प्रसंग पंधरावा - प्रसंग समाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


जळांत असतां जळचर । न मानिती जळाचा आभार । तळमळती बाहेर पडल्‍यावर । तैसे जन अंतकाळीं ॥११३॥
रविबिंबानें वागे चराचर । नाहीं आराणुक न करी नमस्‍कार । अस्‍तमान जाल्‍याउपर । भांबावतीं वेडे ॥११४॥
चौदावें रत्‍न तो चवदावा । सांगितला संपला पंधरावा । पुढं परिसा सोळावा । शेख महंमद वदे ॥११५॥
बारा सोळा कळीं भ्रमत । रवि शशि प्रकाशवंत । त्‍या अधिक सद्‌गुरुचें कवित्‍व । शेख महंमद म्‍हणे ॥११६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP