मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६० वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ६० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ६० वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर त्वत्पादपद्ममकरंदजुषां मुनीनां वर्त्मास्फुटं नृपशुभिर्ननु दुर्विभाव्यम् ।यस्मादलौकिकमिवेहितमीश्वरस्य भूमंस्तवेहितमथो अनु ये भवंतम् ॥३६॥त्वत्पदपद्मामोद भ्रमरा । होवोनि सेविती जे मुनिवर । त्यांचाचि मार्ग नेणती नर । जे पामर पशुरूपी ॥६९॥नराकार पशूंच्या व्यक्ति । विवेकशून्य विषयीं रमती । आहारनिद्राभयस्त्रीरति । ते कैं जाणती मुनिपदवी ॥२७०॥त्वत्पदपद्मभजकांचा आचार । नरपशूंतें अगोचर । मा तूं केवळ परमेश्वर । त्वत्पथ गोचर केंवि तयां ॥७१॥पिहित मार्ग तव भजकांचा । अलौकिक यालागीं साचा । म्हणोनि अस्पष्ट मार्ग तुमचा । बोलिला वाचा तो सत्य ॥७२॥अस्पष्टमार्गी यालागिं आम्हां । आश्रयिती ज्या सकाम वामा । त्या भोगिती दुःखधामा । ऐशिया नर्मा वदलां जे ॥७३॥याचें उत्तर श्लोकान्तरीं । देइजेल श्रीमुरारि । निष्किंचनत्व तज्जनमित्रीं । आढ्यत्व दुरी परिहरित ॥७४॥निंष्किंचनो ननु भवान्न यतोऽस्ति किंचिद्यस्मै बलिं बलिभुजोऽपि हरंत्यजाद्याः ।न त्वा विदंत्यसुतपोंऽतकमाढ्यतांधाः प्रेष्ठो भवान्बलिभुजामपि तेऽपि तुभ्यम् ॥३७॥आम्ही निष्किंचन म्हणोने । यथार्थ वदली प्रभूची वाणी । आढ्य निष्किंचनालागोनी । न भजती स्वप्नीं भो सुभ्रू ॥२७५॥तुम्हांवांचून किञ्चिन्नाहीं । हें अकिंचनत्व तुमचे ठायीं । पूज्यापूज्य जें जें कांहीं । भजती तेंही पद तुमचें ॥७६॥बळिनामें बोलिजे पूजा । तुम्हां जे अर्पिती बरवे वोजा । परस्परेंचि गरुडध्वजा । प्रियतम ते तुम्हां त्यांसि तुम्ही ॥७७॥विद्याधनबळें मदाढ्य मूढ । प्राणतर्पक विषयीं रूढ । ते कैं जाणती हृदयस्थ गूढ । अंतक प्रौढ मदर्ता ॥७८॥आढ्यपनेंचि जे मदान्ध । विषयनिष्ठ बुद्धिमंद । काळात्मया तुझा त्यां बोध । न घदे प्रसिद्ध त्रिवाचा ॥७९॥यालागीं निष्किञ्चनजनप्रिय । बोलिलां तैसेंचि सत्य होय । आध्य नेणती तुमची सोय । हाही प्रत्यय प्रत्यक्ष ॥२८०॥आढ्य नभजती अकिंचना । ऐशिया अस्पष्टमार्गभजना । भजती सकाम ज्या अंगना । त्या दुःखभाजना निरंतर ॥८१॥एवं उभयतां असम घटित । करणें केवळ हें अनुचित । या वाक्याचा इत्थंभूत । विवरी अर्थ वैदर्भी ॥८२॥तो परिसिजे श्रोतीं चतुरीं । वाखाणिजेल शुकवैखरी । मराळप्राय क्षीरनीरीं । श्रवणचुंचुव्यापारें ॥८३॥त्वं वै समस्तपुरुषार्थमयः फलात्मा यद्वांछया सुमतयो विसृजंति कृत्स्नम् ।तेषां विभो समुचितो भवतः समाजः पुंसः स्त्रियाश्च रतयोः सुखदुःखिनोर्न ॥३८॥( येथे ८४ नं. नाही. )समस्त पुरुषार्थांचें फळ । सुकृतोत्थित जें सुख केवळ । तो तूं परमनंदबहळ । आत्मा निर्मळ सर्वगत ॥२८५॥ऐशिया तुझिया वांछेकरून । सुमति जे जे मुनि सर्वज्ञ । सेव्यसेवकभावाभिज्ञं । सुखसंपन्न भजताती ॥८६॥ते निष्काम कामरहित । उचित भोगिती तव एकान्त । स्त्रीपुम्भावें मिथुनीभूत । सकाम दुःखित सत्यचि हें ॥८७॥इहामुष्मिकविषयगोडी । कामिनी कामुक कामनाप्रौढी । रमती ते मग दुःखकोडी । भोगितां घडिघडी रडताती ॥८८॥हेंचि अनुचित सर्वांपरी । यथार्थ स्वामीची वैखरी । भिक्षुस्तवनें उगाचि थोरी । ते यावरी परिहरिते ॥८९॥त्वं न्यस्तदंडमुनिभिर्गदितानुभाव आत्माऽऽत्मदश्च जगतामिति मे वृतोऽसि ।हित्वा भवद्भ्रुव उदीरितकालवेगध्वस्ताशिषोऽब्जभवनाकपतीन्कुतोऽन्ये ॥३९॥नेणोनि न विचारूनि सोय । भीमकी मातें वरिलेंसि काय । बुद्धिमंदत्वें दोषद्वय । आरोपिलें जें स्वामीनें ॥२९०॥ऐका तयाचा परिहार । म्यां जो निर्दोष विचार । करूनि धरिला तुमचा कर । तोही प्रकार अवधारा ॥९१॥आत्मा सर्वां प्रियतम पूर्ण । तो तूं जगदात्मा श्रीभगवान । वृथा नव्हेचि तुझें वचन । मुनि सर्वज्ञ वर्णिती जें ॥९२॥तूतें जाणोनियां सर्वग । जिहीं केला दंडत्याग । तव वर्णनीं वेंठले चांग । समरसरंग लाहूनी ॥९३॥त्यांचें वर्णन नव्हे वृथा । कीं ते उचितचि सर्वगता । सर्व भूतीं एकात्मता । परमात्मया जगदीशा ॥९४॥ज्याचिया आनंदमात्रें करून । अन्य भूतां उपजीवन । तो म्यां वरिलासि अमृतघन । नाहीं नेणोनि भ्रमलें पैं ॥२९५॥हा दोष लाविला मजकडे । परन्तु असो घडेल तिकडे । अधिक सहसा न वदें तोंडें । सप्रेम चाडे तथापि हें ॥९६॥लोकपाळांचिया विभूति - । संपन्न राजे तुज वांछिती । त्यांतें त्यजिलें मंदमति । हा दोष निश्चिती मज न लावा ॥९७॥तुम्हांपासोनि जे जे अवर । वरिष्ठविधि भवशक्रादि अमर । काळकळनेचा वाहती घोर । व्याकुळतर सुखदुःखें ॥९८॥तुजपासोनि उदया आला । तो काळ सर्वां ग्रासिता झाला । विधिहरांच्या मनोरथाला । विध्वंस केला पैं ज्यानें ॥९९॥विधिहरांचीं आशीर्बळें । प्रतापें भंगिलीं जया काळें । तेथ कायसीं नृपांचीं कुळें । तुच्छें विकळें भवग्रस्तें ॥३००॥जो सिंहाची नरडी मुरडी । त्यापुढें केउती मशकप्रौढी । एवं नृपकुळें बराडी । सकाम वेडीं मम लोभें ॥१॥ऐसें विवरूनियां चित्तीं । म्यां त्यागिलें नृपांप्रति । मज म्हणितलें मंदमति । तद्दोषनिवृत्ति हे केली ॥२॥बुद्धिमंदत्व माझिये माथां । बोलिलां तें परिहारितां । यावरी कोणीकडे जडता । दिसोनि आली तें विवरा ॥३॥आपुल्या दोषाची निवृत्ति । करूनि बोलती झाली पुढती । म्हणे स्वामी ऐका विनती । व्यंग्य नर्मोक्ति ज्या वदलां ॥४॥आपुली सर्वज्ञता लोपून । सद्गुणप्रतापा आच्छादून । क्षुद्रपुरुषांचें गुणवर्णन । स्वमुखें निंदून आपणातें ॥३०५॥इत्यादि वचनीं माझ्या ठायीं । प्रदीप्त कोप करूनि पाहीं । प्रेमकलहाची नवाई । ते चतुराई तुम्हां योग्य ॥६॥अनन्य अवंचक स्वपदनिरता । विदित असतां सर्वगता । वंचूनि स्वगुण ऐसिये छळितां । आली जडता कोणीकडे ॥७॥ जाड्यं वचस्तव गदाग्रज यस्तु भूपान्विद्राव्य शार्ङ्गनिनदेन जहर्थ मां त्वम् ।सिंहो यथा स्वबलिमीश पशून्स्वभागं तेभ्यो भयाद्यदुदधिं शरणं प्रपन्नः ॥४०॥अजां अविकां पश्वादिकां । शूकरां वानरां ऋक्षां शशकां । गजव्राघ्रादिवृकजंबुकां । आमिषभागार्थ झोंबतां ॥८॥त्यांमाजि प्रतापें मृगेन्द्र जैसा । तयां विध्वंसी गर्जनेसरिसा । धाकें पळती दाही दिशा । मग आपैसा बळि हरी ॥९॥तैसेंचि तुवां कौण्डिन्यपुरीं । ज्याबद्धशार्ङ्गटणत्कारीं । जरासंधादि भूपें समरीं । पळती घाबरीं पशुसाम्यें ॥३१०॥नृपें भंगिलीं जीं किंमात्रें । पळालीं प्राणावशिष्टगात्रें । झालीं अपयशाचीं पात्रें । हें म्यां स्वनेत्रें देखिलें ॥११॥तयांमाजूनि आपुला भाग । मजला मानूनि रमांश चांग । जाणोनि आपुलें अर्धाङ्ग । हरण केलें प्रतापें ॥१२॥तयां पामरां नृपांभेणें । समुद्रा शरण ठालों म्हणणें । जाड्य मान्द्य या भाषणें । म्हणावें कोणें परकीयें ॥१३॥आणि अस्पष्टवर्त्मनां आम्हां । ज्या ज्या आश्रयिती पैं वामा । त्या त्या पात्र होती भ्रमा । मेघश्यामा हें वदलां ॥१४॥हेंही मान्द्याचिमाजी पडे । बोलें न शकवे जरी भिडे । प्रमसंरंभाचिये चाडे । बोलणें आवडे तरी ऐका ॥३१५॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP