मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर अन्विच्छंत्यो भगवतो मार्गं गोप्यो विदूरतः । ददृशुः प्रियविश्लेषमोहितां दुःखितां सखीम् ॥४१॥ध्वजांकुशादि चिह्नीं विशद । भूमीं उमटले जे हरिपद । तदनुलक्षें करिती शोध । प्रमदा प्रसिद्ध स्मरतप्ता ॥२८॥ऐशा हरिमार्गातें अबला । पहात असतां विरहविकळा । तव दुरून देखिली डोळां । सखी व्याकुळा स्मरबाणें ॥२९॥प्रियतमाचें आलिंगन । लाहोनि विसरली देहभान । करितां मर्यादालंघन । गेला त्यागून वनवासीं ॥३३०॥कृष्णप्राप्ति हातींची गेली । निजसखियांची विघडणी झाली । जळावेगळी मासोळी । तेंवि तळमळी हरिविरहें ॥३१॥तिचें ऐकोन आक्रंदन । सवेग आलिया धांवोन । दुःखवरपडी देखोन । प्रश्नसंभाषण आदरिलें ॥३२॥वनीं अवघ्या सांडूनि वधू । घेऊनि गेला तुज गोविंदु । कोठें हरविला आनंदकंदु । केंवि हा खेदु तुज झाला ॥३३॥मग ते सखियांप्रति बोले । मज गोविंदें सम्मानिलें । खांदां वाहोनि आणिलें । विविध दाविलें रतिलास्य ॥३४॥महीं उतरूनि ठायीं ठायीं । विचित्र वनश्री दाविली पाहीं । पुन्हां उचलूनि दोहीं बाहीं । ने लवलाही स्वैरत्वें ॥३३५॥माझिया मौलग्रथनासाठीं । सुमनें वेंचूनि भरिली वोटीं । अंघ्रीं घेऊनि आपणानिकटीं । ग्रथिली गोमटी वेणिका ॥३६॥पुन्हां घेवोनि कडिये खांदां । केली कंदर्पकेली विविधा । प्रमदास्वभावें म्यां प्रमादा । करूनि गोविंदा अवगणिलें ॥३७॥माझिया लावण्या भुलला हरि । म्हणोनि गर्वा चढलें भारीं । वनीं सांडूनि अवघ्या नारी । वाहे कंधरीं मज प्रेमें ॥३८॥मी एकचि जगीं लावण्यराशि । म्हणूनि आवडे श्रीकृष्णासी । कृष्ण भुलला सौंदर्यासी । म्यां हृषीकेशी वश केला ॥३९॥कृष्ण जाला मज अधीन । ऐसा धरिला म्यां अभिमान । चालों न शके मी येथून । खांदां वाहून ने म्हणतां ॥३४०॥खांदां बैसावया मज बाहे । स्कंधारोहणा उचलितां पाहें । तेथचि गुप्त झाला माये । दुःखें लाहेसम मिडकें ॥४१॥श्रीकृष्णाचें आलिंगन । आठवे कृष्णाचें चुंबन । सप्रेम अपांग मोक्षण । सादर निरीक्षण आठवे ॥४२॥श्रीकृष्णाच्या गुह्य गोष्टी । स्मरविलासें सस्निग्ध दृष्टि । रसिकलालनें स्मरोनि पोटीं । होतें कष्टी सखिया हो ॥४३॥तया कथितमाकर्ण्य मानप्राप्तिं च माधवात् । अवमानं च दौरात्म्याद्विस्मयं परमं ययुः ॥४२॥तिचें ऐकोनि बोलणें । कीं जे सम्मानिली विशेष कृष्णें । म्हणोनि फुगतां मदाभिमानें । पुन्हां अवमानें विघडली ॥४४॥अगे या श्रीकृष्णचरणासाठीं । विधिहरप्रमुख विरक्त दृष्टि । दुर्घट तपश्चर्येच्या कंष्टीं । शिणतां भेटी दुर्लभ त्यां ॥३४५॥दैवें त्याची प्राप्ति घडली । दुरादृष्टें गर्वा चढली । पुन्हा अभिमानें विघडली । संकटीं पडली हरिविरहें ॥४६॥याचें लाघव न कळे कोण्हा । नये विश्वासों याचिया गुणां । चढली मूर्खत्वें अभिमाना । आतां रुदना करीतसे ॥४७॥निष्काम करिती हरिकीर्तन । जाय तयापें धावोन । सांडूनि लक्ष्मीसह सुखशयन । सनकादिभाषणें सांडूनी ॥४८॥हरिकीर्तनामाजि नाचे । वंदी अणुरेणु तेथींचे । शेषाप्रति रहस्य याचें । लक्ष्मी वाचे पुसतसे ॥४९॥सर्वां सांडूनि स्वयें हरि । निष्काम भक्तांचे कीर्तनगजरीं । नाचे उडे नानापरी । कोण्या विचारीं हें नुमजे ॥३५०॥ऐकोनि म्हणे फणिनायक । रहस्य जननीये आइक । कृष्ण निजजनपरीक्षक । नमनिं जे निष्टंक वशवर्ती ॥५१॥स्वयें नीचा करी नमन । कीं जो विश्वात्मा आपण । धरितां अंगलगीं अभिमान । मग त्या चरण न दाखवी ॥५२॥यालागीं ज्यातें तो सम्मानी । त्यांस जायिजे लोटांगणीं । तरीच अधिकार पदसेवनीं । येर्हवीं हानी तत्काळ ॥५३॥हरिकिंकराचे किंकर । त्याहून आपण नीचतर । होऊनि त्यांचे चरणीं शिर । ठेवितां अधिकार दास्यत्वा ॥५४॥हें ऐकोनि कमला देवी । हरिजनांचे चरण सेवी । यास्तव त्रिजगाचा गोसांवी । हृदयीं ठेवी सप्रेमें ॥३५५॥जे कां अर्धांगनिवासिनी । येथवरी नियेची कडसणी । तेथ हे अभिमानें मानिनी । स्कंधारोहिणीं प्रवर्तली ॥५६॥ यास्तव हातींचा हारविला हरि । भोगी विरहें दुःखलहरी । सुरपद दवडूनि भवसागरीं । याज्ञिकांपरी हे जाचे ॥५७॥दुरात्मत्वें पावली नाड । आणि त्या कृष्णाचें कैवाड । ऐकोनि परमविस्मयारूढ । म्हणती अवघड हरिप्राप्ति ॥५८॥ऐशा समदुःखें तन्वंगी । तयेसी घेऊनि आपणासंगीं । पुन्हा वनगर्भीं शार्ङ्गी । रिघोनि वेगीं हुडकिती ॥५९॥ततोऽविशन्वनं चंद्रज्योत्स्ना यावद्विभाव्यते । तमः प्रविष्टमालक्ष्य ततो निववृतुः हरेः ॥४३॥तये सहित रिघाल्या वनीं । जंववरी शशिभामंडित रजनी । पडतां तमाची गवसणी । हरिहुडकणी सांडिली ॥३६०॥त्यानंतरें हरिशोधन । सांडूनि पुन्हा सेविलें पुलिन । तेथ विसरोनि देहाभिमान । करिती गायन हरिविरहें ॥६१॥तन्मनस्कास्तदालापास्तद्विचेष्टास्तदात्मिकाः । तद्गुणानेव गायंत्यो नात्मागारानि सस्मरुः ॥४४॥श्रीकृष्णाच्या विरहध्यानें । तदाकार झालीं मनें । तेथ नुमटती प्रपंचभानें । तद्गुणगानें तन्मयता ॥६२॥उन्मत्त जैसे बरळताती । तैशा विवश हरिगुण गाती । अनुभविली जे हरिसंगति । तैशा चेष्टती तन्मय त्या ॥६३॥कृष्णगानें कृष्णध्यानें । कृष्णसुरतसन्निधानें । कृष्णाकार झाली मनें । प्रपंचभानें सांडवलीं ॥६४॥कृष्णध्यानाचिया वेधें । भेदा विसरल्या कृष्णावबोधें । कृष्ण होऊनि कृष्णच्छंदें । प्रेम नुसधें वावरे ॥३६५॥तया प्रेमाची अवस्था । ग्रंथीं नयेचि वाखाणितां विरंचीपर्यंत बुद्धिमंता । नाहीं योग्यता तत्कथनीं ॥६६॥तैसाचि प्रेमळ कोण्ही एक । हरिपदलालस हरिकामुक । भोगूं शकेल तद्रससुख । कथनीं मूक परि तोही ॥६७॥श्रीकृष्णाची विरहदशा । अनिर्वाच्य कुरुनरेशा । अनुभवगम्य तन्मानसा । येरा भरवसा न करवे ॥६८॥असो ऐशा पुलिनीं रामा । पतिसुतसदनासह विरामा । वेधें तन्मय मेघश्यामा । भावूनि आत्मा गुण गाती ॥६९॥त्यांची सप्रेम तन्मयता । कथिली न वचेचि तत्वता । यालागिं हरिगुणकीर्तनवार्ता । ऐकें गीता गोपींच्या ॥३७०॥कुरुपुंगवा तुझेनि प्रश्नें । मजही तैसेंच केलें कृष्णें । इतुकें म्हणतां स्मृतींचें ठाणें । उठोनि नयनें जळ लोटे ॥७१॥हृदयीं प्रेमसुखाची जोडी । फावतां रोमांच उभविती गुढी । कंठ दाटोनि श्वास कोंडी । पडली बोबडी वाचेसी ॥७२॥जेंवि कां प्रेमामृताची गार । संवादवायु कृष्णाकार । स्पर्शें होऊं पाहे नीर । तेंवि पाझर स्वेदाचे ॥७३॥परागपरमाणूंची मांदी । मिरवे जैसी फुल्लारविंदी । पुलकउभारा तैसा स्वेदीं । रोमांच संधि टवटविला ॥७४॥रावणहननीं भूकंपन । होतां सुराद्रि करी धुनन । तेंवि विरतां अहंभान । तनुकंपन सुखलाभें ॥३७५॥आनंदाब्धीचें हेलावे । तैसे उठती स्फुंदनयावे । एवं सात्त्विक अष्टभावें । श्रीशुकदेवें आथिला ॥७६॥जेणें वेषें बिंब नटे । प्रतिबिंबही तैसेंचि वेंठे । अष्टभावीं स्वसुखीं पैठें । केलें नेटें तेंवि नृपा ॥७७॥रासक्रीडेच्या विनोदें । गोपी आथिल्या परमानंदें । स्तिमित झालीं खेचरवृंदें । विधिही न वदे गतसमया ॥७८॥तैसेचि श्रोते वक्ते दोन्ही । अष्टभावीं सुख भोगूनी । पुन्हा स्मृतीतें आलिंगोनी । श्रवणीं कथनीं प्रवर्तले ॥७९॥मग बादरायणि म्हणे राया । गोपी हरिविरहें तन्मया । धनसुत सदनें विसरोनियां । गुण गावया प्रवर्तल्या ॥३८०॥पुनः पुलिनमागत्य कालिंद्याः कृष्णभावनाः । समवेता जगुः कृष्णं तदागमनकाक्षिताः ॥४५॥पूर्वीं कालिंदीच्या पुलिनीं । अभीष्ट भोगिला चक्रपाणि । पुढती त्याचि स्थळा येऊनी । कृष्णभावनीं तन्मनस्का ॥८१॥कृष्णाकार कृष्णवेधें । भक्तसुखाच्या अवबोधें । कृष्ण गाती भेदावरोधें । श्रीकृष्णपदें वांछिती ॥८२॥वांचिती कृष्णाचें आगमन । समस्त मिळोनि गाती कृष्ण । वसवूनि कालिंदीचें पुलिन । भोगिला भगवान जेथ पूर्वीं ॥८३॥येथूनि पुढें गोपीगीत । एकतिसाव्या अध्यायांत । कथिजेल तेथ देऊनि चित्त । श्रोतीं निवांत परिसावें ॥८४॥एकोणतिसावा भवविरक्ति । श्रवणवेधें हरिपदप्राप्ति । ईषणात्यागें भगवद्रति । सुखविश्रांति भोगिली ॥३८५॥पुन्हा उपलब्ध सुखाचा मद । धरितां अंतरला गोविंद । तदन्वेषणप्रकार विशद । तादात्म्यवेध तिसावा ॥८६॥भूतमात्रीं भगवत्प्रेमा । विपरीतविवर्तबोधोपरमा । लाहतां साफल्य केलिया श्रमा । हे येथ गरिमा जाणावी ॥८७॥येथवरी अधिकार चढल्या पूर्ण । न लगे अन्यत्र मग साधन । निर्लज्ज करावें हरिकीर्तन । तन्मय होऊन तद्वेधें ॥८८॥तेचि गोपीगीतमिसें । पुढें कथिजेल राया परिसें । जेथ रमिजे परमहंसें । ऐसें व्यासें निगदिलें ॥८९॥उत्तरजामाताचे श्रवणीं । इतुकें घालूनि बादरायणि । गोपीगीतनिरूपणीं । सावध येथूनि म्हणतसे ॥३९०॥प्रतिष्ठानवाळवंट । गौतमीरूपें यमुनातट । अभेद एकात्म वैकुंठ । एकनिष्ठ क्रीडतसे ॥९१॥तेथ चिदानंद मुरलीगीतें । स्वानंदवेधें गोपीचित्तें । विषयत्यागें गोविंदातें । विरहतप्तें समरसलीं ॥९२॥तेथ लाहूनि गोविंदरति । शुद्धसत्वें अहंकृति । धरितां अंतरिली अनुभूति । विरहावतीं परिभ्रमण ॥९३॥भुक्तसुखाचा न पडे विसर । गोड न वटे भवसागर । तेव्हां जालिया कीर्तनपर । कृष्णदयार्णव जाणोनी ॥९४॥तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र मूळ गणित । परमहंस जेथ निरत । स्कंध त्यांत दशम हा ॥३९५॥ शुकपरीक्षितिसंवाद गहन । गोपिकांहीं हरिशोधन । केलें तें हें निरूपण । अध्याय संपूर्ण तिसावा ॥९६॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां भगदन्वेषणं नाम त्रिंशतितमोऽध्यायः ॥३०॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ टीका संख्या ॥३९६॥ एवं संख्या ॥४४१॥ ( तिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १५३०९ ) तिसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP