मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५३ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ५३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५३ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर तमागतं समाज्ञाय वैदर्भी हृष्टमानसा । न पश्यंती ब्राह्मणाय प्रियमन्यन्ननाम सा ॥३१॥याचिया उपकारा उत्तीर्णता । पाहतां न देखें सर्वथा । जेणें आणिलें कृष्णनाथा । त्यासि आतां म्यां काय द्यावें ॥१७॥याचिलागिं सद्गुरूसी । उत्तीर्णता नाहीं शिष्यासी । कोण कोणा द्यावें पदार्थासी । हें वेदांसि न बोलवे ॥१८॥चिंतामणि दे चिंतिल्या अर्था । कल्पतरु कल्पिलें देता । सद्गुरु दे निर्विकल्पता । त्यासि उत्तीर्णता कैसेनि ॥१९॥जो चुकवी देहाचें जन्ममरण । त्यासि नव्हिजे पैं उत्तीर्ण । कोटिजन्मांचें जन्ममरण । येणें चुकविलें गुरुनाथें ॥१२०॥देहें उतराई होऊं गुरूसी । तंव नश्वरपण त्या देहासी । नश्वर अनश्वरासी । उत्तीर्णत्वासि कदा न घडे ॥२१॥जीवें व्हावें उतराई । तंव तो समूळ मिथ्या पाहीं । जीवासि जीवपणाचि नाहीं । होईल काई उत्तीर्ण ॥२२॥सद्गुरूसी उत्तीर्ण होतां । न देखों कवणाही पदार्था । यालागिं चरणीं ठेविला माथा । मौनें करूनि रुक्मिणी ॥२३॥मनीं देखोनि साचारभावो । अति संतोषला सुदेवो । म्हणे तुझेनि धर्में आम्हांसि पहा हो । कृष्णप्राप्ति साचार ॥२४॥श्रीकृष्ण आला परिसोन । भीमकी पावली समाधान । उह्लासयुक्त जालें मन । हर्षें त्रिभुवन कोंदलें ॥१२५॥करितां अंबिकापूजन । कृष्ण करील भीमकीहरण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥२६॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां कृष्णविदर्भपुरागमनं नाम पंचमप्रसंगः ॥५॥प्राप्तौ श्रुत्वा स्वदुहितुरुद्वाहप्रेक्षणोत्सुकौ । अभ्ययात्तूर्यघोषेण रामकृष्णौ समर्हणैः ॥३२॥भीमकी विवाहसंभ्रम । पाहों आले कृष्णराम । हें परिसोनि भीमकोत्तम । दर्शना सकाम ऊठिला ॥२७॥भेरी निशाण मृदंग । नाना वाजंत्रें अनेग । पूजासामग्री घेऊनि साङ्ग । समारंभेंसिं पैं आला ॥२८॥कृष्ण देखोनि सावधान । केलें साष्टाङ्गनमन । कृष्णें दिधलें आलिंगन । विस्मित मन रायाचें ॥२९॥मूळेंवीण तूं आलासी । परम सुख हेंचि आम्हांसी । शब्देंविण सोइरा होसी । तूं जाणसी ब्रह्मसूत्र ॥१३०॥मधुपर्कमुपानीय वासांसि विरजासि सः । उपायनान्यभीष्टानि विधिवत्समपूजयत ॥३३॥वरवरिष्ठ कृष्णरावो । मनीं धरूनि हाचि भावो । मधुपर्कविधि पहा हो । पूजाविधान करीतसे ॥३१॥नानापरीचीं उपायनें । वस्त्रें अळंकार भूषणें । अंगीकारिलीं श्रीकृष्णें । जिवींचे खुणे जाणोनी ॥३२॥बलभद्राचि प्रमुख । जे जे आले यादवादिक । त्यांची पूजा केली देख । यथोचित विधानें ॥३३॥तयोर्निवेशनं श्रीमदुपकल्प्य महामतिः । ससैन्ययोः सानुगयोरातिथ्यं विदधे यथा ॥३४॥जानवसा नगरा आंत । देतां बोलिला कृष्णनाथ । विरोध आम्हां मागधांत । निकट वास करूं नये ॥३४॥जवळी असतां बोलावोली । शोभनामाजी वाढेल कळी । निकुरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया ॥१३५॥याहूनि पाउलें दोनी दुरी । राहों नगराबाहेरी । ठाव द्यावा अंबिकापुरीं । ऐसें श्रीहरि बोलिला ॥३६॥राजा हासिन्नला मनीं । होय बुद्धिमंत शार्ङ्गपाणि । ठाव दिधला अंबिकास्थानीं । घाव निशाणीं घातला ॥३७॥राजा म्हणे चक्रपाणि । मार्ग नगरा जीमधूनी । कृष्णदर्शना उदित राणी । यालागूनि बुद्धि केली ॥३८॥जाणोनियां तोचि भावो । रथीं चढिन्नला कृष्णदेवो । आपणा जवळी बैसविला रावो । थोर उत्साह वो मांडिला ॥३९॥लागली वाजंत्रांची घाई । चामरें ढळती दोहीं बाहीं । बंदिजन गर्जती पाहीं । कृष्णकीर्तकीर्तनें ॥१४०॥छेदावया हृदयबंध । साधकांमाजि रिघे बोध । तैसा प्रवेशला गोविंद । नगरामाजि निजबळें ॥४१॥कृष्णमागतमाकर्ण्य विदर्भपुरवासिनः ।आगत्य नेत्रांजलिभिः पपुस्तन्मुखपंकजम् ॥३५॥नगरा आला जी श्रीकृष्ण । नगरनागरिकजन । उताविळ कृष्णदर्शन । करावया धाविन्नले ॥४२॥कृष्ण पहावया नरनारी । मुंडमघसणी होतसे भारी । एक चढलीं माडिया गोपुरीं । पहावया हरि स्वानंदें ॥४३॥कृष्णमुखकमल सुंदर । जननयन तेचि भ्रमर । तेथेंचि गुंतले साचार । कृष्णआमोद सेविती ॥४४॥नयनद्वारें जी प्राशन । करूनि हृदयीं आणिती कृष्ण । सबाह्य देखती समसमान । समदृष्टी कृष्णातें ॥१४५॥ऐसा देखोनि श्रीपति । कृष्णमय झाली वृत्ति । लवों विसरलीं नेत्रपातीं । कृष्णमूर्ति पाहतां ॥४६॥घेऊनि बोधाची वेताटी । विवेकदृश्याची मांदी लोटी । तैसा सात्विक जगजेठी । जनसंकुलिता वारित ॥४७॥मागें परात्मा कृष्णवीर । करूनि निजबोधाचा भार । चालतसे स्थिर स्थिर । आत्मस्थितीच्या पाउलीं ॥४८॥बोलती नरनारी सकळा । कालीं मिरविलें गे शिशुपाळा । न देखों नोवरपणाची कळा । नाहीं जिव्हाळा लग्नाचा ॥४९॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP