अध्याय ५३ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोविंदमूर्तये नमः ॥
जय जय भक्तजनकैपक्षका । ऐकोनि भीमकीची पत्रिका । उद्योग केला त्या मूळश्लोका । श्रोतृचातका परिसवी ॥१॥
पत्रिका ऐकतांचि गोपाळा । पुढां भीमकी दिसे डोळां । बाह्या पसरूनि उताविळा । आलिंगना उठावला ॥२॥
भीमकीभावार्थची कैसी । चटपट लागली देवासी । निद्रा न लगे शेजेसीं । उठी बैसी करीतसे ॥३॥
नवल वैदर्भीचा भावो । रात्रीं वोसणाये देवो । भेमकी सांडूं नको देहो । आलों पाहा हो परणावया ॥४॥
ज्या ज्यासि जैसा भावो । त्या त्यासि तैसतैसाचि देवो । भीमकी कृष्णमय पहा हो । कृष्णदेवो तन्मय ॥५॥
मनीं नाहीं सत्यभावो । तंव कैसेनि पावे देवो । भीमकी भाग्याची पहा हो । उठिला देवो सत्वर ॥६॥
कृष्ण सांगे द्विजाजवळी । रात्रींची अवस्था सकळी । मग हांसोनि वनमाळी । टाळीसीं टाळी पीटिली ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP