५२॥तुकडा देखोनि पुसाटी हलवी । तेंवि स्त्रियेच्या रुचिरावयवीं । वक्रकटाक्षें नयन गोवी । मानी नयनीं श्लाघ्यत्व ॥५३॥हाडी म्हणतां लोळण घाली । चुचुकारितां गोंडा घोळी । मिटक्या देवोनि चाटी अवाळी । स्त्रीमुखाजवळी श्वानवत् ॥५४॥डोळे मिचकावूनि पाहे । अवमानिलें तितुकें साहे । पुढतीं आश्रयूनियां पाय । श्वानप्राय लुडबुडती ॥३५५॥छो म्हणतां पाठी लागे । हाडी म्हणतां राहें उगें । तैसे स्त्रियेच्या वचनासंगें । होती सवेगें रुष्ट तुष्ट ॥५६॥मारूं जातां पायीं लोटे । तोंडें विचकूनि होय उफराटें । लोटूनि देतां बळेंचि भेटे । अनेक कूटें सोसूनी ॥५७॥असो ऐसे श्वानापरी । अवमान साहती स्त्रियांचे घरीं । याहूनियां नीचतरीं । साम्य मार्जारीं अनुकरिती ॥५८॥ताटाभोंवतें मांजर फिरे । तेंवि भोंवते घालिती फेरे । मेऊं शब्दाच्या अनुकारें । नर्मोत्तरें टोंकती ॥५९॥याहूनि नीचतर राहटी । मांजर जैसें पोटासाठीं । वधी क्षुद्रजीवांच्या थाटी । तसे सृष्टी हिंसक जे ॥३६०॥एके स्त्रियेची पुरवितां आशा । भंगिती बहुतांच्या मानसा । न मानिती हिंसादोषा । भोगलालसाव्यापारीं ॥६१॥अथवा स्त्रियांचिये घरीं । नीचकार्यें किंकरापरी । अष्टौ प्रहर ओरबारीं । जे संसारीं रबडती ॥६२॥ऐसे जे हे क्षुद्र नृपति । स्वमुखें बोधिले जे यदुपति । ते त्या दुर्भगा स्त्रियांचे पति । असोत निश्चिती दैवबळें ॥६३॥त्या दुर्भगा म्हणाल कैशा । जेणें श्रवणीं तुमचिया यशा । ऐकोनि महिमा तव मानसा । नाहीं आपैसा अनुभविला ॥६४॥तंव तव महिमा गोचर नेसा । नृपवल्लभता प्रियतम असो । तवगुणकीर्तनविमुखां भासो । विषय पीयूषापडिपाडे ॥३६५॥म्हणसी मत्कथा कोणा रुचती । तरी मृडानीमृड कैलासपति । स्कंद नंदिकेश्वर अगस्ति । संवादती शिवसदनीं ॥६६॥तैसेचि विरंचिसभेमाजी । सनकादि नारद तुम्बुरु सहजीं । वर्णितां तच्छ्रवणें हृदयाब्जीं । महर्षिप्रमुख निवताती ॥६७॥शक्रसदनीं बृहस्पति । प्रह्लादप्रमुखां शुक सुमति । भोगभुवनीं वासुकीप्रति । निरूपिती कमलाश्व ॥६८॥विष्णुभक्तीं भूमंडळीं । तव गुणगरिमा स्थळोस्थळीं । वाखाणितां सप्रेमळीं । सावध श्रवणीं प्राशिजेत ॥६९॥ऐसें तव गुणकथामृत । जीचिया श्रवणीं नाहीं प्राप्त । ते नश्वर नृपातें कान्त । करूनि एकान्त भोगो पैं ॥३७०॥तवपदकमळींचा मकरंद । श्रवणमानसा अनुपलब्ध । घ्राणें सेविती जेंवि षट्पद । तेंवि तन्मोद जी नेणे ॥७१॥तेचि वनिता मूढमति । भुलूनि नृपाचिये संपत्ती । कान्त मानूनि जीवत्प्रेतीं । सप्रेमरतिरुचिरत्वें ॥७२॥जैसे मृत्तिकेचे गोळे । पुरुषाकारें करकौशल्यें । लेप्यें श्रृंगारिताति कुशलें । भुलती अबळें लावण्या ॥७३॥तैसें सजीव नरवरमडें । चर्में मढिलें चहूंकडे । मूर्धज कुंतळ स्मश्रु खांडें । समांस हाडें माजिवडीं ॥७४॥लावण्य भासे श्याम गौर । तो त्वच्चारंग बाह्याकार । माजी भरलें कुत्सिततर । तोही प्रकार अवधारा ॥३७५॥रक्तपूर्ण शिरांच्या सूत्रें । आपाद वेष्टिलीं सर्वगात्रें । आंत भरलीं विष्ठामूत्रें । दुर्गंधीपात्रें ज्यापरी ॥७६॥वातपित्तकफादि रोग । शरीरमात्रीं यांचा योग । न्यूनाधिक्यें होती सरोग । सुखदुःखभोग अनुभविती ॥७७॥वदनीं प्रवाह चाले लाळे । सर्वदा घ्राणें श्लेष्मा गळे । चिपडीं चिपडी होती डोळे । श्रवणीं मळें दुर्गंधि ॥७८॥शिश्नद्वारें मूत्र पाझरे । स्त्रीचिंतनें वीर्य क्षरे । श्वास सांदितां अधोद्वारें । घ्राण घाबरें त्यां गंधें ॥७९॥कृमि जंतु यूका लिखा । सबाह्य बुचबुचिती पैं देखा । ऐसियांच्या आश्लेषसुखा । भजती मूर्खा मंदमती ॥३८०॥तव पदकंजींचा सुवास । अवघ्राण नाहींच ज्यांस । त्याचि सजीवा नरकुणपास । भजती संतोष मानूनी ॥८१॥आढ्या टाकूनि औदासीन्य । वरणें तेंचि अनुचित पूर्ण । ऐसें बोलिले श्रीभगवान । ऐका वचन तद्विषयीं ॥८२॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP