अध्याय ५३ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सुस्नातां सुदतीं कन्यां कृतकौतुकमंगलाम् ।
अहतांश्कयुग्मेन भूषितां भूषणोत्तमैः ॥११॥

विवाहसूत्रकृत सोहाळा । मंगळस्नाता भीमकबाळा । दिव्याभरणा युग्म द्कूला । मंडित वेह्लाळा शुभदर्शनीं ॥३०॥
पीताम्बरपरिधान । लेयिली अळंकारभूषण । नोवरीचें दुश्चित मन । कृष्णागमन पाहतसे ॥३१॥
नान्दीश्राद्ध देवकविधान । केलें ब्राह्मणांचें पूजन । यथाविधि ब्राह्मनसंतर्पण । स्वस्तिवाचन विधीचें ॥३२॥

चक्रुः सामर्ग्यजुर्मंत्रैर्वध्वा रक्षां द्विजोत्तमः ।
पुरोहितोऽथर्वविद्वै जुहाव ग्रहशांतये ॥१२॥

ऐसिये वैदर्भीतें जाण । सामऋग्यजुःसूक्तपठन । द्विजवर करिती वधूकल्याण । आशीर्वचना देऊनी ॥३३॥
चहूं वेदींचें बाह्मण । येऊनि पुरोहित आपण । अथर्ववेदें केलें हवन । ग्रहशान्त्यर्थ यथोचित ॥३४॥

हिरण्यरूप्यवासांसि तिलांश्च गुडमिश्रितान् ।
प्रादाद्धेनूश्च विप्रेभ्यो राजा विधिविदा वरः ॥१३॥

सोनें रूपें नानावस्त्रें । घृतसहित तिलपात्रें । गोभूदानें पैं विचित्रें । द्विजां नृपवरें दीधलें ॥३५॥

एवं चेदिपती राजा दमघोषः सुताय वै । कारयामास मंत्रज्ञैः सर्वमभ्युदयोचितम् ॥१४॥

दमघोष याचिपरी । महोत्सव आपुल्या नगरीं । पुत्रविवाहाचा करी । श्रेष्ठीं द्विजवरीं यथोचित ॥३६॥

मदच्युय्द्भिर्गजानीकैः स्यंदनैर्हेममालिभिः ।
पत्त्यश्वसंकुलैः सैन्यैः परितः कुण्डिनं ययौ ॥१५॥

वर्‍हाड निघालें बाहेरी । मदगज परिवारिले भारी । सुवर्णरथांचिया हारी । वीर असिवारीं आरूढ ॥३७॥
चालती पायांचे मोगर । पातले कौण्डिन्यपुर नगर । आणीक वर्‍हाडि महावीर । चैद्यभार तेही आले ॥३८॥
शाल्व आणि जरासंध । दंतवक्त्र विदूरथ । पौण्ड्रक वीर अद्भुत । सैन्यभारेंसीं पैं आले ॥३९॥
भीमकी कृष्णासि होती दिधली । ते शिशुपाळा देऊं केली । ते संधि पाहिजे साधिली । म्हणोनि आले पक्षपाती ॥४०॥
वर्‍हाड मिनलें तें कैसें । महामोहाचें मेहुडें जैसें । खद्योतसमुदाय निशीं वसे । वीर तैसे वाढिवां ॥४१॥
कृष्णतरणीच्या किरणीं । मावलतील रणाङ्गणीं । भीमकी उह्लासेल कमलिनी । कृष्णदिनमणि देखोनी ॥४२॥
जैसे गंधर्वनगरींचे हुडे । तैसे शिशुपाळाचे वीर गाढे । वर्‍हाड आलें वाडेंकोडें । भीमकापुढें सांगितलें ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP