मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २३ वा| श्लोक ६ ते १० अध्याय २३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय २३ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर गोपा ऊचु :- हे भूमि देवाः श्रृणुत कृष्णस्यादेशकारिणः । प्राप्ताञ्जानीत भद्रं वो गोपान्नो रामचोदितान् ॥६॥गोप म्हणती भूसुराप्रती । तुम्ही समस्त वेदमूर्ति । आम्हां कृष्णकिंकरांची विनती । ऐकोनि चित्तीं विवरा हो ॥६८॥आम्ही कृष्णाचे आज्ञाकरी । तुम्हीं जाणावें अंतरीं । रामकृष्णांचे वचनावरी । तुमचिये द्वारीं पातलों ॥६९॥कल्याण असावें तुम्हांसी । येथूनि समीप हृषीकेशी । गाई चारी अग्रजेंशीं । वनीं उपवासी क्रीडत ॥७०॥गाश्चारयंतावविदूर ओदनं रामाच्युतौ वो लषतो बुभुक्षितौ । तयोर्द्विजा ओदनमर्थिनोर्यदि श्रद्धा च वो यच्छत धर्मवित्तमाः ॥७॥बहुत दूर ना समीप । धेनु पाजूनि यमुना आप । आम्हां हातीं हा निरोप । ससाक्षेप पाठविला ॥७१॥रामकृष्ण क्षुधाक्रांत । सहित संवगडे समस्त । तुमच्या अन्नाची इच्छा बहुत । धरूनि निवांत बैसले ॥७२॥रामकृष्णांच्या ठायीं भक्ति । वर्तत असेल तुमच्या चित्तीं । तरी ओदन देऊनि आमुच्या हातीं । कृष्णाप्रति पाठविजे ॥७३॥जरी म्हणाल आम्ही दीक्षित । आमुचीं अन्नें सुसंस्कृत । विप्रभोजनाविरहित । नाहीं अर्पित इतरांसी ॥७४॥कृष्ण साक्षात् श्रीभगवान् । षड्गुणैश्वर्यसंपन्न । त्यासि सप्रेम देतां अन्न । सफळ यज्ञ निर्दोष ॥७५॥आमुचीं न होतां भोजनें । तुम्हांसि देऊं नयेती अन्नें । तरी यदर्थीं ऐका वचनें । जीं प्रमाणें श्रुतिस्मृति ॥७६॥दीक्षायाः पशुसंस्थायाः सौत्रामण्याश्च सत्तमाः । अन्यत्र दीक्षितस्यापि नान्नमश्नह्नि दुष्यति ॥८॥दीक्षाग्रहण केलिया वरी । पशुसंस्थाख्यअध्वरीं । जोंवरी पश्वालंभन करी । अग्नीषामीयइष्टीचा ॥७७॥तंववरी भक्षूं नये अन्न । न कीजे कोणासि अर्पण । भक्षितां देतां लागे दूषण । विधिलंघन म्हणोनी ॥७८॥तैसीच सौत्रामण्यमखीं । दानीं भक्षणीं अन्नविखीं । श्रुतीनें केली उखीविखी । विधिलंघनदोषाची ॥७९॥अन्यत्र सर्व क्रतूंच्या ठायीं । दानीं भक्षणीं दूषण कांहीं । दीक्षित अस्तां यजमानही । निषेध नाहीं अन्नाचा ॥८०॥अन्यत्र दीक्षितांचेंही अन्न । न भक्षितां दीक्षित यजमान । देतां घेतां निर्दूषण । तुम्ही विचक्षणसत्तम ॥८१॥इति ते भगवद्याच्ञां श्रृण्वंतोऽपि न शुश्रुवुः । क्षुद्राशा भूरिकर्माणो बालिशा वृद्धमानिनः ॥९॥ऐशी भगवंतें याच्ञा केली । संवगडियांहीं निवेदिली । ब्राह्मणीं ऐकोनि नायकिली । जे कर्मभुली भूलले ॥८२॥कर्मभुलीचें लक्षण । असतां बालिश अज्ञान । ज्ञानवृद्ध महामान्य । आपणां आपण मानिती ॥८३॥जात असतां पश्चिमेकडे । पश्चिम म्हणतां लाविती वेडें । पूर्ण म्हणती कवळिले मौढ्यें । दिग्भ्रम रोकडे नुमजती ॥८४॥वेळुवावरी चढणें उडणें । नग्नशस्त्रेंशीं झगटणें । सर्पजिह्वेसी डसवणें । भीक मागणें फळ त्याचें ॥८५॥व्याघ्र सर्प काळ कोपी । त्यांतें रक्षूनि साक्षेपीं । भिकेपरौते महापापी । कोणे कल्पीं वर होती ॥८६॥मेरु खणोनि परता करणें । ते भू अमृतोदकें भिजविणें । तेथें धत्तूर पिकवूनि खाणें । भुलीचें जिणें तें ऐसें ॥८७॥बहुत करूनि कर्मक्लेश । वरजन्माचा आयुष्यनाश । धरिती स्वर्गभोगीं हव्यास । म्हणोनि बालिश याज्ञिक ॥८८॥झणें होईल कर्म व्यंग । तरी अंतरेल स्वर्गभोग । ऐसिया बुद्धी यज्ञान्तरंग । जिहीं श्रीरंग नादरिला ॥८९॥एका श्रीकृष्णस्मरणासाठीं । बैसिजे सायुज्यश्रियेच्या पाठीं । नेणोनि याज्ञिकें करंटीं । कर्मराहाटीं भांबावलीं ॥९०॥वेदीं शास्त्रीं आणि पुराणीं । महिमा ऐकिला असतां श्रवणीं । गोपमुखें हे त्याचीच वाणी । ऐकोनि कर्णीं न घेती ॥९१॥जाणोनि नृपाचें अंतर । शंका आणि प्रत्युत्तर । जें बोलिला शुक योगींद्र । तें येथ चतुर परिसोत ॥९२॥देशः कालः पृथग्द्रव्यं मन्त्रतन्त्रर्त्विजोऽग्नयः । देवतायजमानश्च क्रतुर्धर्मश्च यन्मयः ॥१०॥म्हणसी राया जरी तूं ऐसें । देशकालें देवतोद्देशें । यज्ञीं विभाग विहित असे । तो अन्योद्देशें केंवि दीजे ॥९३॥जेथ कृष्णमृगांचा स्वेच्छावास । अश्वत्थ शमी पलाश प्लश । तिल यव दूर्वा मुंजा कुश । तो तो देश यज्ञार्ह ॥९४॥जेथ निर्दोष वेदाध्ययनें । जेथ निर्दोष सुब्रह्मण्यें । जेथ निर्दोष कर्माचरणें । तो देश जाणणें यज्ञार्ह ॥९५॥जेथ अष्टदशधान्योप्तत्ति । वर्णविभाग यथाविहितीं । आश्रमादि धर्मप्रवृत्ति । ते ते क्षिति यज्ञार्ह ॥९६॥गंगायमुनामध्यदेश । पुण्यफळद अतिविशेष । त्याहूनि कोटिगुणें उत्कर्ष । प्रयागक्षेत्रीं श्रुति वर्णी ॥९७॥पुण्यनद्यांचीं उभयतीरें । पुष्करादिसरोवरें । पुण्यारण्यें पावनें ऊषरें । पुण्यक्षेत्रें यज्ञार्ह ॥९८॥सौराष्ट्र मगध कलिंग । कामरूप अंग वंग । कच्छकीकट यकटंग । मरुवाडादि निषिद्ध ॥९९॥तुळवेहैवेकिग कोकण । मलयार मखर जांगल हूण । तुरुष्कादि सदूषण । अब्रह्मण्य दुर्देश ॥१००॥तीर्थ क्षेत्र यात्रेविण । इत्यादि देशीं करितां गमन । पतित होती चार्ही वर्ण । पावतां मरण अधोगति ॥१॥ऐसा देशाचा निर्देश । कुंडमंडपवेदिप्रदेश । कर्मनिर्दिष्ट सूक्ष्मदेश । सामान्य विशेष त्यामाजीं ॥२॥अमुक देशीं पात्रासादन । अमुके स्थळीं ब्रह्मासन । अमुके प्रदेशीं यजमान । ऐसें प्रमाण पार्थक्यें ॥३॥कृतयुगीं पुण्यकाळ । त्रेतायुगीं तोचि समळ । द्वापरीं होय अर्धविवळ । मलिन केवळ कलिसमय ॥४॥सूर्यप्रकाशें पदार्थज्ञान । अणूपासूनि थोर लहान । शुद्धाशुद्ध जाणोनि नयन । वर्तती जाण निःशंक ॥१०५॥तेचि रात्रीं अग्निप्रकाशें । नयन साशंक देखती जैसे । त्याहूनि उतरले ते मंद जैसें । पुनिवेपासूनि शशितेजें ॥६॥तैसे कृतयुगींचे जन । सत्यशौचसत्त्वसंपन्न । देवमनुष्यादि भगवान । ते संपूर्ण वोळखती ॥७॥जाणोनि उचित योग्यायोग्य । कर्म आचरती अव्यंग । असत्याचा न लगे डाग । म्हणोनि श्रीरंग आकळिती ॥८॥मग कलीपर्यंत उत्तरोत्तर । सत्यलोपें असत्याचार । तेणें पडला अंधकार । अविद्याप्रचुर अज्ञान ॥९॥कृतीं ध्यान त्रेतीं यज्ञ । अर्चन आणि संकीर्तन । कालानुरूप केलें प्रमाण । द्वापरीं आणि कलिकाळीं ॥११०॥वेदोदित कर्माचरण । तपश्चर्या यज्ञदान । कलीपर्यंत बोलिले जाण । परी ते खूण अनारिसी ॥११॥वेदशास्त्रक्रियारक्षण । काळपरत्वें न्यून पूर्ण । विहिताविहित गौणागौण । कर्माचरण वेदाज्ञा ॥१२॥देवरापासूनि सुतोत्पत्ति । पितृयज्ञीं फळप्रवृत्ति । गवालंभ यज्ञीं विहितीं । आश्रमीं यति कलिवर्ज्य ॥१३॥पंचसहस्र वर्षें कलि । भरे तोंपर्यंत भूमंडळीं । वराण्श्रमाचार कुळीं । आभासमात्र उरतील ॥१४॥पुढें पुढें लुप्ताचार । आश्रमधर्मवर्णसंकर । ऐसें कलिकालीं होणार । काळविचार तो ऐसा ॥११५॥त्याहीमाजि कालविशेष । अयन ऋतु मास पक्ष । तिथि वासर ऋक्ष निर्दोष । ज्या कर्मास जें युक्त ॥१६॥पैत्रकर्मोदित जो काळ । तो देवकर्मी अमंगळ । शांतिकपौष्टिककर्म सकळ । समयीं सकळ यथोक्त ॥१७॥तैशींच द्रव्यें पृथक् पृथक् । चरु पुरोडाश बस्त घोटक । आज्य पिष्ट क्षालनोदक । ऐशीं अनेक विधिप्रणीत ॥१८॥अग्निसूर्यसोमप्रमुख । यज्ञदेवता पृथक् पृथक् नामलिंगक्रियासूचन । मंत्र पृथक् बोलिले ॥१९॥सव्यें अपसव्यें व्यत्यासें । तंत्रही पृथक् अनारिसें । ऋत्विजही तदुद्देशें । न्यूनाधिक्यकल्पना ॥१२०॥आहवनीय दक्षिणाग्नि । गृहपति सभ्य आवसथ्य वह्नि । नानाइष्टि नानाभिधानीं । पृथग्विधानीं पावक ॥२१॥प्रधानदेवताही पृथक् । विविध यजमान कामनात्मक । क्रियाकलाप क्रतु अनेक । धर्म निष्टंक तद्गदित ॥२२॥क्रतु करितां कोणी एक । देशकालद्रव्यादिक । हें अवघेचि पृथक् पृथक् । विधि सम्यक् अचुक हा ॥२३॥यथोक्त देशीं काळीं याग । देवतापरत्वें द्रव्यविभाग । तेणें यज्ञफल आतुडे सांग । होय व्यंग वैगुण्यें ॥२४॥ऐसें असतां विधिबंधन । तरी गोवळां केंवि दीजे अन्न । म्हणाल तरी हा श्रीभगवान । स्मरणें यज्ञफलदाता ॥१२५॥कृतयुगीं सत्यव्रती । म्हणोनी भगवल्लीला वोळखती । तेचि कलिकाळसंप्राप्ति । जन नोळखती हरिमहिमा ॥२६॥अहं क्रतुरहं यज्ञः । देशकालादि संपूर्ण । एवं हरिमय हें जाणोन । करिती अर्पण हरिप्रेमें ॥२७॥जेवीं मुखीं घालितां ग्रास । जीवचैतन्या होय तोष । तेणें करणसमुच्चयास पोष । कीं तो अशेष तन्मय ॥२८॥देशकालादि अवघें तैसें । भगवन्मयचि स्वयंभ असे । तो श्रीकृष्ण गोपवेशें । नेणती पिसे कर्मठ ॥२९॥कलिकल्मषें ज्ञानदृष्टि । लोपूनि कर्माची परिपाटी । पूर्वप्रवाहें करिती इष्टि । भगवत्तुष्टि नेणोनी ॥१३०॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP