मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर आरुह्यैका पदाक्रम्य शिरस्याहापरां नृप । दुष्ट हे गच्छ जातोऽहं खलानां ननु दंडधृक् ॥२१॥तंव कालियमथनानुकारा । दावूनि बोले एकी दारा । एक्या पायें दडपूनि शिरा । करें पुंसारा धरूनियां ॥१७०॥म्हणे रे दुष्टा कालिय फणी । रमणकद्वीपा जाय येथुनी । जन्मलों मी चक्रपाणि । खळनिग्रहणीं जाणावें ॥७१॥ऐशी अपरांगनेप्रति । दावूनि कालियमथनानुकृति । तेथ आणिकां गोपींप्रति । जाली वदती पैं एकी ॥७२॥तत्रैकोवाच हे गोपा दावाग्निं पश्यतोल्बणम् । चक्षुंष्याश्वपिदध्वं वो विधास्ये क्षेममंजसा ॥२२॥अरे गोप हो हा दावाग्नि । महाउल्बण पेटला वनीं । तुम्हीं माझिये आज्ञेकरूनी । सवेग लोचनें झांकावीं ॥७३॥तुमचें करीन मी रक्षण । म्हणोनि अनुकरती दावाग्निपान । तंव एकी दामोदर होऊन । उलूखलबंधन अनुकरे ॥७४॥बद्धाऽन्यया स्रजा काचित्तन्वी तत्र उलूखले । भीता सुदृक्पिधायास्यं भेजें भीतिविडंबनम् ॥२३॥एकी भावूनि दामोदरा । अन्या यशोदा सुंदरा । अवगोनि होय शासनपरा । त्या अनुकारा परियेसा ॥१७५॥स्वयें प्रवर्ते दधिमंथनीं । येरी कृष्णत्वें लागे स्तनीं । दुग्ध उततां देखोनि नयनीं । धांवे टाकोनि अतृप्त ॥७६॥कृष्ण मंथनभाण्डें फोडी । सवेंचि धांवोनि शिंकीं तोडी । यशोदा धरूं धांवे तांतडी । लवडसवडी येरु पळे ॥७७॥पुष्पमाळेनें नंददारा । उखळीं बांधी दामोदरा । ऐसिया दाविती अनुकारा । भयविकारा प्रकटिती ॥७८॥पळतां यशोदा धरिला हरि । तेणें भयभीत अंतरीं । दोन्ही हात लावूनि वक्त्रीं । पाहे नेत्रीं भयाकुळ ॥७९॥झणें यशोदा शिंपुटी मारी । यास्तव वामकर आड धरी । ऐसिया भयाच्या अनुकारीं । बल्लवनारी अनुकरती ॥१८०॥एवं कृष्णं पृच्छमाना वृंदावनलतास्तरून् । व्यचक्षत वनोद्देशे पदानि परमात्मनः ॥२४॥ऐसिया कृष्णगवेषणीं । फिरत फिरतां वनोपवनीं । पुन्हा पातल्या वृंदावनीं । यदृच्छेकरूनि भ्रमभरिता ॥८१॥वृंदावनींच्या नाना लतिका । जाती मल्लिका मालतिका । कुंद मोगरे सेवंतिका । लवंगवल्लिका शतपत्री ॥८२॥पाग त्रायंती वैकंकती । शंखिनी हिरण्या गरुत्मती । गजकर्णिका क्षौद्रा यूथी । मधुमालती डिंडिका ॥८३॥ऐशा अनेक वल्लीलता । गुल्मप्रमुख जाति बहुता । त्यांसि पुसती मन्मथजनिता । विरहभ्रांता व्रजललना ॥८४॥नाग पुन्नाग अर्जुन । चंदन चंपक रातांजन । नीप करंज राजादन । कुंजराशन न्यग्रोध ॥१८५॥देवदार कोविदार । चूत पारियातक मंदार । पनस पलाश पारिभद्र । बीजपूर प्लक्षादि ॥८६॥ऐशा अनेक तरुवरलता । पुढें भेटती वनीं फिरतां । त्यांतें पुसती स्मरमोहिता । प्रमुदित वार्ता कृष्णाची ॥८७॥भूमीशीं उमटलीं पाउलें । भाग्यें दुर्लभ दर्शन झालें । तेथेंचि त्यांचें मन गुंतलें । तेंही विवरिलें तें ऐका ॥८८॥तव आकस्मात वनप्रदेशीं । सोज्वळ भूमि शर्करे ऐशी । तेथें कृष्णाच्या पदांकाशीं । चंद्रप्रकाशीं देखती ॥८९॥पदानि व्यक्तमेतानि नंदसोनोर्महात्मनः । लक्ष्यंते हि ध्वजांभोजवज्रांकुशयवादिभिः ॥२५॥महांत जे कां ब्रह्मादिक । त्यांहूनि महत्त्वें अधिक । तो महात्मा नंदतोक । त्याचे पदांक हे व्यक्त ॥१९०॥ध्वजाब्जयवांकुश देखिले । ऊर्ध्व रेखा वज्राथिले । इत्यादि चिह्नीं उपलक्षिले । व्यक्त पाउलें कृष्णाचीं ॥९१॥तेचि घेवोनि कृष्णपदवी । गोपी विरहिणी आर्तभावीं । त्यांची जिज्ञासा आघवी । व्यक्त परिसावी चतुरांहीं ॥९२॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP