मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ५८ ते ६४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५८ ते ६४ Translation - भाषांतर ततोऽर्वाक्प्रतिलब्धाक्षः कः परेतवदुत्थितः । कृच्छ्रादुन्मील्य वै दृष्टीराचष्टेदं सहाऽऽत्मना ॥५८॥अविद्येची घालितां बुंथी । विश्वाभिमानात्म जे स्मृति । लाहोनि पूर्ववत जागृति । क्लेशें पातीं उघडलीं ॥६२॥अर्वाक म्हणिजे ऐलिकदे । स्वरूपापासुनि विषयचाडें । पाठिमोरीं करूनि तोंडें । करणकवाडें उघडलीं ॥६३॥ऐसा ब्रह्मा प्रतिलब्धाक्ष । ज्ञान लाहुनि परोक्ष । क्रियाचरणीं होऊनि दक्ष । प्रवृत्तिपक्ष अवलंबी ॥६४॥मृत्यु पावोनि जाला प्रेत । तो जेवीं उठे अकस्मात । पाहे होऊनि विस्मित । करणसंघात लाहूनि ॥६६५॥आपणासहित चराचर । हें देखिलें जे सविस्तर । दो श्लोकीं तें व्यासकुमार । सांगे विचार विवरूनि ॥६६॥सपद्येवाभितः पश्यन् दिशोऽपश्यत्पुरः स्थितम् । वृंदावनं जनाजीव्यद्रुमाकीर्ण समाप्रियम् ॥५९॥उघडुनि अष्टही नेत्रकमळें । भवतें अवलोकी एकेचि काळें । दिशाचक्र देखे पहिलें । आणि आपुलें शरीर ॥६७॥स्मृतीनें आळंगिली बुद्धि । संकल्प चढला मनाचे खांदीं । चित्त पूर्वानुसंधान साधी । आगमनसिद्धि किमर्थ हे ॥६८॥पाहों आलों कृष्णमहिमा । तोचि कीं एथ मी हा ब्रह्मा । हंसपृष्ठीमाजीं व्योमा । पावोनि भ्रमा उमजलों ॥६९॥सर्व जनासी जीवनरूप । ज्या माजी निबिड सत्पादप । ज्यांचेनि कल्पद्रुमाचा लोप । जे परम सकृप सफळित ॥६७०॥सर्वत्र सुखतम सर्वांप्रति । सर्व ऋतूचीं फळें फळती । सर्वां जंतूंसि विश्रांति । प्रियतम चित्तीं सर्वदा ॥७१॥विशेष विरिंचि आपुल्या नयनीं । आश्चर्य देखे पूर्विलाहूनि । तेचि परीक्षितीचे श्रवणीं । बादरायणि निवेदी ॥७२॥यत्र नैसर्गदुर्वैराः सहासन्नृमृगादयः । मित्राणीवाजितावासद्रुतरुट्तर्शकादिकम् ॥६०॥सर्वत्र सर्वांसि प्रियतम असे । पूर्विलाहोनि विशेष जैसें । वाखाणिजेल ऐका तैसें । स्वस्थ मानसें नावेक ॥७३॥जातिस्वभाव वैरभाव । सांडूनि प्राणिमात्र सर्व । मित्रापरी क्रीडती जीव । हें अपूर्व कुरुवर्या ॥७४॥गज केसरी कुरुवाळिती । व्याघ्र धेनूसी चाटिती । मशक मार्जार एकत्र वसती । स्तनें पाजिती परस्परें ॥६७५॥मंडूक पंडिताचिया श्रेणीं । गजर करिती दीर्घध्वनीं । चक्षुश्रवे त्या कीर्तनीं । आनंदोनि डुल्लती ॥७६॥पन्नग नकुळें आलिंगनें । देती सप्रेमें चुंबनें । अजा अविकां कंडुयनें । स्नेहाळपणें वृक करिती ॥७७॥भस्म संरक्षी जेवीं अग्नि । तैसा बुडवूनि ठेविजे जिवनीं । तैं न विझवी त्या लागूनि । हें अपूर्व नयनीं विधि देखे ॥७८॥मनुष्यासि सर्पादिक । करी केसरी व्याघ्र वृक । स्नेहें वर्तती वृश्चिकादिक । प्रेमपूर्वक परस्परें ॥७९॥जातिस्वभाव विसरोनि प्राणी । सप्रेम क्रीडती स्नेहाळपणी । हें अपूर्व पाहोनि नयनीं । अंतःकरणी विधि विवरी ॥६८०॥हें व्हावया कारण काय । ऐसें विवरूनि विरिंचि पाहे । तंव तेथें न देखे समुदाय । शत्रुवर्यषट्कांचा ॥८१॥द्वेष क्रोध मोह शोक । मद मत्सर लोभ प्रमुख । ईर्षा तर्षोत्कर्षादिक । एकें एक पळाले ॥८२॥क्रीडाभिमान चौघां शिरीं । चढोनि अक्षादि व्यवहारीं । मारिती मरती निजीवां सारीं । तेवीं षड्वैरी प्राण्यातें ॥८३॥इहीं रिघोनि शरीरामाजीं । प्राणियासि अनिष्ट काजीं । प्रेरूनि दुःखाच्या साम्राज्यीं । स्वभावगजीं बैसविती ॥८४॥एथूनि पळाले ते सर्व । हेंचि वाटतें अपूर्व । न कळे कोण्या कारणास्तव । हें लाघव व्रजविपिनीं ॥६८५॥पुढती विवरूनि निश्चय करी । विभु अवतरला व्रजपुरीं । त्याच्या निवासाची थोरी । तेणें षड्वैरी पळाले ॥८६॥ज्याच्या निवासवसतिभेणें । षड्वैर्यांचें उठणें । म्यांही ज्याचेनि दर्शनें । हें पेखणें अवगमिलें ॥८७॥त्या विभूचेंही जें विभुत्व । जें कां निर्गुणपरमतत्त्व । श्रुति म्हणती ज्या अमृतत्व । तें परब्रह्म शिशुत्व अवगलें पुन्हा ॥८८॥तत्रोद्वहत्पशुपवंशशिशुत्वनाट्यं ब्रह्माद्वयं परमनंतमगाधबोधम् ।वत्सान्सखीनिव पुरा परितो विचिन्वदेकं सपाणिकवलं परमेष्ठ्यचष्ट ॥६१॥तें ब्रह्म ते वृंदावनीं । पशुपवंशींची अवगणी । शिशुत्वाची संपादणी । ब्रह्मा नयनीं अवलोकी ॥८९॥नंदगोपाचा नंदन । हातीं पूर्ववत् दध्योदन । वत्सां वत्सपांलागून । हुडकी वन यथापूर्व ॥६९०॥नाट्य म्हणावें किमर्थ । तरी येथिचा ऐसा अर्थ । स्वरूप लोपवूनि यथार्थ । नटला स्वार्थ संपादी ॥९१॥यथार्थ काय कोणतें सोंग । श्लोकीं शुक हें बोलिला साङ्ग । त्या त्या पदाए विभाग । परिसा अव्यंग चतुरहो ॥९२॥अगाध बोध हें वास्तव । तो हुडकी हे नाट्यभाव । अद्वय आणि वत्ससमुदाव । शोधी लाघव हें सोगाचें ॥९३॥सूर्य आंधारीं चाचपडे । खद्योत दीपादि उजिवडें । वाट हुडकी तेणें पाडें । अगाध बोधा हुडकणें ॥९४॥अमृत आणि दुखण्या पडलें । सरोगा ओखद पुसों गेलें । औषधीचें हुडकी पालें । त्यांच्या बोलें हें तैसें ॥६९५॥अगाधबोध वत्सें गिंवसी । हे संपादणी नाट्या ऐशी । येर्हवीं ज्ञानस्वरूपासि । कोणेविषीं नेणपणा ॥९६॥अद्वयासी कैंचें दुसरें । तोही परिमार्गी वांसुरें । निःसंग आला सहपरिवारें । म्हणतां स्वउत्तरें लाजविती ॥९७॥एक म्हणोनि प्रशंसिलें । तेणें संवगडियां गिंवसिलें । म्हणतां सोंगसें दिसोनि आलें । ब्रह्म एकलें सत्यत्वें ॥९८॥अनंत ज्यासी म्हणणें घडे । आणि तो हुडकी सर्वांकडे । हें बोलणेंचि असें घडे । बोलतां वेडें लागतसे ॥९९॥अनंतासि नाहीं अंत । त्याभोंवता कैंचा प्रांत । तो वत्सांवत्सपां हुडकीत । हे अवधी मात नाट्य कीं ॥७००॥पर म्हणोनि निर्धारिलें । तेंचि शिशुत्व पावलें । हें विडंबन मात्र जालें । न पवे बोलिलें सत्यत्वें ॥१॥यद्गत्वा न निवर्तंते । तें परम धामा बोलिजेतें । तेंचि शिशुत्व जरी पावतें । तरी गेलें न परते केवीं तेथें ॥२॥कल्पतरूचि मागे भिक । तैं कल्पनावंता कैंचें सुख । तैसें परची जैं होय बालक । तेथें मीनले साधक न फिरती कां ॥३॥जें परात्पर मायातीत । तेथें कैंचें गुणाचें कृत्य । त्यासी शिशुत्वादि अवस्था प्राप्त । हें अद्भुत हरिनाट्य ॥४॥ब्रह्म आणि कवळपाणि । हेही अघटित संपादणी । ब्रह्म भुकेलें म्हणोनि । घे स्वपाणी अन्न ब्रह्म ॥७०५॥एवं ब्रह्म नित्य निघोट । मायोक पशुपशिशुत्वनाट्य । हें निर्धारूनि चतुर्मुकुट । नमन सोत्कंठ जाहला ॥६॥दृष्ट्वा त्वरेण निजधोरणतोऽवतीर्य पृथ्व्यां वपुः कनकदंडमिवानिपात्य ।स्पृष्ट्वा चतुर्मुकुटकोटिभिरंघ्रियुग्मं नत्वा मुदश्रुसुजलैरकृताभिषेकम् ॥६२॥वास्तव आणि नाट्य कल्प । भगवन्महिमा एवंरूप । देखोनि विरिंचि सकंप । मानी अल्प आपणातें ॥७॥सार्वभौमातें किंमात्र । देखोनि विकळ मृत्तीचें गात्र । तेवी ब्रह्म शंकापात्र । होऊनि स्वपत्र सांडीलें ॥८॥नक्षत्र उलंडे गगनींहून । तेंवीं हंसातें सांडून । सवेग पृथ्वीसी देह पतन । करी सुवर्णदंडवत् ॥९॥जेवीं कनकाचलें विष्णु । पूजिला साष्टांग करूनि नमनु । तेवीं हिरण्यगर्भरूपतनु । हंसावरूनि लोटिली ॥७१०॥ऐसा मराळ सांडूनि दूरी । सुवर्णदंडाचिये परी । शरीर लोटूनि पृथ्वीवरी । नमी श्रीहरी सद्भावें ॥११॥चरणयुगुळीं च्यार्ही मुकुट । भरूनि अष्टही नेत्रघट । आनंदाश्रुचा जललोट । तेणें पदातिपीठ अभिषेकी ॥१२॥उत्थायोत्थाय कृष्णस्य चिरस्य पादयोः पतन् । आस्ते महित्वं प्राग्दृष्टं स्मृत्वा स्मृत्वा पुनः पुनः ॥६३॥चार्ही मुकुट श्रीकृष्णचरणीं । पडिला चिरकाळ ठेवूनि । देखिला महिमा आठवूनि । नमी उठोनि पुनः पुनः ॥१३॥उठोनि उठोनि सहस्रवरी । दंडप्राय प्रणाम करी । भगवन्महिमा परोपरी । स्मरे अंतरीं पुनः पुनः ॥१४॥शनैरथोत्थाय विमृज्य लोचने मुकुंदमुद्वीक्ष्य विनम्रकंधरः ।कृतांजलिः प्रश्रयवान् समाहितः सवेपथुर्गद्गदयैलतेलया ॥६४॥श्रीकृष्णाहूनि आपण थोर । ऐसा होता अहंकार । त्यासि करूनी तिरस्कार । शुद्धाधिकार निवडिला ॥७१५॥हळूचि उठोनि त्यानंतरें । परिमार्जिलीं नयनद्वारें । उभा राहूनि नम्र शिरें । कांपती गात्रें थरथरां ॥१६॥चरणोन्मुख नम्र मूर्ध्नी । रक्षूनि सलज्ज ऊर्ध्व नयनीं । दृष्टि घाली मुकुंदवदनीं । संकोचूनि सर्वांगें ॥१७॥स्वामी देखोनि पतिव्रता । सावरी अवयवां समस्तां । तैसा समाहित विधाता । सबाह्य होता जाहला ॥१८॥मग जोडूनि अंजलिपुट । प्रेमें दाटलासे कंठ । गद्गदगिरा स्तोत्रपाठ । करूनि वैकुंठ तोषवी ॥१९॥स्वेद रोमांच पुलक आंगीं । लेइला अष्टभावाची अंगीं । बेंबल पडोनि न राहे उगी । स्तवनप्रसंगीं गिरा वेंठे ॥७२०॥ते विरिंचिमुखींचें वचन । भगवद्भक्तीचें महिमान । श्रवणमात्रें कैवल्यसदन । श्रोते सज्जन पावती ॥२१॥ऐसें श्रीमद्भागवत । अठरासहस्रप्रमाणगणित । परमहंसीं रमिजे जेथ । स्कंध त्यांत दशम हा ॥२२॥शुकपरीक्षितिसंवाद । वत्सहरण कथा विशद । महाराष्ट्रटीका हरिवरद । अभीष्टप्रद सर्वांसी ॥२३॥आदिगुरु चिदाकाशीं । दत्तात्रेय ब्रह्मांडकोशीं । जनार्दन सूर्यप्रकाशीं । अज्ञाननिशी निरसूनि ॥२४॥एकनाथ सुदिन झाला । चिदानंदें लोक धाला । स्वानंदसुखाचा सोहळा । गोगम्य केला गोविंदें ॥७२५॥मग ते गोविंद कृपादृष्टि । विश्वीं वर्षोनि अमृतवृष्टि । त्रिजगा वोपूनि संतुष्टि । दयार्णव पुष्टि पावविला ॥२६॥तेथील इयें शब्दमुक्तें । कंठश्रवणभूषणें ज्यातें । चार्हीमुक्ती वरती त्यातें । जाणोनि अर्थ समर्थ तो ॥२७॥इतिश्रीमद्भागवतवत्सहरणे विरिंचिविभवदर्शननामत्रयोदशोध्यायः ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६४॥ टीकाओंव्या ॥७२७॥ एवं संख्या ॥७९१॥ ( तेरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ॥७६००॥ ) तेरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP