अध्याय २३ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
अनुपमा जी गरिष्ठतमा । परमलाघवें सर्वीं समा । द्वैताद्वैतनिक्षेपधामा । पूर्णकामा गोविंदा ॥१॥
पिंजूनि मोकळा केला तूळ । तो विशाळ भासे परंतु हळु । तैसाचि पुरुष क्षमादिशीळ । लघुत्वें केवळ गुरुतर ॥२॥
मेरुसागरकुळाचळ - । सहित सगळा ब्रह्मांडगोळ । तवानुग्रहलेशें व्याळ । वाहे केवळ तिलप्राय ॥३॥
ब्रह्मांडाहूनि गरिष्ठसार । तरीच वाहे ब्रह्मांडभार । तेथ वसिष्ठाचा दर्भांकुर । झाला पटुतर तत्कर्मीं ॥४॥
ज्याचेनि चिंतनें वशिष्ठासी । तपऐश्वर्यें शक्ति ऐसी । तोचि तूं अनंतब्रह्मांडांसी । न धरूनि वाहसी ऐश्वर्यें ॥५॥
अनंतब्रह्मांडांचिया श्रेणी । निमेषाचिया मीलनोन्मीलनीं । एवढी गरिष्ठता कोणीं । केंवि उपमानीं उपमिजे ॥६॥
न पुरे उपमेसी ईश्वर । कीं त्याचा ही ऐश्वर्यभार । उतरोनि वोपिसी निजशेजार । अक्षय सन्मात्र कृपेनें ॥७॥
म्हणाल ईश्वरें आदिशक्ति । प्रबोधिली पूर्णस्थिती । तेचि सद्गुरुभजनोपलब्ध युक्ति । निजात्मस्थितिप्रापक ॥८॥
काष्ठापोटीं प्रकटे वह्नि । तो काय गणिजे काष्ठपणीं । प्रकटे भजनसंवादमथनीं । तेंवि ज्ञानाग्नि ईशत्वीं ॥९॥
एकाकी न रमे या कषायें । इच्छाशक्तीच्या उपायें । अभीष्ट बहुत्व जें कां होये । तज्ज्ञातृत्वकर्तृत्व ॥१०॥
त्यासीच बोलिजे सर्वशब्दें । तन्नियंतृत्वें ईशत्व नांदे । विक्षेपजनकें ईश्वरपदें । केंवि स्वबोधें जागिजे ॥११॥
निकटवासियां सुलभ जल । येरां दुर्लभ प्रयत्नबहळ । परंतु उभयत्र केवळ । स्थितिवेगळ जळेंशीं ॥१२॥
गगनचुंबित विशाळ मठ । त्यामाजि सर्षपमात्र एक घट । तारतम्येंचि लघु वरिष्ठ । ऐक्यीं विपट सम व्योमीं ॥१३॥
म्हणाल ईश्वरावांचुनि कोण्हीं । नाहीं ऐकिला प्रथमस्फुरणीं । तरी तें वामांग ईश्वरपणीं । आंगीं दक्षिणीं गुरुत्व ॥१४॥
जेंवि रसना आणि वाणी । दोन्ही असती एकेचि लपनीं । वागिंद्रिय संभाषणीं । रसास्वादनीं रसज्ञा ॥१५॥
तेथ वाक्शून्याची गिरा । समर्थ नोहे वाग्व्यापारा । परी रसास्वादनविचारा । जेंवि पटुतरा देखिजे ॥१६॥
तैसा सर्वज्ञ कर्ता ईश्वर । परी उतरूं न शकेचि स्वोपाधिभार । यालागिं तोही तव किंकर । नोहे सधर उपमेतें ॥१७॥
ऐसा अनुपम गरिष्ठतम । परंतु लाघवें सर्वीं सम । ईश्वरमौळीं पूर्णकाम । सहस्रदळीं नांदसी ॥१८॥
जो तूं ईश्वराचिये शिरसीं । तो तूं सामान्या उपेक्षिसी । प्राणिमात्रीं स्वप्रकाशीं । वसति करिशी सहस्रदळीं ॥१९॥
यालागिं गुरुत्वें लाघवें । तूं अनुपमचि निजवैभवें । यास्तव द्वैताद्वैत आघवें । सम्यक् सांठवे तुजमाजीं ॥२०॥
तुझ्या ठायीं कामना नसे । याचि लागिं अभेददशे । द्वैताद्वैत समूळ रुसे । सहजप्रकाशें पूर्णता ॥२१॥
त्या तुज नमो पूर्णकामा । वेदांतवेद्या परब्रह्मा । गोगोपका गोविंदनामा । श्रीपरमात्मा सर्वगा ॥२२॥
तंव सद्गुरु म्हणती स्तवन पुरे । कात्यायनीव्रतानंतरें । तेविसाव्या अध्यायीं व्यासकुमरें । कथिलें तें तूं निरूपीं ॥२३॥
एवं आज्ञाश्रीपादगांगें । पावन करितां त्रिविध जगें । रिक्तदयार्णव तत्प्रसंगें । निदाघभंगें भरियेला ॥२४॥
तेथ जलशायी भगवान् । प्रश्नावधानें श्रोते जन । संवादसुमनीं अभ्यर्चून । होती संपन्न प्रसादें ॥२५॥
आता तृतीय एकादशिनी । उपाइली जे निरूपणीं । ते प्रभूचिये आज्ञेवरूनी । वाखाणिजेल तत्सत्ता ॥२६॥
तेथ तेविसामाजि गडी । क्षुधित कृष्णा घालूनि कोडीं । प्रार्थितां यज्ञमंडपा धाडी । तिहीं ते बराडी दवडिले ॥२७॥
तया कर्मठांचा गर्व । हरूनियां वासुदेव । तत्पत्न्यांचा प्रेमभाव । देखोनि अपूर्व तुष्टला ॥२८॥
चोव्विसामाजीं इंद्रमख । निषेधूनि मन्मथजनक । गोवर्धनाध्वर मुख्य । प्रवर्तक हेतुवादीं ॥२९॥
पंचविसाव्या अध्यायीं शक्र । क्षोभें प्रेरितां मेघचक्र । गिरी उचलूनियां अवक्र । व्रज समग्र हरि रक्षी ॥३०॥
सव्विसाव्या अध्यायीं गोप । विस्मित देखूनि हरिप्रताप । नंदें लावूनि गर्गोक्तिदीप । केला लोप भ्रमतमा ॥३१॥
श्रीकृष्णाची अद्भुत शक्ति । देखोनि सुरभि आणि सुरपति । गवेंद्रपदीं अभिषेकिती । हे उत्साहकीर्ति सत्ताविशीं ॥३२॥
अठ्ठाविसामाजीं वरुण । करी नंदाचें कर्षण । कृष्ण करी तन्मोक्षण । वैकुंठदर्शन गोपां दे ॥३३॥
एकुणतिशीं गोपिकाहरि । व्यंग्योत्तरें परस्परें । वदोनि रासक्रीडा आदरी । गुप्तकांतारीं तद्व्याजें ॥३४॥
तिसाव्यामाजि विरहतप्ता । गोपी हुडकिती कृष्णनाथा । वनोपवनीं शंकारहिता । भ्रमती उन्मत्ता सारिख्या ॥३५॥
एकतिसाव्यामाजीं पुन्हा । पुलिना आल्या व्रजांगना । विरहप्रेमें करिती गायना । कृष्णागमना प्रार्थिती ॥३६॥
बत्तिसाव्यांत गोपीगीतीं । कृष्ण कळवळूनियां चित्तीं । प्रकट होऊनि तयांप्रति । सांत्वनोक्ती सन्मानी ॥३७॥
तेहतिसाव्यांत यदुनायक । रासक्रीडा सकौतुक । गोपी रमवी एकानेक । अलौकिक वनकेलि ॥३८॥
इत्यादि कथानिरूपणीं । रसाळ तृतीयएकादशिनी । श्रीप्रभूचिये आज्ञेवरूनी । ताद्व्याख्यानीं प्रवृत्ति ॥३९॥
रासक्रीडा सप्रेमरस । कल्पूं न शके धीमानस । सद्गुरुकृपावरदलेश । देह व्यास तत्कथनीं ॥४०॥
तुम्हीं सज्जनीं तदनुसार । देतां पूर्ण कृपेचा नीहार । मादृश बुद्धिमंद पामर । होईल सधर व्याख्यानीं ॥४१॥
संतकृपेच्या अनुमोदनें । वाड्मयप्रवाह प्रकते वदनें । ज्यामाजि निगमागमार्थसदनें । करिती कदनें कलिमला ॥४२॥
हें ऐकोनि संतसदय । म्हणती अभेदीं स्तवन काय । आम्ही अधिष्ठूनि तुझें हृदय । निखिल वाड्मय प्रकाशूं ॥४३॥
ऐसे सज्जनसद्गुरुवरद । लाहूनि तत्कृपेचा प्रसाद । म्हणें ऐका कथा विशद । गोपगोविंदचरित्र ॥४४॥
गोपिकांचीं देऊनि चीरें । वनीं चारितां गाई गुरें । क्षुधाक्रांत झालीं पोरें । करुणोत्तरें विनविती ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP