मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - एतावदुक्त्वा भगवानात्मानं वल्लभामिव । मन्यमानामविश्लेषात्तद्दर्पघ्न उपारमत् ॥२१॥व्यंग्योक्तीचें उपसंहरण । मुख्यत्वें हेंचि तत्कारण । इतुकीं वाक्यें श्रीभगवान । बोलोनि इत्यर्थ जो धरिला ॥१५०॥भगवंताच्या प्रेमगुणें । भीमकी जाणे स्वलावण्यें । सर्वांहूनि प्रियतमपणें । मजकारणें हरि मानी ॥५१॥ऐसा वैदर्भीचा दर्प । निरसावया मन्मथबाप । उपहासवाक्यांचा कलाप । इतुका बोलोनि आवरिला ॥५२॥इतुकें कृष्ण बोलिल्यावरी । भीष्मकरायाची कुमारी । विदर्प होवोनि अभ्यंतरीं । मानी मेरु कोसळला ॥५३॥इति श्रीलोकेशपतेस्तदाऽऽत्मनः प्रियस्य देव्यश्रुतपूर्वमप्रियम् ।आश्रुत्य भीता हृदि जातवेपथुश्चिंतां दुरतां रुदती जगाम ह ॥२२॥त्रैलोक्याचा नायक हरि । निजवल्लभ तो व्यंग्योत्तरीं । बोलतां भंगली अभ्यंतरीं । तें अवधारीं नृपवर्या ॥५४॥जन्मापासूनि जो प्रियतम । तयाच्या वदनें वाक्यें विषम । ऐकतांचि भंगलें प्रेम । मानसीं श्रम संचरला ॥१५५॥द्योतमाना रुक्मिणी देवी । जिणें हीं वाक्यें कदापि पूर्वीं । ऐकिलीं नव्हतीं तीं ऐकूनि जीवीं । चिह्नें भयाचीं उमटलीं ॥५६॥हृदयामाजी खोचली वेगीं । कंप दाटला सर्वांङ्गीं । जलप्रवाह नेत्रमार्गीं । करणवर्गी वैकल्य ॥५७॥जयेसि नाहीं पैल पार । ऐसी दुस्तर चिंता घोर । पावती झाली पैं सकुमार । तो चिह्नप्रकार अवधारा ॥५८॥पदा सुजातेन नखारुणश्रिया भुवं लिखंत्यश्रुभिरंजनासितैः ।असिंचती कुंकुमरूषितौ स्तनौ तस्थावधोमुख्यतिदुःखरुद्धवाक् ॥२३॥नखशशाङ्ककलाकिरण । तिहीं रंजित पदतळ अरुण । तया चरणें भूलेखन । करीत राहिली तटस्थ ॥५९॥कज्जलमिश्रित अश्रु स्रवती । सजल कृष्ण कर्दमें क्षिति । टपटपां सिंपीत होत्साती । अधोमुखी स्फुंदतसे ॥१६०॥डबडबूनि आला धर्म । तेणें द्रवलें कुचकुंकुम । तत्कर्दर्में अंषुकोत्तम । शोणायमान भासतसे ॥६१॥नयनींचे सकज्जल बाष्पबिंदु । श्वेतवसनीं स्रवती विशदु । शोण सकुंकुम कुचस्वेदु । वसन भेदूनि प्रकटला ॥६२॥सितासिता उभय सरितां । माजी सरस्वती ते शोणता । त्रिवेणीसंगम हृदयावरुता । माधव नेत्रीं अवलोकी ॥६३॥भगवन्मुखींचें अप्रिय वचन । परम कडवट मरणाहून । श्रवणीं पडतांचि खिळिलें वदन । पडिलें मौन वैखरिये ॥६४॥याहूनि विशेष जे अवस्था । पावती झाली वैदर्भसुता । ते तूं ऐकें कौरवनाथा । म्हणे वक्ता शुकयोगी ॥१६५॥तस्याः सुदुःखभयशोकविनष्टबुद्धेर्हस्ताच्छ्लथद्वलयतो व्यजनं पपात ।देहश्च विक्लवधियः सहसैव मुह्यन्रंभेव वायुविहता प्रविकीर्य केशान् ॥२४॥सुदुःख म्हणजे काय म्हणसी । तरी अप्रियवाक्यश्रवणासरसी । महाभय काळजी मानसीं । आनंदकोशीं झळंबली ॥६६॥अप्रियोक्तीचें नसतां काज । आजि कां वदला गरुडध्वज । यावरी माझ्या त्याग सहज । हें दृढ बीज शंकेचें ॥६७॥सशोक ऐसिये शंकेकरूनी । अनुतापवितर्क करितां मनीं । बुद्धि गेली हारपोनी । धैर्यापासोनि सांडवली ॥६८॥विगतधैर्यें रुक्मिणीचीं । हस्तापासूनि वलयें साचीं । गळोनि पडलीं परी तयांची । शुद्धि अणुमात्र नुपलभे ॥६९॥धरिला होता वालव्यजन । गळोनि पडला हस्तांतून मुखभा गेली हारपोन । विवर्ण वदन रुदनेंसी ॥१७०॥अकस्मात पावली मोह । मूर्छा वैकल्य जाकळी देह । तया सांवराया रोह । अधैर्य धैर्या करूं न दे ॥७१॥प्रचंडवातें जैसी कदळी । तेंवि उलथली भूमंडळीं । सुटली केशांची मोळी । ते वदनपाळी विखुरली ॥७२॥ऐसी चिह्नें वल्लभेआंगीं । देखोनि कळवळिला शार्ङ्गी । प्रेमवात्सल्य ये प्रसंगीं । श्रीशुकयोगी वर्णितसे ॥७३॥तद्दृष्ट्वा भगवान्कृष्णः प्रियायाः प्रेमबंधनम् । हास्यप्रौढीमजानंत्यः करुणः सोऽन्वकंपत ॥२५॥आपुल्या वाग्बाणीं भेदलें हृदय । तेणें रुक्मिणी प्रेतप्राय । तें देखोनि यादवराय । परम सदय कळवळिला ॥७४॥नेणोनि हास्यरहस्यखोली । भीमकी वाग्बाणीं भंगली । ऐसियेवरी करुणा आली । मग आदरिली अनुकंपा ॥१७५॥पूर्विलाहूनि प्रेमा वृद्धी । पावे ऐसी लक्षूनि बुद्धि । करिता झाला कृपानिधि । तें शुक बोधी नृपातें ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP