अध्याय ५३ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नानोपहारबलिभिर्वारमुख्याः सहस्रशः ।
स्रग्गंधवस्त्राभरणैर्द्विजपत्न्यः स्वलंकृताः ॥४१॥

गायंतश्च स्तुवंतश्च गायका वाद्यवादकाः ।
परिवार्य वधूं जग्मुः सूतमागधबंदिनः ॥४२॥

कृष्णकीर्तीच्या कीर्तनीं । चौघी जणी गाती गाणीं । त्यापुढें नाचती नाचणीं । च्यार्‍ही मुक्ति उदासा ॥२॥
कृष्ण वर्णूनियां श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध उद्भट । वंशावळी वर्णिती ॥३॥
कळा वाढविती शब्द । साही जणांसि विवाद । युक्तिप्रयुक्तीचे बोध । नानाच्छंद तर्काचे ॥४॥
ऐसी परिवारितवधू । वायनें उपायनें पूजाविविधू । वस्त्राभरणें माळा विविधू । सालंकृता द्विजवनिता ॥२०५॥

आसद्य देवीसदनं धौतपादकरांबुजा ।
उपस्पृश्य शुचिः शांता प्रविवेशांबिकांतिकम् ॥४३॥
तां वै प्रवयसो बालां विधिज्ञा विप्रयोषितः ।
भवानीं बंदयांचक्रुर्भवपत्नीं भवान्विताम् ॥४४॥

पातली अंबेचें रंगण । केलें करचरणक्षाळण । रुक्मिणीचें सावधमन । शुद्धाचमन त्या केलें ॥६॥
श्रद्धापूजेचे सम्भार । शुद्ध सुमनांचे पैं हार । चिद्रत्नांचे पैं अळंकार । विरजांबर पूजेसी ॥७॥
देवालया आली हरिखें । अंबा पाहतां कृष्णचि देखे । येणें रूपें यदुनायकें । पाणिग्रहण करावें ॥८॥
सावध होऊनि पाहे चित्ता । म्हणे हे आमुची कुलदेवता । आपुल्या रूपें दावी कृष्णनाथा । होईल भर्ता निर्धारें ॥९॥
हर्षें वोसंडली पोटीं । मग बांधिली शकुनगांठीं । अतिउह्लासें गोरटी । पूजाविधि मांडिली ॥२१०॥

नमस्ये त्वांबिकेऽभीक्ष्णं ससंतानयुतां शिवाम् । भूयात्पतिर्मे भगवान्कृष्णस्तदनुमोदताम् ॥४५॥

नमो अंबिके त्र्यंबकान्विते । गणपतिप्रमुखसंतानान्विते । जेणें कृष्णभर्ता होय मातें । तूं त्या अर्थें अनुमोदें ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP