मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५३ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ५३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५३ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर अद्भिर्गंधाक्षतैर्धूपैर्वासःस्रड्माल्यभूषणैः ।नानोपहारबलिभिः प्रदीपावलिभिः पृथक् ॥४६॥षोडशोपचारीं पूजा । करिती झाली भीमकात्मजा । विधि सांगती द्विजभाजा । गरुडध्वजप्राप्तीसी ॥१२॥वस्त्रें अलंकार सुमनें । नाना उपहार बळिदानें । दीपावळी नीरांजनें । सावधानें अर्पिलीं ॥१३॥कृष्ण धरूनि मानसीं । पूजी द्विजपत्न्यांसी । जें जें बोलिलें विधीसीं । तें तें त्यांसी दिधलें ॥१४॥विप्रस्त्रियः पतिमतीस्तथा तैः समपूजयत् । लवणापूपताम्बूलकंठसूत्रफलेक्षुभिः ॥४७॥निंबें नारिंगें नारिकेळें । अपूप लाडु अमृतफळें । इक्षुदंड आंबे केळें । सुवासिनींसी दीधलीं ॥२१५॥मुक्ताफळेंसीं आभरणें । सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें । हळदी जिरें लवण धणे । दिधलीं बाणें नारींसी ॥१६॥तस्यै स्त्रियस्ताः प्रद्दुः शेषं युयुजुराशिषः । ताभ्यो देव्यै नमश्चक्रे शेषां च जगृहे वधूः ॥४८॥रुक्मिणीतें द्विजपत्न्यांहीं । शेषसौभाग्यद्रव्यीं तिहीं । अर्चूनि आशीर्वचनें पाहीं । अभीष्टसिद्ध्यर्थ योजिलीं ॥१७॥मग रुक्मिणीनें त्या ब्राह्मणी । नमिल्या मस्तक ठेवूनि चरणीं । शेषप्रसाद स्वीकारूनि । स्तविली भवानी तें ऐका ॥१८॥मुनिव्रतमथ त्यक्त्वा निश्चक्रामांबिकागृहात् ।प्रगृह्य पाणिना भृत्यां रत्नमुद्रोपशोभिना ॥४९॥होती नीलोत्पलांची माळा । ते घातली जगदंबेच्या गळां । वर देईं वो घनसांवळा । उचित काळा आजिच्या ॥१९॥म्हणोनि विसर्जिलें मौन । करूं आदरिलें स्तवन । मना मागें ठेवूनि मन । सावधान स्तवनासी ॥२२०॥जय जय वो अव्यक्तव्यक्ति । जय जय वो विश्वस्फूर्ति । जय जय वो अमूर्तमूर्ति । चिच्छाक्ति चिन्मात्रें ॥२१॥जय जय वो जगदंबे । जय जय वो आरंभरंभास्तंभे । जय जय सौभाग्यशोभनशोभे । स्वयें स्वयंभें कुमारी ॥२२॥जय जय वो अनादि । नाकळसी मनोबुद्धि । देवो देवी इहीं शब्दीं । तूं त्रिशुद्धि नांदसी ॥२३॥शिवा तुझेनि शिवपण । जीवा तुझेनि जीवपण । देवा तुझेनि देवपण । निकारण तूं माये ॥२४॥तुझेनि शब्दादिकां शोभा । तुझेनि नभत्व आलें नभा । तूंचि मूळ प्राणरंभा । विश्वकदंबा जीवन तूं ॥२२५॥तुझी उघडलिया दृष्टि । नांदों लागे सकळ कृपासृष्टि । तुवां उपेक्षिलियापाठीं । देवाही नुठी देवपणा ॥२६॥ॐ पुण्या सुमुहूर्ती । लग्न लावणें तुझ्या हातीं । मज नोवरा श्रीपति । समूळ कीर्ति तूं माये ॥२७॥ऐसा सुकृतिवाद करितां । कंठींची माळा आली हाता । येचि माळेनें कृष्णनाथा । वरीन आतां निर्धारें ॥२८॥महाप्रसाद जी सर्वथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । आशीर्वाद देती समस्ता । पतिव्रता द्विजपत्न्या ॥२९॥येणें उह्लासें सुंदरीं । वरूं निघे कृष्णवरीं । स्वानुभवाची किंकरी । तीतें करीं धरूनि ॥२३०॥भीमकीसौंदर्य अमूप जिचेनि जगा नामरूप । तिच्या लावण्याचे दीप । मुख्य स्वरूप केंवि वर्णूं ॥३१॥जीतें सृजूं न शके चतुरानन । कृष्ण स्वभावें स्वरूपपूर्ण । तिच्या स्वरूपाचें लक्षण । एका जनार्दन करीतसे ॥३२॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायामंबिकापूजनं नाम षष्ठप्रसंगः ॥६॥ श्रीकृष्णाय० ॥कृष्णभेटीलागिं देखा । नवविधभक्तीसी आवांका । तैशा नवरत्नमुद्रिका । भीमककन्यका लेयिलीसे ॥३३॥तां देवमायामिव वीरमोहिनीं सुमध्यमां कुंडलमंडिताननाम् ।श्यामां नितंबार्पितरत्नमेखलां व्यंजत्स्तनीं कुंतलशंकितेक्षणाम् ॥५०॥सकळसौंदर्याची खाणी । बरवेपण जीपासूनि । स्वरूपरूपाची जनने । वीरीं रुक्मिणी देखिली ॥३४॥सुरनरपन्नगांच्या ठायीं । हिंडतां सौंदर्या विश्रांति नाहीं । म्हणोनि धाविन्नलें लवलाहीं । भीमकीदेहीं विश्रान्ति ॥२३५॥भीमकीकृष्णा आलिंगन । तेणें सौंदर्या समाधान । त्रिलोकीचें बरवेपण । भीमकीपासीं धांविन्नलें ॥३६॥ऐकोनि जिचिया सौंदर्यासी । वेध लागला श्रीकृष्णासी । ते भीमकी वर्णावी कैसी । सीमा रूपासि न करवे ॥३७॥नाहीं स्रष्ट्यानें सृजिली । कृष्णप्रभावें रूपासि आली । बरवेपणा शीग चढली । साकारली सौंदर्यें ॥३८॥गगन शून्यत्वा उबगलें । कृष्णभेटीसी उदित झालें । भीमकीमस्तकासि आलें । नीलालकीं शोभत ॥३९॥मस्तकींचे नीळ कुंतळ । तेंचि नभ अतिसुनीळ । तळीं मुखचंद्र निर्मळ । भीमकीमुखीं उगवला ॥२४०॥चंद्र क्षीण कृष्णपक्षीं । म्हणे हा पूर्वील माझा बंधु कीं । म्हणूनि कळवळली भीमकी । तो निजमुखीं धरियेला ॥४१॥भीमकीपमुख निष्कलंक । क्षयातीत पूर्णशशाङ्क । कृष्णप्राप्तीसी मयंक । भीमकीमुखीं संचरला ॥४२॥चंद्रपूर्ण पूर्णिमा एकी । येर्हवीं क्षयवृद्धि त्या इहलोकीं । तो सदा संपूर्ण भीमकीमुखीं । निजात्मसुखीं परिपूर्ण ॥४३॥चंद्रमंडलामागें पुढें । जैसे तारागणाचे वेढे । जैसीं मोतीलग तानवडें । दोहींकडे झळकती ॥४४॥कृष्णवेधें वेधली खरी । म्हणोनि विसरली ते भंवरी । भवरीया कृष्णमायेच्या करीं । ये अवसरीं तें नाहीं ॥२४५॥भीमकी थोरकपाळाची । कृष्णदैवें ते दैवाची । निडळीं कृष्णप्रभा श्यामतेची । तोचि कस्तूरी मळवट ॥४६॥चंद्रबिंबीं श्यामरेखा । तैसा कस्तूरीमळवट देखा । भोंवया रेखिल्या कृष्णरेखा । अतिसुरेखा व्यंकटा ॥४७॥कृष्ण पहावया जगजेठी । भोंवई सांडिली व्यंकटी । कृष्णीं मिनलिया दृष्टि । सहज गांठी सुटेल ॥४८॥कृष्णरंगें जें सुरंग । अहेवपण तेणें अभंग । तेंचि कुंकुम पैं चांग । मुखचंद्रीं चंद्रमा ॥४९॥नभीं इंद्रधनुष्यरेखा । तैसी भांगीं सिंदूररेखा । भुलवावया यदुनायका । मोहिनीमुखा पूजियेलें ॥२५०॥ना ते सरस्वतीबोधीं । आली कृष्णभेटीलगीं । जीव शिव हासळिया दोहीं भागीं । मुक्तलगीं तटस्था ॥५१॥जैसीं नक्षत्रें नभोमंडळीं । तैसी मुक्तमोतियांची जाळी । लेयिली असे भीमकबळी । तेणें वेह्लाळी शोभतसे ॥५२॥त्याहीवरी भक्तिपरा । झळकत नवरत्नांचा खरा । खुणावीतसे सुरनरा । भजा यदुवीरा निजभावें ॥५३॥दृश्य देखतां शिणले नयन । धणीचें घ्यावया कृष्णदर्शन । एकत्र होऊनि देखणेपण । भीमकीलोचनासि पैं आलें ॥५४॥पहावया घनसांवळा । कृष्णश्यामता आली बुबुळा । आसाविली दोहीं डोळां । सबाह्यपणें देखणें ॥२५५॥कृष्ण देखावया निधान । नयनीं सूदलें अंजन । सोगयाचें सलंबपण । कटाक्ष बाणपिसे ॥५६॥भीमकीकटाक्षाच्या घायीं । मदन मूर्च्छित पाडिला ठायीं । सुरनरांचा पाड कायी । निधडा पाहीं श्रीकृष्ण ॥५७॥मुख मुख्य शोभनिक । श्लेष्मागमनें शिणलें नासिक । भीमकीमुखा येऊनि देख । नाका पैं चढलें ॥५८॥कृष्णसुवासआवडी । तेणें नाकासि लागली गोडी । दोन्ही नाकपुडिया बुडी । दिधली दडी वसंतें ॥५९॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP