मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर तैस्तैः पदैस्तत्पदवीमन्विच्छंत्योऽग्रतोबलाः । वध्वाः पदैः सुपृक्तानि विलोकार्ताः समब्रुवन् ॥२६॥ऐशीं कृष्णपदें विविक्तें । ध्वजांकुशादिसुचिह्नितें । तिहीं करूनि तत्पदवीतें । गिंवसीत चालती पुढें पुढें ॥९३॥तंव अकस्मात कृष्णपदां - । माजि वधूचीं पाउलें प्रमदा । देखूनि झालिया मन्मथक्षुब्धा । करिती अनुवादा ते काळीं ॥९४॥कृष्णवियोगें विरहग्रस्ता । सापत्नभावें विशेष आर्ता । होउनि करिती वितर्कवार्ता । श्रवण श्रोतां तें कीजे ॥१९५॥कस्याःप अदानि चैतानि याताया नंदसूनुना । अंसन्यस्तप्रकोष्ठायाः करेणोः करिणा यथा ॥२७॥कोणे स्त्रियेची इयें पाउलें । भूषाचिह्नित दशांगुळें । कृष्णें नेली जातिये वेळे । कीं जिचें आगळें बालभ ॥९६॥श्रीकृष्णाचे स्कंधदेशीं । स्थापूनि बाहुप्रकोष्ठासी । हस्तिनी जैसी मदगजासी । स्कंधीं शुंडा वाहुनी ॥९७॥अंसन्यस्तबाहु तैशी । श्रीकृष्णाच्या पदविन्यासीं । मिश्रपावलीं चाले सरिशी । गति गमकेशी गजगमना ॥९८॥आम्ही केतकीकंटकपत्रा । समान झालों क्लेशपात्रा । कृष्णभ्रमरें भोगिलें गात्रा । पुष्पमात्रासम तीच्या ॥९९॥तस्मात् तीच्या सुकृतराशि । समता न करवे निर्जरांशीं । म्हणूनि प्रियतम श्रीधराशीं । कीं त्यासरिसी विहरतसे ॥२००॥अनयाऽराधितो नूनं भगवान्हरिरीश्वरः । यन्नो विहाय गोविंद प्रीतो यामनयद्रहः ॥२८॥राधा म्हणिजे हे त्रिशुद्धि कृष्णाराधनाची संसिद्धि । मूर्तिमंत हे यथाविधि । भोगी गुणनिधि हरिप्रेमें ॥१॥राध साध हे दोन्ही धातु । संसिद्धी विषयीं व्याकरणप्रणीत । राधो ऐसा प्रवर्तत । हिंसाविषयीं धात्वर्थ ॥२॥तस्मात्संसिद्धिरोपराधा । भगवत्प्रेमाकार जे मुग्धा । यास्तव बाहु ठेवोनि खांदा । श्रीगोविंदासवें विचरे ॥३॥परम निश्चयेशीं इणें । संतोष केला हरिकारणें । करूनि तीव्र अनुष्ठानें । व्रताचरणें तपश्चर्या ॥४॥जो कां ईश्वराचा ईश्वर । पूर्णब्रह्म सर्वेश्वर । आराधिला तो मुरलीधर । भजनीं तत्पर होउनि ॥२०५॥यास्तव सांडूनि अवघ्या जणी । आम्ही अपतस्का विरहिणी । इशींच नेतो चक्रपाणि । एकांत स्थानीं प्रियभावें ॥६॥धन्या अहो अमी आल्यो गोविंदांघ्र्याब्जरेणवः । यान्ब्रह्मेशो रमा देवी दधुर्मूर्ध्न्यघनुत्तये ॥२९॥ऐका सख्या हो एकी म्हणती । परमाश्चर्य मानूनि चित्तीं । कृष्णांघ्रिकमळस्पर्शें माती । धन्य त्रिजगतीं आम्हांहूनि ॥७॥गोविंदपदाब्जरेणु धन्य । कमला कमलोद्भव ईशान । कृष्णप्राप्ति अभिवांछून । ज्यातें धरिती निजमौळीं ॥८॥रजतमादि अघनिवृत्ति । न होतां दुर्लभ भगवत्प्राप्ति । यालागीं हरिपदकमळींची माती । मुकुटीं धरिती अघशमना ॥९॥धन्य हे गोविंदपदाब्जरेणु । ज्यातें रमादि ब्रह्मेशानु । अघनाशनार्थ मुकुटीं धरून । आनंदती हृत्कमळीं ॥२१०॥चरणसेवनाचेनि मिसें । रमेसि लाभलें भाग्यविशेषें । त्रिभुवन मोजितां पदविन्यासें । दैवें विखनसें मोजिते ॥११॥तेचि गोविंदपादोद्भवा । त्रिजगत्पावनीं । अगाधविभवा । स्वयंभ मुकुटीं धरितां भवा। पदरज ठेवा लाधला ॥१२॥विधिहरकमले अलभ्यप्राप्ति । तेथ इतरांचा केवा किती । अहो आश्चर्य दैवगति । आम्हां संप्राप्ति हरिपद तें ॥१३॥अनेक सुकृतें वैकुंठ । न टके करितां तपादि कष्ट । भाग्यें जोडल्या गरुडपृष्ठ । मग होय प्रविष्ट अक्लेशें ॥१४॥तेंवि हे श्रीकृष्णपदाब्जरेणु । आम्हां जोडलें भाग्येंकरून । यांच्या अभिषेकें जनार्दन । विधिहरां समान पावों गे ॥२१५॥हरिप्राप्तीचें द्वार मुख्य । हरिपदधूळीचा अभिषेक । येणें श्रीकृष्णाचें ऐक्य । घडतां अशक्य न मनावें ॥१६॥ऐसा ऐकोनि निर्धार । पदाब्जरेणुवंदनपर । होतां आणिकी गोपी क्रूर । वदल्या उत्तर तें ऐका ॥१७॥तस्या अमूनि नः क्षोभं कुर्वंत्युच्चैः पदानि यत् । यैकापहृत्य गोपीनां रहो भुंक्तेऽच्युताधरम् ॥३०॥कृष्णपदाब्जधूळि मौळीं । वंदिती विरंचिरमाशूळी । आम्हांसि सुलभ ते ये काळीं । म्हणोनि भूतळीं न्याहाळिती ॥१८॥तंव ते लागिं नीचीं इयें पदें । कृष्णपदाब्जामाजि विशदें । पाहतां आमुचें हृदय खेदें । विरहविषादें झडपिलें ॥१९॥पाहतां श्रीकृष्णपदाब्जरेणु । तंव त्यांमाजि मिश्रित तीचे चरण । देखतां क्षोभाचें कारण । काय म्हणोन तें ऐका ॥२२०॥आम्हां समस्ता गोपिकांचा । जीवनकंद जो कां साचा । तो अधरोष्ठ अच्युताचा । एकली एकांतीं ते प्राशी ॥२१॥समस्त गोपींचें जीवन । श्रीकृष्णाचें अधरपान । एकली एकांती नेऊन । भोगी संपूर्ण स्वच्छंदें ॥२२॥कृष्णांघ्रिमाजि तिचीं पदें । आमुचे दृष्टी पडतां विशदें । चित्तें क्षोभविती विरहविषादें । दुःख नुसधें वाढविती ॥२३॥कृष्णचरणकमळींचे रेणु । वंदिती रमा विरंचि ईशान । आम्हां आनंद तो न फवोन । दुःख दारुण सापत्न्यें ॥२४॥यालागीं तिचीं पदें नसतीं । ऐसिया कृष्णपदाची प्राप्ति । लाहों तैं वंदों माती । सुखविश्रांतिकारणें ॥२२५॥ऐसा सापत्न्यवितर्क । करूनि अमिश्र हरिपदांक । हुडकिती तो भावार्थ अचुक । वदला शुक तीं श्लोकीं ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP