मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक २४ ते २६ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक २४ ते २६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २४ ते २६ Translation - भाषांतर गावस्ततो गोष्ठमुपेत्य सत्वरं हुंकारघोषैः परिहूत संगतान् ।स्वकान्स्वकान्वत्सतरानपाययन् मुहुर्लिहंत्यः स्रवदौधसं पयः ॥२४॥गायी येऊनि गोष्ठासमीप । स्नेहें हंबरती होऊनि सकृप । हुंकारघोषें स्ववत्सकळप । ससाक्षेप बहाती ॥४१॥तया हुंकाराची स्निग्ध ध्वनि । पडतां वांसरूवांचें कानीं । धांवती मुंसांडी देऊनि । ओहा रिघोनि मिसळति ॥४२॥वत्सें येतां देखोनि दुरी । हरिमायेची नवलपरी । स्तन पाझरती मोकळ्या धारी । मुखाभीतरीं न घालितां ॥४३॥धेनु पान्हार्ता वोरसून । पुच्छें पृष्ठिभागीं वाहून । स्ववत्सां करिती अवघ्राणें । पृष्ठि लववून गोंवताती ॥४४॥नवी व्याली जैसी धेनु । वत्सा चाटी कळवळून । अधिक सहस्रधा त्याहीहून । वत्सें जुनी चाटिती ॥३४५॥नवीं पारठीं लहानें थोरें । कृष्ण नाट्यांचीं वासुरें । गायी चाटिती प्रेमादरें । स्नेहसुभरें वावरल्या ॥४६॥डिउं धांवती आणिकांकडे । वत्सें चाटिती वाडेंकोडें । स्तनीं दुग्धाचे वहाती लोंढे । मोहें वेडें पशुप्रेम ॥४७॥एतावता हें वैषम्य । कृष्णासही दिर्निवार परम । परीक्षितीसी मुनिसत्तम । बोधी वर्म येथींचें ॥४८॥गोगोपीनां मातृताऽस्मिन्सर्वा स्नेहर्धिकां विना । पुरोवदास्वपि हरेस्तोकता मायया विना ॥२५॥गायीगोपीचें मायपण । कृष्णीं होतेंच पूर्वींहून । स्तनपानादि उपलालन । इहींकरून अभिव्यक्त ॥४९॥परंतु नव्हती स्नेहवृद्धि । पुत्रता नटतां कृपानिधि । स्नेह वाढला जो त्रिशुद्धि । हा उपाधि विशेष ॥३५०॥आणि गोगोपींचा पुत्र हरि । यथापूर्व क्रीडा करी । माया लाघवें मोह पसरी । स्वयें अंतरीं निर्मोह ॥५१॥मायायोगें पुत्र झाला । मायायोगें गोगोपींला । स्नेहाभिवृद्धि करून ठेला । माये वेगळा गोविंद ॥५२॥सूर्य स्वकिरणीं मृगजळा । भासवूनि दावी मृगातें डोळां । आपण जेंवी राहे वेगळा । तेवी हे लीला कृष्णाची ॥५३॥माझी माय हे मी इचा पुत्र । हा मोह न स्पर्शे अणुमात्र । केल्या गो गोपी मोहपात्र । स्वयें सन्मात्र अच्युत ॥५४॥तें स्नेहवृद्धीचें लक्षण । सावध होऊनि किजे श्रवण । जैसें नृपासी केलें कथन । बादरायण औरसें ॥३५५॥व्रजौकसां स्वतोकेषु स्नेहवल्ल्याब्दमन्वहम् । शनैर्निःसीम ववृधे यथा कृष्णे त्वपूर्ववत् ॥२६॥दैवयोगें लक्ष्मी वाढे । कीं नित्याभ्यासें प्रज्ञा चढे । कीं शुक्लपक्षीं कळा उघडे । चंद्री चढे प्रतिदिवशीं ॥५६॥कां इंदु देखोनि सिंधुआप । कीं तारुण्यें संचरे कंदर्प । नातें सुभूमीचें सुबीज रोप । वाढे पादप प्रावृटीं ॥५७॥व्रजौकसांचा तेवी प्रेमा । पुत्र झालेनि पुरुषोत्तमा । नित्य नूतन पावे गरिमा । यावत्सीमा पूर्णाब्द ॥५८॥शनैःशनैः वाढे स्नेह । दिवसेंदिवस चढतां मोह । नित्य नूतन प्रेमोत्साह । कमलानाहो सुतबोधें ॥५९॥पोर्वीं जैसा नंदालयीं । यशोदानंदनाचे ठायीं । प्रेमा होता तैसा पाहीं । सर्वां स्वगेहीं स्वतोकीं ॥३६०॥पाणवठ्याचें आणितां आप । गृहीं जोडल्या अमृतकूप । ठेले अन्यजळसाक्षेप । तेवी सकृप स्वपुत्रां ॥६१॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP