मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर सोऽग्निस्तुष्टो धनुरदाद्धयाञ्श्वेतान्रथं नृप । अर्जुनायाक्षयी तूणौ चर्म चाभेद्यमस्त्रिभिः ॥२६॥अरोग केला जो कृशान । तो होऊनि संतुष्टमान । पार्थालागीं गाण्डीवसंज्ञ । देता जाला कोदंड ॥८६॥क्षीरोदसंभव अश्व रत्ना । समान जवीन क्रमिती गगना । दिव्य तुरंग ते स्यंदना । सहित अर्जुना समर्पी ॥८७॥अक्षयसायकमंडित तूण । अभेद्यचर्म म्हणिजे वोडण । परशरघातें नोहे भिन्न । इत्यादि अर्पण करूनियां ॥८८॥म्हणे मज तुमचा उपकार फार । उत्तीर्ण नोहें मी अणुमात्र । येथूनि तुमचा आज्ञाधर । स्मरतां तत्पर सेवेसी ॥८९॥ऐसी ऐकोनि पावकवाणी । पाण्डव आणि चक्रपाणि । पावकालागीं मधुरवचनीं । गौरवूनियां बोळविला ॥१९०॥असो अग्नीची हे गोष्टी । यावरी ऐकें मयराहटी । तेणें प्रार्थूनियां जगजेठी । नमिला किरीटी नतमौळें ॥९१॥मयश्च मोचितो वह्नेः सभां सख्य उपाहरत् । यस्मिन्दुर्योधनस्याऽऽसीज्जलस्थलदृशिभ्रमः ॥२७॥अग्नीपासूनि वांचविला । म्हणोनि उपकारें दाटला । प्रत्युपकरणा अर्पिता जाला । सभा निर्मूनि निजसखया ॥९२॥मय असुराचा विश्वकर्मा । तेणें सभा परमोत्तमा । गौण जियेपुढें सुधर्मा । हेमललामात्मक अवघी ॥९३॥दुर्योधनासि जिये ठायीं । स्थलजलभ्रांति झाली पाहीं । पतन होतां नृप सर्वही । ललनादिकांहीं स्मय केला ॥९४॥हास्य करितां लहान थोर । तेणें सलज्ज धार्तराष्ट्र । कांति उतरोनि काळें वस्त्र । कांपे थरथर सक्रोधें ॥१९५॥पाण्डवीं बहुधा सम्मानिला । परि तो हृदयीं सशल्य जाला । जेंवि कां सर्पें डाव धरिला । तेंवि दुःखाला विसरेना ॥९६॥असो पाण्डवाकडील कथा । अपार भारत न सरे कथितां । वैशंपायन तुझिया सुता । होईल कथिता व्यासाज्ञा ॥९७॥यानंतरें श्रीभगवान । मय पावक दोघे जण । विसर्जूनियां सभासदन । पाहोनि संपूर्ण संतोषे ॥९८॥एवं आनंदें इंद्रप्रस्थीं । धर्मा निकटीं करितां वसती । देवकी वसुदेव हलधर चित्तीं । आठवी श्रीपति औत्सुक्यें ॥९९॥मग पुसोनि कुरुनरेशा । नमस्कारूनि पितृष्वसा । हस्तें स्पर्शोनि द्रौपदी शिरसा । आज्ञा घेता हरि जाला ॥२००॥संकेतमात्रें प्रस्थानभेरी । सवेग वाहूनियां कुंजरीं । मुहूर्तें ठोकितां तयांच्या गजरीं । जाली परिवारीं लगबग ॥१॥सारथि जुंपिती रहंवर । मंदुरशाळेतें मादुर । सज्जिले अंबष्ठीं कुंजर । पदाति वीर सिद्ध जाले ॥२॥सेना निघाली बाहेर । पश्चिम मार्गें चालिले भार । धर्मराजें श्रीयदुवीर । बोळविला तो अवधारा ॥३॥स तेन समनुज्ञातः सुहृद्भिश्चानुमोदितः । आययौ द्वारकां भूयः सात्यकिप्रमुखैर्वृतः ॥२८॥रत्नजडितें कनकाभरणें । अर्पिलीं कालिंदीकारणें । माळा गळीं विचित्र वसनें । सात्यकिप्रमुखां समर्पिलीं ॥४॥भगवंतासि सर्वोपचार । अनर्घ्य रत्नें अलंकार । विद्युत्प्राय पीतांबर । प्रेमें परिधान करविला ॥२०५॥मुकुट कुंडलें मेखळा । कटकांगदें मुद्रिका माळा । वांकी तोडर चरणयुगळा । रत्नपादुका समर्पिल्या ॥६॥गंधाक्षता कुसुमहार । वरी उधळिला दिव्य धूसर । नीराजनीं जयजयकार । करितां स्वार हरि जाला ॥७॥तो श्रीकृष्ण या प्रकारें । आज्ञा देऊनि युधिष्ठिरें । बोळविलिया सुहृदीं गजरें । अत्यादरें अनुमोदिला ॥८॥पाण्डववेष्टित वासुदेव । सात्यकिप्रमुख सहयादव । नागरजनीं कृतगौरव । अर्पिलीं अपूर्व उपायनें ॥९॥पांचै जणीं पाण्डववीरीं । आरूढोनियां निज रहंवरीं । युयुधानेंसीं कैटभारि । वेष्टित गजरीं निघाला ॥२१०॥त्रिगव्यूतीपर्यंत ऐसे । अनुगमनार्थ कृष्णा सरिसे । तेथूनि आहविले यादवेशें । प्रेमसौरसें गौरवुनी ॥११॥नृपासनाचिया बंधनीं । वत्स गोवूनि धेनु तान्ही । वना जातां वोरसें दोन्ही । दाटती तैसे परस्परें ॥१२॥पाण्डव पाहती कृष्णवदन । पाण्डववदना पाहे कृष्ण । स्नेहसुभरें द्रवती नयन । पुसूनि प्रयाण आदरिलें ॥१३॥श्रीकृष्ण म्हणे माझिया स्मरणें । तुम्हां न बधिजे कोणा विघ्नें । पाण्डव म्हणती कृपेच्या घनें । स्नेहकारुण्यें तर्पावें ॥१४॥ऐसें बोलूनि परस्परीं । पुन्हां बैसोनि रहंवरीं । द्वारके उजू कैटभारि । सहपरिवारीं चालिला ॥२१५॥कालिंदीतें शिबिकायानीं । सहचरी सखिया वीजिती व्यजनीं । सवें घेऊनि चक्रपाणि । द्वारकाभुवनीं प्रवेशला ॥१६॥युयुधानेंसीं कमलानाथ । घेऊनि कालिंदी समवेत । द्वारकेप्रति येतां दूत । पुढें नगरांत पाठविले ॥१७॥उद्धव अक्रूर संकर्षण । देवकप्रमुख यादवगण । स्नेहें सामोरे येऊन । कृष्ण पाहोन निवाले ॥१८॥पाहोनि कालिंदीचें मुख । सर्वां जाला सुखसंतोष । गीत नृत्य मंगलघोष । भद्रासनास पातले ॥१९॥नमूनि राजा उग्रसेन । वसुदेवप्रमुखां केलें नमन । येर समस्त यादवगण । अवलोकून वंदिले ॥२२०॥मग करूनि जयजयकार । प्रवेशले निजमंदिर । कालिंदीचें पाहूनि वक्त्र । निवती समस्त पुरवासी ॥२१॥ऐसा द्वारकाप्रवेश कथिला । यावरी जो कां वृत्तान्त वितला । तो तूं कुरुनृपाळा । सदस्यमेळासमवेत ॥२२॥अथोपयेमे कालिंदीं सुपुण्यर्त्वृक्ष ऊर्जिते । वितन्वन्परमानंदं स्वानां परममंगलम् ॥२९॥यानन्तरें उत्तम दिवसीं । भद्रासनीं नृपापासीं । वसुदेवादि हृषीकेशी । संकर्षणेंशीं उपविष्ट ॥२३॥प्रसंगें नृपाचिये कर्णीं । वृत्तांत जाणवी सुनंदपाणि । कालिंदीचिये पाणिग्रहणीं । यथाविधानीं हा काळ ॥२४॥रायें पाचारिलें ब्राह्मण । पुरोहित ज्योतिषी विधानज्ञ । तिहीं केलें कालज्ञान । पंचांगपठन करूनियां ॥२२५॥ऋतु वरिष्ठ कुसुमाकर । वैशाख माधव श्रेयस्कर । उच्चासनारूढ भास्कर । ऊर्जितविभवें विराजित ॥२६॥अखिल मंगळां मंगलायतन । तो श्रीकृष्ण कल्याणभुवन । त्याचें साधावया सुलग्न । मंगळ दिन द्विज पाहती ॥२७॥ताराबळ चंद्रबळ । वाक्पति विद्यादैवबळ । गोचरप्रकरणीं पाहोनि अमळ । दैवज्ञ कुशळ विचारिती ॥२८॥द्रेष्काण होरा नवांश ग्रह । द्वादशांश त्र्यंशांश षड्वर्गसमूह । ज्याचे अधिपति शुभग्रह । करिती निर्वाह विवरूनी ॥२९॥गोत्रनिर्णय वर्णात्मकां । राशिचिंतन अनुलोमप्रमुखां । पंचकोत्तीर्ण लग्नघटिका । इष्ट बलिष्ठ विलोकिलें ॥२३०॥लाभीं सर्व शुभावह । केन्द्रीं त्रिकोणीं सौम्य ग्रह । सहज शत्रुभुवनीं निचय । पापग्रहांचा शुभफलद ॥३१॥ऐसी करूनियां विचारण । लग्नपत्रिका वर्तिली जाणा । हळदी लावूनि दोघां जणां । देवकप्रतिष्ठा पैं केली ॥३२॥ऊर्जित दैवें ओंपुण्यकाळ । लग्नविधान शुभमंगल । ब्राह्मण तपोधन निर्मळ । भूभुजमेळ सुहृदांचा ॥३३॥वाजंत्रांची एक घायी । सुरवर सुमनें वर्षती पाहीं । परमानंद सर्वां देहीं । कृष्णविवाहीं वोसंडे ॥३४॥धनें गोधनें वांटिलीं द्विजां । भद्रासनीं आहुकराजा । सुहृदीं अहेरीं पूजिला वोजा । गरुडध्वजा लक्षूनी ॥२३५॥देवकी रोहिणी सापत्न जननी । वरमाता या वरिष्ठ मानीं । बैसोनि मिरवती सुखासनीं । वाद्यगायनीं पुरगर्भीं ॥३६॥समस्तां सदनीं महोत्सव । वर्हाडी भोजान्धक यादव । रामप्रमुख वासुदेव । अहेरगौरव यां करिती ॥३७॥मंगलमंडित षोडश दिवस । लक्ष्मीपूजन गृहप्रवेश । निरवूनियां भाणवसास । गृहस्थ जगदीश चौघींसीं ॥३८॥कालिंदीचें पाणिग्रहण । द्वारकेमाजि जालें पूर्ण । प्रसंगें विवाहप्रकरण । पंचम लग्न शुक सांगे ॥३९॥विंदानुविंदावावंत्यो दुर्योधनवशानुगौ । स्वयंवरे स्वभगिनीं कृष्णे सक्तां न्यषेधताम् ॥३०॥त्यानंतरें अल्पा दिवसीं । द्वारके वसतां श्रीहृषीकेशी । अवंतीहूनि सर्वां देशीं । मूळें रायांसि पैं आलीं ॥२४०॥विंदानुविंद बंधु दोघ । दुर्योधनासिं स्नेहयोग । तद्वशवर्ती होऊनि अनुग । राज्यभूभाग भोगिती ॥४१॥दुर्योधनाच्या स्नेहादरें । कृष्णीं वर्तती द्वेषाचारें । तिहीं भूपति निज सोयरे । पत्रद्वारें पाचारिले ॥४२॥क्षिप्रापगेच्या उभय तटीं । शिबिरें उभिलीं लक्ष कोटी । भूमंडळींच्या भूभुजथाटी । अवंती निकटीं उतरलिया ॥४३॥मित्रविंदेचें स्वयंवर । ऐकोनि मिळाले नृपवर । एक वर्जूनि द्वारकापुर । सोयरे अपार पातले ॥४४॥गुण लावण्य ऐश्वर्यथोरी । श्रीकृष्णाची परस्परीं । ऐकोनि मित्रविंदा सुंदरी । मनें निर्धारी हरि भर्ता ॥२४५॥मातेपासीं कथिलें गुज । जें मम भर्ता गरुडध्वज । हें ऐकोनि अवंतिराज । म्हणती लाज हे आम्हां ॥४६॥कृष्णासि नाहीं नृपासन । केवळ गोरक्ष हीन दीन । चैद्य मागध दुर्योधन । भूभुज मान्य हे आम्हां ॥४७॥मित्रविंदेतें निषेधिती । कृष्ण अयोग्य नृपसंपत्ति । यालागिं सांडूणि तदासक्ति । वरीं भूपति माने तो ॥४८॥भूमंडळींचे भूप । अमोघ ऐश्वर्य शौर्य प्रताप । त्यांमाजि पाहूनि ऐश्वर्यकल्प । लावण्यदीप नृप वरिजे ॥४९॥सहज येतील स्वयंवरीं । श्रवणें नयनें पाहोनि विवरीं । प्रियतम वाटेल तो तूं वरीं । भगिनी यापरी प्रबोधिती ॥२५०॥ऐकोनि बंधूंचें उत्तर । जेविं मृद्घटीं दृढ पाथर । पडतां भंगी तेंवि अंतर । भंगोनि विचार हारपला ॥५१॥थरथरा कांपे अंगयष्टि । झरझर नीर पाझरे दृष्टी । मर मर दैवा म्हणोनि कष्टी । होय गोरटी अनुतापें ॥५२॥कृष्णावेगळा स्वयंवरीं । अन्य भूपाळ सहसा न वरीं । ऐसा निश्चय दृढ अंतरीं । करूनि श्रीहरी चिंतितसे ॥५३॥मित्रविंदेचें अंतर । सर्वज्ञ सर्वग कमलाकर । जाणोनि पातला पैं सत्वर । तोही प्रकार अवधारा ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP