मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ३८ ते ४३ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ३८ ते ४३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३८ ते ४३ Translation - भाषांतर इति संचिंत्य दाशार्हो वत्सान् सवयसानपि । सर्वानाचष्ट वैकुंठं चक्षुषा वयुनेन सः ॥३८॥ऐसा राम विवेकारूढ । होऊनि निश्चय केला दृढ । ज्ञानदृष्टि करूनि उघड । देखे कैवाड कृष्णाचें ॥३४॥वत्स आणि वत्सपगण । ज्ञानदृष्टी पाहे पूर्ण । श्रीवैकुंठ नारायण । अवघें जाण देखिलें ॥४३५॥सविचारें साधारण । कृष्णरूपचि सर्व देखोन । विशेष कृष्णोपदेशें करून । करी विवरण तें ऐका ॥३६॥नैते सुरेशा ऋषयो न चैते त्वमेव भासीश भिदाश्रयेऽपि ।सर्वं पृथक्त्वं निगमात्कथं वदेत्युक्तेन वृत्तं प्रभुणा बलोऽवैत् ॥३९॥ईश ऐसें संबोधन । देऊनि म्हणे संकर्षण । मायानियंता तूं श्रीकृष्ण । अगाध विंदाण हें तुझें ॥३७॥पूर्वील दैवमायाकृत । ऋषिअंश हे वत्स समस्त । देवतांश वत्सप एथ । मज हें विदित आजवरी ॥३८॥आतां तैसें नव्हेचि जाण । वत्स वत्सप भेदें करून । कैसा झालासी मज हे खुण । विविक्त विवरून वद वेगीं ॥३९॥ऐसें प्रार्थिलें संकर्षणें । ऐकोनि समर्थें श्रीकृष्णें । निगमरूपें स्वमुखें खुणें । बोधितां खुणें जाणीतलें ॥४४०॥अग्रजासि बोधी कृष्णा । मन्मय आब्रह्म संपूर्ण । हें विसरोनि सृजनाभिमान । धरी द्रुहिण स्वदेहीं ॥४१॥तेणें रजाभिमानें करून । केलें वत्सपवत्सहरण । त्याचें करावया स्मयभंजन । हें विंदाण म्यां केलें ॥४२॥अद्वितीय ब्रह्म एक । हें प्रमाण उपनिषद्वाक्य । तो मी पूर्णब्रह्म विश्वदृक । विधीसीं सम्यक उपजावया ॥४३॥विधीसहित विश्वसृजन । कर्ता समर्थ मी श्रीकृष्ण । झालों वत्स वत्सपगण । कमलासनछलनार्थ ॥४४॥ऐकोनि हें परम रहस्य । राम पावला चिन्मयतोष । आश्रऊनि स्वानंदकोश । नावेक दृश्य विसरला ॥४४५॥धृतावतारसंपादणी । विचित्र करितो चक्रपाणि । तें पहावया अंतःकरणीं । स्मृति परतोनि चेइली ॥४६॥मग उघडोनि नेत्रकमळा । परिमार्जूनि आनंदजळा । पहाता झाला श्रीकृष्णलीला । तें नृपाळा शुक सांगे ॥४७॥तावदेत्यात्मभूरात्ममानेन त्रुट्यनेहसा । पुरोवदब्दं क्रीडंतं ददृशे सकलं हरिम् ॥४०॥कृष्णें रामासि वृत्तांत । कथिल्यानंतर वर्तली मात । वत्सवत्सप वेषवंत । हरि क्रीडत यथापूर्व ॥४८॥अब्दपर्यंत व्रजीं हरि । क्रीडत असतां पहिलेपरी । ब्रह्मा पाहे अभ्यंतरीं । काळ त्रुटिभरी लोटल्या ॥४९॥व्रजीं येऊनि पाहे नेत्रीं । तंव वत्सवत्सपेंसी क्रीडतां हरि । देखोनि ब्रह्मा विचार करी । अभ्यंतरीं तें ऐका ॥४५०॥यावन्तो गोकुले बालाः सवत्साः सर्व एव हि । मायाशये शयाना मे नाद्यापि पुनरुत्थिताः ॥४१॥वत्सें वत्सप व्रजींचे जितुले । स्वमायामंचकीं म्यां पहुडविले । ते अद्यापि नाहीं उठविले । हे एथ आले कोठूनि ॥५१॥एत एतेऽत्र कुत्रत्या मन्मायामोहितेतरे । तावन्त एव तत्राब्दं क्रीडन्तो विष्णुना समम् ॥४२॥स्वमायेनें म्यां मोहिले । त्या वेगळे हे कोठूनि आले । तितुके तैसेच तेथ पाहिले । क्रीडत ठेले पूर्णाब्द ॥५२॥विष्णुसमागमें क्रीडती । विष्णूसमागमें वेधक शक्ति । विष्णूमयचि सर्व भासती । मज नुमजती ते कीं हे ॥५३॥मायातल्पीं म्यां निजविले । हे तैसेचि कोठूनि आले । ऐसे वितर्क अनेक केले । परी जाणितले न वचति ॥५४॥एवमेतेषु भेदेषु चिरं ध्यात्वा स आत्मभूः । सत्याः के कतरे नेति ज्ञातुं नेष्टे कथंचन ॥४३॥एवं अनेक वितर्कभेदीं । विवंचूनि पाहे विधि । निश्चयाची न लभे शुद्धि । थकली बुद्धि स्वकार्यीं ॥४५५॥चिरकाळ पाहतां विवरूनि । सत्य कोणतें नुमजे ध्यानीं । अवांतर हे कोणाची करणी । झाला नेणोनि विमूढ ॥५६॥सत्यज्ञानानंतब्रह्म । तो हा श्रीकृष्ण पुरुषोत्तम । येर केवल मायाभ्रम । जो हा क्रम विधिकृत ॥५७॥देवमनुष्यतिर्यक । अवघे विधिकृत त्रिगुणात्मक । पूर्वील वत्सप आणि वत्सक । तन्मायिक त्रैगुण्य ॥५८॥सत्यसन्मात्र कृष्णमय । अयोनिसंभव अविक्रिय । वत्स वत्सपांचा समुदाय । हा केवी होय असत्य ॥५९॥सत्यासी असत्य म्हणते समयीं । जिव्हा तुटोनि न पडे कायी । पूर्व अपूर्व इयें अन्वयीं । ज्ञप्ति ठायीं हरपली ॥४६०॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP