मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक ५१ ते ५७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५७ Translation - भाषांतर सुरद्रुमलतोद्यानविचित्रोपवनान्वितम् । हेमशृंगैर्दिवस्पृग्भिः स्फाटिकाट्टालगोपुरैः ॥५१॥पुष्पवाटिका प्राकारबद्धा । स्वादूदकाच्या वापिका शुद्धा । विविधारत्नीं कनकनिबद्धा । कबंधें सुधा लाजविती ॥८७॥अमरद्रुमांचिया हारी । कल्पलतावेष्टित वरी । पत्रीं पुष्पीं फळसंभारीं । रम्यवनश्री शोभविती ॥८८॥मंदार पार्यातक संतान । कल्पतरु हरिचंदन । पनस निचूळ राजादन । आम्र रसाळ कदंब ॥८९॥नीप न्यग्रोध करंज । निंबु लकुच तूत तुरंज । जंबु जंबेरी सुरेज । अंजीर अर्जुन उदुंबर ॥४९०॥अशोकवनें कदलीवनें । अश्वत्थपारिभद्रधात्रीविपिनें । बकुळी पाटलेले चंपकवनें । क्रमुककाननें उच्चतरें ॥९१॥विशाळ खर्चूरी नारिकेळी । ताल तमाल शाल्मली । बिल्व कपित्थ वर्तुळफळी । मधुक प्लक्ष तिंतिणिका ॥९२॥रायावळीया आम्लवेतस । शाल्मली शेवें शेपें सुरस । दाडिमी द्राक्षी मंडपघोष । साकोटवृक्ष वनगर्भीं ॥९३॥भोकरी बदामी करमळी । कारी करवंदी सिताफळी । रामफळाम्च्या सकळ वोळी । प्रियाळ कोळी नृपभोग्या ॥९४॥जाई जुई मालती लतिका । कुंद मोगरे शतपत्रिका । सहस्रपत्री सेवंतिका । रम्य यूथिका श्वेत पीता ॥४९५॥ऐसे अनेक तरुवरभार । नागलतिकांचें आगर । इक्षुवाडिया रत्न शुभ्र । कृष्णा विचित्र मृदु सुरसा ॥९६॥रहाट मोटा पाटथळें । कूप कासार तटाकें अमळें । शुद्ध सरोवरा भरलें जळें । स्थळें निर्मळें ह्रद वापी ॥९७॥सोज्वळ स्फटिकाच्या बंधनीं । रत्नें जडिलीं खणोखणीं । विचित्र वैडूर्यमणींच्या श्रेणी । गमती तरणी प्रकाशले ॥९८॥तटाकें वापिका सोपानबद्धा । माजि कमळें विकाशलीं विविधा । रुंजतां रोलंब करिती शब्दा । मोदें आमोदा स्वीकरिती ॥९९॥चंद्रविकासी तें कैरवें । सूर्यें प्रकाशती राजीवें । जातिविशेषें घेतां नांवें । गिरा मौनावे विस्तारीं ॥५००॥रातोत्पळें श्वेतोत्पळें । सहस्रपत्रांची गजोत्पळें । इंद्रोत्पळें कुमुदोत्पळें । नीलोत्पळें भ्रमराभें ॥१॥पीतप्रभाढ्यें कनकोत्पळें । चित्रविचित्रें रत्नोत्पळें । क्कचिन्मुकुलितें कुड्मळें । आमोदबहळें मघमघिती ॥२॥भृंग द्विरेफ चंचरीक । मधुप शारंग षट्पदप्रमुख । विचित्ररंगीं जातिविशेख । अमर अनेक रुणझुणती ॥३॥स्थळजळवासी पक्षिनिकर । शुकसारिका चास मयूर । गृध्र कपोतक तित्तिर । चातक श्येन ध्वांक्षादि ॥४॥चिडिया चिमणिया पारावत । कोकिळा कलविंख बगळे श्वेत । अनेक यातींचे शकुंत । निवती निवांत वनोवनीं ॥५०५॥शिंगळ गोळांगुळ वानर । याज्ञिक सुकृती निर्जरनिकर्र । द्वारकावनगर्भीं तरुवर । सेविती अपार सुखलाभें ॥६॥कर्क नक्र शफर मकर । मीन मंडूर ताम्र मद्गुर । कच्छप जलसर्प दर्दुर । क्रीडती सादर जलगर्भीं ॥७॥दानाढ्य सुकृती तरुवररूपी । निर्जर जलचर जाले आपीं । गंधर्व भ्रमर रमती पुष्पीं । याज्ञिक कपी फळभोक्ते ॥८॥ऐसीं द्वारकापुरीचीं वनें । विचित्र वनजान्वित जीवनें । त्यांमाजि चैत्य वेदिका भुवनें । देवायतनें मठ मठिका ॥९॥द्वारें देहळ्या रंगस्थळें । शिल्पकौशल्यें उडती जळें । प्रासादशिखरें ऊर्ध्व विशाळें । ध्वजीं दुकूळें रंगाढ्यें ॥५१०॥उपनिषदर्थे पक्षिनिकरीं । संवादध्वनि विरावगजरीं । सामगायनें सप्तस्वरीं । कीजे भ्रमरीं मधुमत्तीं ॥११॥ऐसीं द्वारकेमाजि वनें । सुकृती श्रवणें पाहती नयनें । जनपदांचीं विचित्र भुवनें । महेंद्रसदना लाजविती ॥१२॥पाये भरिले गुरुत्मरत्नीं । त्यांवरी शक्रोपळमांडणी । वज्रमणींच्या कुंजरश्रेणी । ऐरावतासम गमती ॥१३॥वल्ली तरुवर कमळहारी । मूळवेदिकांच्या प्राकारीं । मरकतरत्नीं कमठापरी । तोळंबियांच्या बैठका ॥१४॥इंद्रनीळाचे स्तंभ सरळ । चतुःशाळा बद्ध विशाळ । कमलाकृती माणिक्य उपळ । स्तंभमौळीं उथाळीं ॥५१५॥चिंतारत्नांचे तुळवट । गोमेदाचे पिधानपाट । कर्बूरकर्दमीं निघोटं । लखलखाट दिनरजनी ॥१६॥मदलसांवरील ज्या वलभिका । चतुष्कोणा चंद्रशाळिका । चंद्रप्रभेसम स्फाटिका । गमती वापिका जळपूर्णा ॥१७॥वलभियांवरी भित्तिप्रदेशीं । कुट्टिमें निर्मिलीं अंडजांसी । पक्षी क्रीडती स्वानंदेंसीं । हरिस्मरणेंसी कूजती ॥१८॥माडियांवरिलिया भूमिका । त्या बोलिजती अट्टाळिका । सर्वत्र खणोखणीं स्फाटिका । दिव्य पताका कलशेंसी ॥१९॥क्कचिन्मरकतमणींचे स्तंभ । क्कचित् हिरियांचे स्वयंभ । कोठें सूर्यरत्नीं सूर्याभ । क्कचित् अरुणाभ वैद्रुमी ॥५२०॥पाचरत्नीं पाटांगणें । नीळरत्नीं पाकसदनें । चिंतारत्नीं देवतायतनें । मुक्तमंडप मुक्ताढ्ह्य ॥२१॥गृहप्राकार अष्ट काष्ठा । मंडित यथावास्तु प्रतिष्ठा । ईशान्यकोणीं एकनिष्ठा । देवसदनें रत्नांचीं ॥२२॥पूर्वप्रदेश्हीं पश्वादिशाळा । अग्निकोणीं पाकशाळा । याम्ये विस्तीर्ण शयनशाळा । निर्मी अवलीला विश्वकर्मा ॥२३॥मळोत्सर्गादि नैरृत्यकोणीं । वसनशाळा कृत वारुणी । शस्त्रास्त्रशाळा वायव्यकोणीं । भांडारसदनीं कौवेरी ॥२४॥राजसंग्रहवस्तुशाळा । त्याही परिसें कुरुभूपाळा । हेमललामघतिका अमळा । हर्म्य सुमौळा कलशाढ्य ॥५२५॥राजतारकुटैः कोष्ठेर्हेमकुंभैरलंकृतैः । रत्नकूटैर्गृहैर्हैमैर्महामरकतस्थलैः ॥५२॥राजातारकुटीकरून । कोष्ठशाळांचें अभिधान । पीतलोह जें सुवर्ण । आणि सामान्य रजतादि ॥२६॥कुंभनामें स्वर्णकलश । शाळाशिखरीं स्वप्रकाश । पद्मरागादि रत्नविशेष । सदनशिखरीं शोभाढ्य ॥२७॥महामरकत पाटांगणीं । रत्ननिबद्ध सर्वत्र धरणी । सदनीं आंगणीं प्रांगणीं । सभास्थानीं कौशल्यें ॥२८॥लोहस्थानीं स्वर्णतार । अनर्घ्यरत्नें पाषाणमात्र । विश्वकर्म्याचें क्रियासूत्र । भूमि सर्वत्र पुरगर्भीं ॥२९॥धेनुमहिषीगोधनशाळा । शकटशाकटीवृषभशाळा । स्यंदनार्ह तुरंगशाळा । रहंवरशाळा विचित्रा ॥५३०॥अजाअविकेंमेषशाळा । भारवाहकक्रमेळशाळा । पवनजवीना अश्वशाळा । अतिविशाला हयपूर्णा ॥३१॥पर्नशाळा मठिका मठ । धर्मशाळा पांथिकवाट । शास्त्राध्ययनशाळा श्रेष्ठ । निगमपाथपठनार्थ ॥३२॥याज्ञिकांच्या यज्ञशाळा । चित्रविचित्र रंगशाळा । शस्त्रास्त्रांच्या संग्रहशाळा । भेषजशाळा रुग्णार्थ ॥३३॥नटिनीनटकनाट्यशाळा । विचित्र वादकवाद्यशाळा । नर्तकनर्तकीनृत्यशाळा । गायनशाळा गांधर्वी ॥३४॥यंत्रद्रव्याढ्या यंत्रशाळा । दुर्मददमनीं बंदिशाळा । मृगयोचिता समृद्धिशाळा । कुरंगव्याघ्रशुनकादि ॥५३५॥शुकसारिकापंजरशाळा । लावकतित्तिरगोळांगुळा । मेषमहिषक्रीडनशाळा । कुंजरशाळा विस्तीर्णा ॥३६॥राजधान्यांचे संग्रह सर्व । कोशार्थ सदनें दृढ अपूर्व । सौरभ्यशाळा परिमलद्रव्य । नृपोपभोग्य जे ठायीं ॥३७॥क्षौद्र मैरेय पौष्पज मधु । वारुणी मदिरा आसवें विविध । सुगंततैलें मलयजगंध । जवादि केशर कस्तूरी ॥३८॥वसनसंग्रहनेपथ्यभुवनें । हेमरत्नांचीं भाजनें । भांडागारें सभास्थानें । नियोगी लेखनें जे ठायीं ॥३९॥राजतारकुटादिकोष्ठीं । मूळश्लोकार्थ पाहोनि दृष्टी । उपलविलें तें क्षमिजे श्रेष्ठीं । वृथा चावटी न मनोनी ॥५४०॥बळीच्या द्वारीं वामनमूर्ति । वरदतंतूनें गुंतली होती । कुशमुरमथना भेदूनि क्षिति । आली वरुती त्रैविक्रमी ॥४१॥कुश मर्दूनि कुशस्थळी । वसवूनि अद्यापि जे राहिली । युगानुयुगीं मोक्षशाळी । द्वारका जाली जीचेनि ॥४२॥कुशमुरहंता त्रिविक्रम । धर्मस्थापक पुरुषोत्तम । भक्तजनांचा कल्याणकाम । साधुसत्तमसंगोप्ता ॥४३॥उखामंडळीं सौराष्ट्रदेशीं । धिंगडमल्ल हे आख्या ज्यासी । रणछोडनामें गुर्जरवासी । म्हणती जयासि माधव तो ॥४४॥एवं माधव पुरुषोत्तम । कल्याण रणछोड त्रिविक्रम । मूर्तिप्म्चक हें उत्तमोत्तम । विधिकृत धाम प्राचीन ॥५४५॥हरिसंकल्प जलधिजीवनीं । कामलाकार उच्छ्रित धरणी । विश्वकर्म्यानें तिये स्थानीं । केली कांचनी द्वारका ॥४६॥तिये द्वारके माझारी । त्रिविक्रमादि मूर्ति चारी । स्थापावया त्वष्टा करी । अतिसाजिरीं देवालयें ॥४७॥वास्तोष्पतीनां च गृहैर्वलभीभिश्च निर्मितम् ।चातुर्वर्न्यजनाकीर्णं यदुदेवगृहोल्लसत् ॥५३॥मध्यभागीं भगवाद्भुवन । ईशान्यकोणीं शंकरसदन । अग्निकोणीं गजानन । विद्रुमायतनीं विराजित ॥४८॥नैरृत्यकोणीं सहस्रकार । माणिक्यरात्नाचें मंदिर । सूर्यकांताचे प्रस्तर । पवळीं प्राकार शोभविती ॥४९॥एकोना जी त्रैलोक्यजननी । यादवांची कुळस्वामिनी । जिनें होऊनि गगनवाणी । कंसा कांचणी लावियली ॥५५०॥ते कुळदेवीचें भुवन । वायव्यकोणीं देदीप्यमान । विचित्ररत्नीं निर्मिलें जाण । वनें जीवनें सर्वत्र ॥५१॥गौरी गणेश नंदी भृंगी । चंडीशादि यथाविभागीं । एवं सर्वत्र देवतालिंगी । पृथगायतनीं गणगणना ॥५२॥वैष्णव शैव गाणपत्य । सौर सूर्यार्चक समस्त । आगमप्रणीत महाशाक्त । स्वस्वविभागीं विराजती ॥५३॥सर्वीं सर्वत्र पुष्पाराम । चतुष्पथ वापी अमृतोपम । उपासकांचे नित्य नेम । पुराती काम जे ठायीं ॥५४॥प्राकार गोपुरें मंडप शिखरें । वलभी विचित्र दामोदरें । जडित शृम्गें उच्चतरें । दीपमाळिकासम गमती ॥५५५॥शिखरीं शृंगीं ध्वजपताका । सर्वत्र प्रासाद रंगभूमिका । अपूर्व रचना विधिहरप्रमुखां । पाहतां कौतुकास्पद होय ॥५६॥वास्तोष्पतीचीं गृहें ऐसीं । रम्य निर्मिलीं ईशान्यदेशीं । चहूं वर्णादि जनपदासी । यथावकाशीं निरूपिलीं ॥५७॥यादवांचीं राजसदनें । पुरटघटितें जडित रत्नें । पूर्वप्रदेशीं देदीप्यमानें । निर्जरसदनें लाजविती ॥५८॥मुख्य उग्रसेनाचें भुवन । राजमंदिर शोभायमान । अनर्घ्यरत्नीं जडित गहन । शक्रसदनापडिपाडें ॥५९॥देवकप्रमुख भूपानुज । त्यांचीं सदनें तेजःपुंज । विधाळविस्तीर्ण कलशध्वज । मंडित भूभुजपार्श्वस्थें ॥५६०॥वसुदेव सानुज वृष्णिवर्ग । नृपसदनाचा उत्तर भाग । अधिष्ठूनि मंदिरें चांग । पद्मरागादि रत्नांचीं ॥६१॥तत्प्राग्भागीं परम विशाळा । षोड्दशसहस्र सदनशाळा । जेथ वसती त्रैलोक्यपाळा । कलशमाळा नभोगर्भीं ॥६२॥भगवत्परिवार भाव्य भावी । विधातृआज्ञेच्या गौरवीं । विश्वकर्मा कौतुकें दावी । जेथ आघवीं त्रिजगींचीं ॥६३॥पट्टमाहिषीसदनें अष्ट । वेष्टित भवतीं सहस्त्रें द्व्यष्ट । अष्टविभूति जेथें स्पष्ट । करिती यथेष्ट परिचर्या ॥६४॥वृंदावनें ध्वजाशिखरें । रत्नखचितें दामोदरें । सर्वीं सर्वत्र अंतःपुरें । दिव्य मंदिरें समसाम्यें ॥५६५॥सभास्थानीं प्रतिमंदिरीं । भगवत्क्रीडेची सामग्री । सर्व समृद्धि निर्माण करी । ज्या श्रीहरिउपभोग्या ॥६६॥मंचक शिविका रत्नयानें । अमूल्य सर्वत्र वित्रित्रासनें । दिव्य डोल्हारे रत्नभाजनें । अनर्ध्य वसनें सुरभोग्यें ॥६७॥सदनोसदनीं स्थळोस्थळीं । पूर्ण वापिका विशुद्धजळीं । मणिमुक्तादि स्फटिकशिळीं । ससोपाना चतुष्पथा ॥६८॥ऐसें श्रीकृष्ण वसतिस्थान । तैसेंचि दक्षिणभागीं गहन । परिवारेंसीं संकर्षण । वसावयार्थ निर्मिलें ॥६९॥ऐसेचि वसुदेव तनय सर्व । वृष्णिभोजांधक माधव । कुकुर सात्वत सहदाशार्ह । अक्रूर उद्धव शतधन्वा ॥५७०॥एवं सदनें छपन्नकोटी । विश्वकर्म्याची हातवटी । लावण्यशोभा त्रैलोक्यमुकुटीं । रचिली गोमटी द्वारावती ॥७१॥ऐसें कृत्स्नाद्भुतनगर । करविता जाला जगदीश्वर । जेथींचा विशेष विस्तार । कथितां फणिवर मौनावे ॥७२॥भगवत्संकल्पमात्रें करून । विश्वकर्म्यानें द्वारकाभुवन । जळधिजठरीं दुर्गम गहन । केलें निर्माण कौशल्यें ॥७३॥पूर्वीं पट्टभिषेकीं सर्वां । आज्ञापिलें शक्रादिदेवां । तदनुसार ते स्ववैभवा । समर्पिती तें अवधारा ॥७४॥सुधर्मा पारिजातं च महेंद्रः प्राहिणोद्धरेः ।यत्र चावस्थितो मर्त्यो मर्त्यधर्मैर्न युज्यते ॥५४॥जाणोनि भगवत्संकल्पसूचना । परमानंद संक्रंदना । तेणें इच्छूनि स्वकल्याणा । सुधर्मा सभा पाठविली ॥५७५॥सुधर्मा ऐसें जियेसि नाम । जेथ बैसती अमरोत्तम । स्फुरद्रूप जेथ धर्म । न शिबे अधर्म कैं कोण्हा ॥७६॥मनुष्यलोकींचे मानव । लाहतां सुधर्मसभेचा ठाव । मनुष्यधर्म सांडिती सर्व । बाणे वैभव अमरांचें ॥७७॥मर्त्यधर्म पुसाल स्पष्ट । तरी शारीर धर्म जे पुष्टापुष्ट । क्षुधातृषादि प्राणनिष्ठ । तुष्टातुष्ट मनोधर्म ॥७८॥हर्ष विषाद म्लानि ग्लानि । स्वप्न सुषुप्ति लाभ हानि । वयसा भेद जराजाचणी । जये स्थानीं न स्पर्शें ॥७९॥सदा मानसें प्रफुल्लमानें । जैसीं सुधासंभवें सरोजवनें । यालागिं सुमनस या अभिधानें । देवां कारणें जन वदती ॥५८०॥एवं षडूर्मिषड्विकार । मर्त्यधर्म जे दुःखप्रचुर । ते तैं न शिवती शरीर । सुधर्मागार प्रवेशतां ॥८१॥ऐसी सभा सुधर्मानाम । पारियातक जो कल्पद्रुम । अर्षिता जाला अमरोत्तम । जाणोनि प्रेम कृष्णाचें ॥८२॥तें आख्यान येईल पुढें । भौमासुराचे हननचाडे । सत्यभामेच्या वालभभिडे । नेईल गरुडें सह स्वर्गा ॥८३॥येथ सूचिलें वक्ष्यमाण । पुढें प्रसंगें निरूपन । येईल तेव्हां होईल श्रवण । श्रोत्यांलागून जाणविलें ॥८४॥सुधर्मा आणि पारिजात । इतुका सूचविला संकेत । एवं वैभव निर्जरनाथ । पाठवी समस्त हरिसदना ॥५८५॥कृष्णस्मरणाचा उच्चार । ऐकोनि पळती यमकिंकर । स्मरणविमुखां भास्करकुमर । दंडी सादर हरिप्रेमें ॥८६॥एवं दक्षिणदेशिचा नाथ । लोकत्रयीं घरटी देत । भगवद्द्वेष्टे अधर्मनिरत । दंडी संतत निजदंडें ॥८७॥प्रतीचीपालक पाशपाणि । प्रणतभावें श्रीकृष्णचरणीं । निजैश्वर्यें द्वारकाभुवनीं । भजता जाला तें ऐका ॥८८॥श्यामैककर्णान्वरुणो हयाञ्शुक्लान्मनोजवान् ।अष्टौ निधिपतिः कोशांल्लोकपालो निजोदयान् ॥५५॥व्योमगामी श्वेतवर्ण । श्याममात्र एककर्ण । उच्चैःश्रव्यासम जवीन । ते कृष्णार्पण हय केले ॥८९॥अश्वरत्नांचें अर्पण । उद्देशार्थ कथिलें जाण । एवं अनेक रत्नें वरुण । करी अर्पण हरिप्रेमें ॥५९०॥ऐसाचि कुबेर उदक्पति । आपुली ऐश्वर्यसंपत्ति । अर्पिता जाला कृष्णाप्रति । सप्रेमभक्तिपूर्वक पैं ॥९१॥नील मुकुंद शंख पद्म । महापद्म मत्स्य कूर्म । सोदकादि अष्ट नाम । हेमललाम अष्टनिधि ॥९२॥अश्श्टनिधि हे कोशस्थानीं । समर्पूनि श्रीकृष्णचरणीं । या वेगळ्या ऐश्वर्यश्रेणी । द्वारकाभुवनीं निक्षेपी ॥९३॥मुख्य करूनि हे दिक्पाळ । विधिहरप्रभृति सुरवर सकळ । तिहीं पूजिलें हरिपदकमळ । तें प्रांजळ अवधारा ॥९४॥यद्यद्भगवता दत्तमाधिषत्यं स्वसिद्धये । सर्वं प्रत्यर्पयामासुर्हरौ भूमिगते नृप ॥५६॥कुरुनरपाळा कौरवपति । ऐशा निर्जरीं स्वसंपत्तिक । कृष्ण अवतरला असतां क्षिती । द्वारावतीमाजि भरिल्या ॥५९५॥निर्जरां जें जें ज्यां आधिपत्यें । पूर्वीं दिधलीं श्रीभगवंतें । तें तें कल्याणस्वसिद्धीचें । स्वयें कृष्णातें अर्पिती ॥९६॥कृष्ण प्रविष्ट द्वारकाभुवानीं । उपविष्ट सुधर्मासभासथानीं । तैं निर्जरीं ऐश्वर्यश्रेणी । अर्पूनि चरणीं नत जाले ॥९७॥हें तों पुढेंच निरूपावें । परंतु कथिता द्वारकाविभवें । शुकें वर्णिलें जें स्वभावें । तें म्यां आघवें उपलविलें ॥९८॥असो ऐसिया द्वारकानगरीं । बळभद्रेंसिं विवरूनि हरि । कैसी नेली मथुरापुरी । मुनिवैखरी ते ऐका ॥९९॥तत्र योगप्रभावेन नीत्वा सर्वजनं हरिः । प्रजापालेन रामेण कृष्णः समनुमंत्रितः ॥५७॥बळभद्रेंसीं एकातमंत्र । कैसा केला तो उद्देशमात्र । पूर्वींच कथिला यथासूत्र । तच्छेषचरित्र अवधारा ॥६००॥बलभद्रातें म्हणे हरि । द्विपददुर्गम द्वारकापुरी । निर्मिलेल्ले तेथ मथुरानगरी । आजिचे रात्रीएं प्रवेशवीं ॥१॥ योगामायासत्ताबळ्लें । मथुराजनपद कुटुंबें सकळें । द्वारके नेतां कोण्हा न कळे । ऐसिये स्वलीले निरूपिलें ॥२॥कालायवनासि नोहे विदित । ना मथुरावासियां स्वजना क्लृप्त । बळभद्रेंशीं मंत्र सुगुप्त । केला एकांत श्रीकृष्णें ॥३॥द्वारकेमाजि मथुराजन । न कळत संस्थापी नेऊन । तुवां रक्षिजे मथुराभुवन । यवनवंचन करीत मी ॥४॥यवनासमरीं निरायुध । करितां पलायन प्रसिद्ध । मुचुकुंदक्षोभें त्याचा वध । गुह्यसंवाद हा कथिला ॥६०५॥तदनुसार मथुरानगरीं । जनपद होते आपुल्या घरीं । योगप्रभावें प्रविष्ट करी । द्वारकेमाझारी विभवेंशीं ॥६॥यादव नागर जनपद आघवें । द्वारके देखती सुखवैभवें । कृष्णचरित्र न होतां ठावें । म्हणती मात्रे वरपडलों ॥७॥भवंता दुर्गम रत्नाकर । उत्तुंग दुर्गाचा प्राकार । स्थानें सदनें सुमनोपर । भूभासुर कनकाचीं ॥८॥म्हणती अभिनव कैसें जालें । रामकृष्ण केउते गेले । यादव समग्र भय पावले । सवेग आले नृपसदना ॥९॥वसुदेवादि वृष्णिप्रवर । देवक श्वफल्क उद्धवाक्रूर । उग्रसेनासि पुसती मंत्र । कांहीं विचार श्रुत सांगे ॥६१०॥येरु म्हणे हा श्रीकृष्णमहिमा । तर्कावया असमर्थ ब्रह्मा । तो कें मनुजा अम्हां तुम्हां । इंद्रियग्रामा अवगमे ॥११॥ऐसें म्हणोनि उताविळ । उग्रसेनेंसिं यदुमंडळ । घरटी देऊनियां तत्काळ । द्वारका सकळ विलोकिती ॥१२॥हे ब्रह्म्याची सत्यवती । कीं इंद्राची अमरावती । कुबेराची अलकावती । कीं वरुणावती वरुणाची ॥१३॥रत्नखचितें हेमभुवनें । आश्चर्य मानिती पाहतां नयनें । तंव देखिलीं देवायतनें । तेथ स्वमनें विगुंतलें ॥१४॥मुनिजन तपस्वी थोर थोर । तेहीं कथिला गुह्य विचार । विश्वकर्म्यानें द्वारकापुर । रचिलें साचार कृष्णाज्ञा ॥६१५॥तुम्ही नांदा येथ निर्भय । कळिकाळाचें न धरूनि भय । यवन मर्दूनि वसुदेवतनय । वरूनि विजय येतील ॥१६॥ऐसें ऐकोनियां यादव । जयजयकार करिती सर्व । म्हणती कृष्णाचें लाघव । ब्रह्मादिदेव न तर्किती ॥१७॥असो द्वारकेची हे मात । मथुरेमाजीं रोहिणीसुत । अल्पप्रजाजनपदेंसहित । दुर्गरक्षित राहिला ॥१८॥ऐसें कवाड हेळामात्रें । करूनि कृष्णें त्रैलोक्यमित्रें । यवना लावण्य दावी नेत्रें । तें हें श्रोत्रें अवधारा ॥१९॥निर्जगाम पुरद्वारात्पद्मामाली निरायुध ॥५७॥पूर्वीं यवनाप्रति नारदें । कथिलें तैसेंचि श्रीमुकुंदें । निजरूप प्रकटिलें विनोदें । सर्व आयुधें सांडूनी ॥६२०॥वदन लोपवी शशांककोटि । आकर्न नयन विशाळदृष्टि । पद्मफुल्लार माळा कंठीं । आजानुबाहु निरायुध ॥२१॥मथुरापुरींच्या द्वारांतून । बाहीर निघाला देदीप्यमान । कालयवनाचें पुरलें मान । जाणोनि सर्वत्र संहरणा ॥२२॥द्वारके नेले मथुरावासी । मथुरे स्थापूनि बळरामासी । बाहीर निघाला हृषीकेशी । इतुके कथेसि निरूपिलें ॥२३॥पन्नासावा संपला येथ । पुढें कालयवनाचा घात । मुचुकुंदाचा दृगग्निपात । करील वृत्तांत तो ऐका ॥२४॥श्रीएकनाथान्वयसंभव । गोविंदकृपांशुकपल्लव । पांघरूनियां दयार्णव । कथा अपूर्व निरूपील ॥६२५॥तेथ सावध होऊनि श्रोतीं । श्रवणमात्रें अमृतवाप्ति । लाहिजे म्हणोनि किंकरावृत्ति । माझी विनति श्रीचरणीं ॥२६॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षितत्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां जरासंधसमरवर्णन कालयवनागमनं मथुरायाद्वारकाया निवेशन च नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥श्रीकृष्णापर्णमस्तु ॥ श्लोक ॥५७॥ ओव्या ॥६२६॥ एवं संख्या ॥६८३॥ ( पन्नासावा अध्याय मिळून ओवीसंख्या २३४०५ ) अध्याय पन्नासावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP