मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ११ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ११ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ Translation - भाषांतर बिभ्रद्वेणुं जठरपटयोः श्रृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु । तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्वालकेलिः ॥११॥तया आश्चर्याची हेचि थोरी । यज्ञभोक्ताही जो हरि । तो वत्सपांमाजीं भोजन करी । बालकांपरी हें नवल ॥७१॥बालकापरी क्रीडा ज्याची । आळी पुरवी वत्सपांची । त्यांसी आपुले सिदोरीची । दावी रुचि रुचिकर ॥७२॥आपुले सिदोरीचे ग्रास । द्यावयालागीं संवगडियांस । कैसा ठेवेला हृषीकेश । तो क्रीडावेष अवधारा ॥७३॥श्याम राजीवलोचन । आजानुबाहु मृगांकवदन । प्रेमें पाहतां रुपती नयन । वेधे तनुमन त्रिजगाचें ॥७४॥खद्योत रत्रें दीपादि दीप्ति । सूर्यापुढें लोपोनि जाती । तेवीं हरिप्रेमा जे आत्मरति । त्याहूनि आरुती भवस्निग्धें ॥१७५॥स्वजन सुहृद वृत्ति क्षेत्र । कर्म धर्म पुत्र कलत्र । अर्थ स्वार्थ विषयमात्र । हे स्नेहविचित्रे भवभ्रांति ॥७६॥शरीरमात्र मानिती आत्मा । त्या हा भवसुखाचा गोंवी प्रेमा । तेथ प्रकटल्या परमात्मा । मिथ्याभवभ्रमा कां भुलती ॥७७॥एवं कृष्णीं तनु मन नयन । गुंतती यांचें नवल कोण । सप्रेम करितां कृष्णस्तवन । नाठवे भान भवाचें ॥७८॥जठरवेष्टित तगटीपट । वेणु त्यामाजीं खोवूनि निट । वामभागींचें कक्षीपूट । तेथ धरी बळकट श्रृंग वेत्र ॥७९॥सुस्निग्ध ध्यानाचा कवळ । वामहस्तीं घे गोपाळ । रुचिकर लोणचियांचा मेळ । धरी अंगुलसंधीसी ॥१८०॥कमलकर्णिका श्रीकृष्णपीठ । भंवतीं पत्रें जैसीं प्रकट । तैसे संवगडे उपविष्ट । पंक्ति भूयिष्ठ हरिमुखा ॥८१॥अवघे पाहती श्रीकृष्णमुख । कृष्ण अवघियां सन्मुख । परिहासवचनीं सकौतुक । उपजवी सुख संवगडियां ॥८२॥कित्येक रहस्यपद्धति । अर्चा अध्वर तांत्रिक रीती । कथिल्या ईश्वरें पार्वती । ते ते प्रवृत्ति तच्छास्त्रीं ॥८३॥तो हा लोकत्रयीं प्रकट । स्वयें क्रीडे कंबुकंठ । स्वैर म्हणोनि दूषिती श्रेष्ठ । वत्सप न नट तद्व्याजें ॥८४॥पहात असतां स्वर्गवासी । निबिड विमानीं आकाशीं दिव्य फणी जे पातालवासी । देवपंक्तीसी ते असती ॥१८५॥ऐसे समस्त सुरवर । गण गंधर्व यक्ष किन्नर । पाहत असतां आश्चर्यपर । सिद्ध मुनिवर वसु साध्य ॥८६॥मृत्युलोकीं प्रकट जनीं । वत्सपेंशीं चक्रपाणि । जेवीं लेवूनि गवसणी । गोपशैशव नाट्याची ॥८७॥तेथील जेवणाची परी । झाली त्रिजगाची उपकारी । ते तूं सविस्तर अवधारीं । कुरुधरित्री पालका ॥८८॥ब्रह्मयासी अनुग्रहकर । स्वयें होऊनि वत्सें कुमार । झाला शेषासी रुचिकर । कृष्णावतार वर्णावया ॥८९॥गडी पहाती कृष्णवदन । तंव करीं घेऊनि दध्योदन । माझे हस्तींचें कवळदान । मुख पसरून सेवा रे ॥१९०॥त्वंपदाचे तुम्ही ग्रास । आधीं अर्पिले मज निःशेष । माझ्या तत्पदकवळें तोष । तुम्ही विशेष पावा रे ॥९१॥ऐसें म्हणतां श्रीपाळ । मुखें पसरूनि तत्पर सकळ । मुखीं पडतां श्रीकृष्णकवळ । सुखसुकाळ सर्वांसी ॥९२॥बोधसुस्निग्धदध्योदन । रुचिकर चतुष्टय साधन । लवण शाका नाहंलवण । तेणें जेवण बहुगोड ॥९३॥शुद्धसत्त्वाचें ज्ञान आलें । सर्वज्ञतेसी तीक्ष्ण भलें । विनयलवणेंशीं रापलें । मुखीं घातलें श्रीकृष्णें ॥९४॥कांहींच उरलें नाहीं आम्हां । काय अर्पावें पुरुषोत्तमा । तंव त्यां बोलिला सुदामा । म्हणे या वर्मा ऐका रे ॥१९५॥आपुलें सर्वस्व अर्पिल्या हरि । उरली हरीची जे सिदोरी । ते आपुलीच अवघी खरी । हें अंतरीं समजा रे ॥९६॥हरीसि वंचूनि कांहीं एक । कृष्ण कवळासी पसरी मुख । तोचि निराजिरा कामिक । दवडा निष्टंक एथूनि ॥९७॥कृष्णकरीचा दध्योदन । झोंबोनि घ्यारे अवघेजण । तोचि करूनि कृष्णार्पण । मग संपूर्ण सुख भोगा ॥९८॥ऐसें ऐकोनिया वचन । म्हणती भलारे भला धन्य । बरवी सांगितली खुण । सुखसंपन समस्त ॥९९॥एक म्हणती आम्हीं दिनें । अर्पूनि ममतेचीं कदन्नें । घ्यावीं कृष्णाचीं सदन्नें । कोणा न माने हे गोडी ॥२००॥हें ऐकोनि म्हणे हरि । आपुली सांभाळा सिदोरी । कांहीं नसतां माझे करीं । झोंबोनि भाकरी घ्या माझी ॥१॥तंव ते जाळिया संभाळिती । नवविध सदन्नें देखती । म्हणती कृष्णा तुझी ख्याती । अन्नें नव्हतीं पाहिलीं हीं ॥२॥ज्या अन्नाची देखोनि गोडी । बळेंचि कृष्ण घाली उडी । पाठीं लागे जेवीं बराडी । दगडीं लांकडीं प्रकटोनि ॥३॥म्हणती कृष्णा तुझीच करणी । केलीं सदन्नें जाळियाभरणीं । तुझें अर्पूनि तुझ्या वदनीं । अंतःकरणीं सुख भोगूं ॥४॥मग श्रवणामृताचे सप्रेमळ । कृष्णमुखीं घालिती कवळ । बाधे दध्योदन निर्मळ । अर्पी गोपाळ त्या वदनीं ॥२०५॥एक कीर्तनरसाची गोडी । परस्परें रुचिकर गाढी । भोक्ता म्हणोनि कृष्णतोंडीं । लाविती गडी स्वानंदें ॥६॥सर्व साक्षित्वाचा ग्रास । कृष्णें घालितां मानिती तोष । गिळूनि म्हणती हरि सारांश । तृप्तिमात्रचि एथींची ॥७॥स्मरणसुखाची सुरस चवी । कृष्णा दावूनि कोणी गोवी । कोणी पादसेवन भावी । चवी चाखवी सप्रेमें ॥८॥अर्चनरसाच्या परवडी । लाविती श्रीकृष्णासी गोडी । नमन नम्रता साकार तोंडीं । घालिती गडी मिष्टत्वें ॥९॥एक दास्याच्या शिखरणी । उंच नीच दास्याचरणीं । कृष्णार्पणीं तोषिती ॥२१०॥एक सख्यत्वें श्लाघेजती । आम्ही अभिन्नें कृष्णीं म्हणती । आमुची सिदोरी श्रीपति । अभेदस्थिति तूं भक्षीं ॥११॥आत्मनिवेदन एकवाट । होऊनि म्हणती तुजसकट । जेऊनि धालें आमुचें पोट । हरले कष्ट भेदाचे ॥१२॥एकाकडे कवळ दावी । तो जंव त्यासि मुख ओडवी । कृष्ण त्यांसि वांकुल्या दावी । आणिका भरवी तो कवळ ॥१३॥शांतिक्षमेचे घेतां कवळ । कृष्णासि धालों म्हणती सकळ । एक म्हणती उताविळ । आम्ही भुकाळ प्रेमाचे ॥१४॥वत्सप आणि श्रीमुरारि । त्वंपद तत्पद परस्परीं । कवळ गिळूनि एकाकारीं । सुखशेजारीं क्रीडती ॥२१५॥नाना उपहास नर्मोक्ति । तोषवर्धक बोलताति । कृष्णाकार ऐक्यस्थिति । भेदभ्रांति हरपली ॥१६॥वत्सपांचा अविद्याकवळ । कृष्णें ग्रासिला तत्काळा । माया कवळा गिळितां बाळ । विघ्नकल्लोळ उदेला ॥१७॥तया विघ्नांची निवृत्ति । करूनि पुनरपि श्रीपति । वत्सपेंशीं एक पंक्ति । पावती तृप्ति असिपदीं ॥१८॥ते एथून अपूर्व कथा । परिसें सभाग्य भारता । जिच्या श्रवणें यातायाता - । पासूनि श्रोता दुरावे ॥१९॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP