प्रसंग पंधरावा - मनुष्‍यजन्मीं सद्‌गुरुसंगेंच मुक्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मनुष्‍यजन्मासारिखें रत्‍न । सिद्धसाधूनीं केलें जतन । स्‍वयें तरोनियां उपलक्षण जनासी बोलती ॥८२॥
बोलती परमार्थ विचार । तेणें तरिजे भवसागर । जनाचें ठायीं निर्धार । आथेंच ना कांहीं ॥८३॥
प्रतिमेसी भाव बारा वर्षे । निश्र्चय धरिजे विश्र्वासें । साक्षात्‍कार होईजे सायासें । परी मोक्ष नाहीं ॥८४॥
भाव औट घटिका सद्‌गुरुचरणीं । धरिजे मन एकाग्र करुनी । तरीच पद जोडे निर्वाणी । गुरुत्‍वाचें परियेसा ॥८५॥
सद्‌गुरुसंगें लाधलें निज गुज निकट । तेणें चारी मुक्ती दिसती हळुवट । चरणीं वागे येऊन वैकुंठ । रिद्धि सिद्धी दास्‍यत्‍व करिती ॥८६॥
परि तो न इच्छी रिद्धि सिद्धी । अंतरीं उमटती ब्रह्मविधि । मन उन्मगी लागे समाधि । सहज श्रद्धेची ॥८७॥
परमात्‍मा आणि साधु । या दोहीं नांवांत नाहीं भंदु । जैसे घृतमिश्रित असे दुधु । द्वैतीं अद्वैतपणें ॥८८॥
ईश्र्वरा साधूंत बोलणें । पंडिता पोथ्‍या वांचणें । ऐसे दोघे समाधानपणें । प्रेमें वोसंडती ॥८९॥
ऐसा सद्‌गुरूशीं धरितां भाव । तो कैसा करावा उपाव । शेख महंमदी सांगती सेव । सभे श्रोत्‍यांप्रती ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP