मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २३ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय २३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय २३ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर नूनं भगवतो माया योगिनामपि मोहिनी । यद्वयं गुरवो नॄणां स्वार्थे मुह्यामहे द्विजाः ॥४१॥निश्चयेंशीं हे हरीची माया । योगियांसिही भुलवावया । समर्थ तेथ आमुचा वायां । ज्ञानचातुर्यादिकवर्ग ॥४३५॥वशिष्ठासी पुत्रशोक । नारदासि अंगनावेख । साठी पुत्रेंशीं पतीचें दुःख । इत्यादिजनक हरिमाया ॥३६॥येरवीं मनुष्यामाजीं थोर । आम्ही गुरुत्वें भूनिर्जर । केवढा पडला अंधकार । स्वार्थ साचार विसर्लों ॥३७॥हितोपदेशें मनुष्यांसी । पात्र झालों गुरुत्वासी । ते अंतरलों निजहितासी । दैवी मायेसी वश्य झालों ॥३८॥आम्हांहूनि धन्य नारी । श्रुताधीतें रहिता घरीं । सप्रेमभक्ति अभ्यंतरीं । जगदीश्वरीं निष्काम ॥३९॥अहो पश्यत नारीणामपि कृष्णे जगद्गुरौ । दुरंतभावं योऽविध्यन् मृत्युपाशान् गृहाभिधान् ॥४२॥अहो आश्चर्य पहा कैसें । भोळीं स्त्रियांचीं मानसें । भगवत्प्रेम तेथ ऐसें । अप्रायासें अवतरलें ॥४४०॥अखिलब्रह्मांडाचा जनक । तो हा प्रत्यक्ष यदुनायक । त्याचे चरणीं आत्यंतिक । प्रेमा निष्टंक स्त्रियांचा ॥४१॥दुर्लभ सायुज्याचिये माथां । भक्ति आत्यंतिकी तत्त्वता । जिणें कवळिलिया भगवंता । मग भगवत्कथा ते कैंची ॥४२॥ते भक्तीचा प्रादुर्भाव । स्त्रियांचे ठायीं हेंचि अपूर्व । जेणें तोडिला पाश सर्व । संसारसंभवबंधाचा ॥४३॥लोहादिनिगडही तोडिती । ते गृहबंधनीं बळेंचि पडती । ममतापाशीं सांपडती । मोहभ्रांति सर्वज्ञ ॥४४॥ऐसे संसारमोहपाश । पुत्र वित्त आप्त अशेष । इत्यादिनामीं बांधोनि भ्रंश । करूनि दुःखास भेटविती ॥४४५॥सप्रेमकृष्णभक्तीच्या मुळें । स्त्रियांहीं तोडिले ते एकेचि वेळे । नसतां साधनांची आंगीं बळें । केंवि हें न कळे आम्हांसी ॥४६॥नासां द्विजातिसंस्कारो न निवासो गुरावपि । न तपो नात्ममीमांसा न शौचं न क्रियाः शुभाः ॥४३॥चौलोपनयनादि संस्कार । स्त्रियांसी नाहींत कीं साचार । संध्यावंदन क्रियाधार । शौचाचार पैं नाहीं ॥४७॥गुरुप्रसादन शांतिपाठ । नाहीं निवास गुरुनिकट । गुरुपरिचर्येची कटकट । स्त्रिया स्पष्ट नेणती ॥४८॥अथवा इष्टपूर्त करणें । ज्यांसि नाह्नीं स्वतंत्रपणें । वेदांतशारीर विचारणें । पाञ्चीकरणवाक्यादि ॥४९॥ध्यान धारणा आसन मुद्रा । प्राणरोधणें प्राशणें चंद्रा । इत्यादि साधनें जीं योगींद्रा । तीं या सुंदरा नेणती ॥४५०॥ऐशिया विकट कामिनी । कृष्णीं मीनल्या एकांतभजनीं । हें आश्चर्य अंतःकरणीं । बहुतां गुणीं वाटतसे ॥५१॥अथापि ह्युत्तमश्लोके कृष्णे योगेश्वरेश्वरे । भक्तिर्दृढा न चास्माकं संस्कारादिमतामपि ॥४४॥आम्ही सर्वसंस्कारवंत । वेदशास्त्रपारंगत । त्यां आम्हांसि प्रेमतंतु । नाहीं संतत भक्तीचा ॥५२॥योगेश्वरांचा ईश्वर । उत्तमश्लोक निर्विकार । कृष्ण परब्रह्म साचार । नेणती पार शिवविधि ॥५३॥तथापि आमुची त्याच्या ठायीं । दृढविश्वासें भक्ति नाहीं । जैसा प्रेमा स्त्रियांचे ठायीं । उपलब्ध पाहीं पूर्णत्वें ॥५४॥ननु स्वार्थविमूढानां प्रमत्तानां गृहेहया । अहो नः स्मारयामास गोपवावयैः सतां गतिः ॥४५॥अहो हेंचि आश्चर्य मोठें । निश्चयेंशीं आम्हांसि वाटे । स्वार्थीं विमुख धाटेमोठे । अम्ही करंटे कर्मठ ॥४५५॥घोकिंवा विद्येचा गर्व बहुत । तेणें अभिमानें मूढप्रमत्त । गृहचेष्टांचें कौशल्यकृत्य । दावूं समस्त लौकिकीं ॥५६॥टिळे माळा खटाटोप । नानाक्रियांचे आटोप । तपश्चर्यांचे प्रताप । दावूं समीप येती तयां ॥५७॥ऐकांतिकी भगवद्भक्ति । नसतां अवघे अधःपाती । ऐशिया आम्हा सतांगति । करुणामूर्ति कळवळिला ॥५८॥गोपां हातीं याच्ञावचन । पाठवूनियां दिधलें स्मरण । परंतु आम्ही दैवहीन । नाहीं पूर्ण समजलों ॥५९॥आमुच्या उद्धाराकारणें । याच्ञामिसें स्मरण देणें । येर्हवी त्या कारुण्यपूर्णें । याच्ञा करणें किमर्थ ॥४६०॥समुद्र तान्हेला मृगजळा । धुंधुरेंवीण रवि आंधळा । तैसें तया त्रैलोक्यपाळा । याच्ञाछळा अनुसरणें ॥६१॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP