अध्याय ५० वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
करोरुमीना नरकेशशैवला ध्हनुस्तरंगायुधगुल्मसंकुलाः ।
अच्छूरिकावर्तभयानका महामणिप्रवेकाभरणाश्मशर्कराः ॥२६॥
जानूपासूनि खंडित चरण । कटीपासूनि मांडिया छिन्न । कूर्परापासूनि करादि मीन । रक्त सरितांत तळपती ॥६७॥
वीरमौळींचे केश बहळ । रक्तसरितांत तें शेवाळ । कार्मुकखंडित रंगपटळ । केवळ भासती वोसाणें ॥६८॥
शस्त्रननराजें बुडती तळीं । काष्ठमुष्टि तरती जळीं । ऐशा अयुधगुल्मजाळी । रक्तखळालीं न चलती ॥६९॥
वोडणें म्हणिजे अच्छूरिका । अंकभग्ना रथींच्या चाकां । तिहीं आवर्ती भयानका । सरिता अनेका रुधिराच्या ॥२७०॥
महामणींचीं वाळुवटें । रत्नाभरणें शर्करातगटें । अमूल्य वैडूर्यें पाषाण गोटे । सरिताकांठें विराजती ॥७१॥
रक्तनिम्नगा शतानुशता । ऐसिया भयंकरा भयभीता । त्यांचा कोण प्रवर्तविता । कुरुनरनाथा तो ऐकें ॥७२॥
प्रवर्तिता भीरुभयावहा मृधे मनस्विनां हर्षकरीः परस्परम् ।
विनिघ्नताऽरीन्मुसलेन दुर्मदान्संकर्षणेनापरिमेयतेजसा ॥२७॥
भीरु म्हणिजे भ्याड जे प्राणी । तिहीं रक्तनदिया देखोनि नयनीं । त्रास पावोनि अंतःकरणीं । मूर्च्छित धरणीं ते पडिले ॥७३॥
तोंडा आणूनियां फेंस । दीर्घ झांपडी लोचनास । भूतळीं घासती करचरणांस । स्मृति करणांस न सांवरे ॥७४॥
मनस्वी जे वीरवाट । शूर संग्रामीं सुभट । रक्तसरिता पाहत्ती धीट । हर्ष उद्भट त्यां पोटीं ॥२७५॥
पाहोनि रक्तांचे प्रवाह । वीरां वीरश्री उत्साह । मारिती परसेनासमूह । घेताती लाहो रणरंगीं ॥७६॥
भ्याडां भयदा शूरां सुखदा । रणीं अपार रक्तनद्या । भिडतां परस्परा दुर्मदां । केल्या विशदा बळभद्रें ॥७७॥
परमदुर्मदां शत्रूंप्रति । तेजिष्ठ अप्रमेय पुरुषार्थीं । मारितां मुसलघातीं । केल्या क्शिती रक्तापगा ॥७८॥
ऐसा कथूनि समरोत्सव । रामकृष्णांचा वास्तव । महिमा वर्णी योगिराव । नाट्यलाघव दों श्लोकीं ॥७९॥
बलं तदंगार्नवदुर्गभैरवं दुरंतपारं मगधेंद्रपालितम् ।
क्षयं प्रणीतं वसुदेवपुत्रयोर्विक्रीडितं तज्जगदीशयोः परम् ॥२८॥
कोमलशब्दें आमंत्रण । अंग म्हणोनि संबोधन । स्वयें व्यासाचा नंदन । नृपालागून संबोधी ॥२८०॥
राया तेजें मागधबळ । क्षयाप्रति नेलें सकळ । तेंचि विशेषणीं प्रांजळ । परिसा केवळ श्लोकोक्त ॥८१॥
अर्णवउपमा सर्वांपरी । मागधबळासि मुनिवैखरी । देऊनि वर्णी तत्साम्यचतुरीं । धिषणानेत्रीं विवरावें ॥८२॥
अर्णव लंघनीं दुर्गमतर । आणि गर्जें भयंकर । दुःखें न पविजे अंतपार । प्रतीचीइंद्र ज्या रक्षी ॥८३॥
तैसें दुर्गम मागधसैन्य । सुरनरां लंघनी अनंगवण । रनतुरांचा भीकर स्वप्न । बाहुस्फोटन सिंहनाद ॥८४॥
अगाधविक्रमें अंतरहित । निःसीमत्वें पार वर्जित । मगधेंद्रवरुणप्रतिपाळित । अर्नववत यास्तव तें ॥२८५॥
ऐसें दुर्गम मागधबळ । समरीं क्षया नेलें स अकळ । हा रामकृष्णांचा सहज खेळ । नव्हेचि तुंबळ पराक्रम ॥८६॥
म्हणाल नव्हे कां पराक्रम । हेंही येथींचें ऐका वर्म । रामकृष्ण हे पुरुषोत्तम । अपर यांसम नर कैंचा ॥८७॥
स्थित्युद्भवांतं भुवनत्रयस्य यः समीहतेऽनंतगुण्ह स्वलीलया ।
न तस्य चित्रं परपक्षनिग्रह्हस्तथाऽपि मर्त्यानुविधस्य वर्ण्यते ॥२९॥
भुवनत्रयाचा स्थितिलयप्रभाव । स्वलीलेकरूनि वासुदेव । अनंतगुणीं पूर्णवैभव । चेष्टे स्वमेव स्वसत्ता ॥८८॥
परपक्षाचें निग्रहण । तयासि करितां आश्चर्य कोण । म्हणाल तरी कां समरांगण । पर्रमाश्चर्यें वर्णिलें ॥८९॥
कृष्ण ईश्वर हें साचार । तथापि नटला मर्त्यानुसार । तेथिंचें पौरुष शौर्यानुकार । कथिलें विचित्र निर्दुष्ट ॥२९०॥
एवं मारूनि प्रबळ बळ । केला जरासंध निर्बळ । तथापिप धृष्ट आतुर्बळ । महाविशाळ पराक्रमी ॥९१॥
जग्राह विरथं रामो जरासंधं महाबलम् । हतानीकावशिष्टासुं सिंहः सिंहमिवौजसा ॥३०॥
निहतसैन्य अवशिष्टप्रान । जरासंधरहंवर भग्न । धरिता जाला संकर्षण । प्रतापें करून पुरुषार्थी ॥९२॥
महामृगेंद्र मृगेंद्रातें । वनीं आकळी जेंवि पुरुषार्थें । तेंवि बलरामें मागधातें । धरूनि समरीं बांधिलें ॥९३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP